शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

पुन्हा राम मंदिराची टोपी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 04:56 IST

‘कारसेवक’ नावाच्या बिनचेहऱ्याच्या उन्मादी जमावाने बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. तरीही बाळासाहेब ठाकरे यांनी ‘बाबरी माझ्या वाघांनी पाडली’, असे श्रेय घेऊन टाकले होते. त्या तुलनेत उद्धव यांनी अयोध्येपर्यंत जाण्याचे कष्ट घेऊन एक पाऊल पुढेच टाकले म्हणायचे!

लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे हाकारे-पिटारे करून रान उठविणे सुरू झाले आहे. ज्याला ‘हिंदू परिवार’ अशा भ्रामक नावाने ओळखले जाते त्यातील पिलावळ गावोगावी राम मंदिरासाठी टाहो फोडू लागली आहे. या सर्वांचा बोलविता धनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी यावरून पहिली टीका केली होती. त्यानंतर राम मंदिराचा विषय पद्धतशीरपणे तापविणे सुरू झाले. मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही रामभक्तीचा तीव्र अ‍ॅटॅक आला. तुम्ही मंदिर बांधणार नसाल तर आम्ही बांधू, असा मोदींना लटका दम भरत ते सहकुटुंब अयोध्येची तीर्थयात्राही करून आले.कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रयाग तीर्थावर साधू-संतांची जत्रा भरली. त्यातही पापक्षालन आणि मोक्षाचे विषय गंगार्पण करून राम मंदिराचेच गुऱ्हाळ चालविले गेले. त्यातच द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी, सरकारने काही करण्याची वाट न पाहता, येत्या २१ फेब्रुवारीपासून अयोध्येत राम मंदिराचे काम सुरू करण्याची घोषणा करून टाकली. विश्व हिंदू परिषद नावाच्या सर्व हिंदूंच्या वतीने मक्ता घेतलेल्या संघटनेने या मंदिर आंदोलनाचे स्वयंघोषित यजमानपद घेतले आहे. हा सर्व गदारोळ सुरू असताना आपणही काही तरी करत आहोत हे मोदी सरकारने दाखविणे गरजेचे होते. त्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या सभोवतालची संपादित केलेली ६७ एकर जमीन मूळ मालकांना परत देण्याची मुभा सरकारला हवी आहे. वादग्रस्त जागेसह या अतिरिक्त संपादित जागेवर न्यायालयाचा ‘जैसे थे’ आदेश आहे. शिवाय तेथे शिलान्यासासह कोणताही धार्मिक विधी करण्यासही मनाई आहे. सरकारला ही बंधनेही शिथिल करून हवी आहेत. या अतिरिक्त संपादित जमिनीपैकी ४२ एकर जमीन रामजन्मभूमी न्यासाची आहे.गेल्या निवडणुकीत मोदी सत्तेवर येण्यात उत्तर प्रदेशने केलेल्या चमत्काराचा मोठा वाटा होता. या वेळी हा चमत्कार पुन्हा होईल, याची शाश्वती वाटत नाही. त्यामुळे हिंदू मतांचे केंद्रीकरण करण्यासाठी राम मंदिराचा वन्ही पुन्हा चेतविला जात आहे. पण हा निव्वळ राम मंदिराच्या नावाने टोप्या घालण्याचा धंदा आहे, हे चाणाक्ष मतदारांनी ओळखायला हवे. यातील ग्यानबाची मेख लक्षात घ्या. हिंदूंना उल्लू बनविण्यासाठी गेली २५ वर्षे जी ‘मंदिर वहीं बनाएंगे’ची आवई उठविली जात आहे त्यातील ‘वहीं’ हा शब्द महत्त्वाचा आहे. ‘वहीं’ याचा अर्थ पूर्वी बाबरी मशीद जेथे होती त्याच जागेवर. सध्या सुरू असलेल्या कोलाहलाचा या ‘वहीं’शी सूतराम संबंध नाही. बाबरी मशीद जेथे होती तीच प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी आहे, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. त्यामुळे त्याच जागेवर राम मंदिर उभारण्याचा अट्टाहास आहे. पण नेमक्या याच जागेच्या मालकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. तो सुटत नाही तोपर्यंत ‘वहीं’ मंदिर उभारणे शक्य नाही. दुसरे असे की, मंदिर उभारणीसाठी स्वत:हून पालखीचे भोई होण्यासाठी जे हिरिरीने पुढे येत आहेत त्यांच्यापैकी कोणीही न्यायालयात पक्षकार नाही. त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निकाल दाव्यातील हिंदू पक्षकारांच्या बाजूने झाला तरी त्यांच्या जागेवर हे स्वयंभू कंत्राटदार मंदिर कसे उभारणार, हाही प्रश्नच आहे.दुसरा प्रश्न आहे संपादित केलेल्या अतिरिक्त जमिनीचा. न्यायालयाने परवानगी दिली व ही जमीन जरी उद्या रामजन्मभूमी न्यासाला परत मिळाली आणि तेथे मंदिर बांधायचे म्हटले तरी ते मंदिर ‘वहीं’ बांधले जाणार नाही. बाबरी मशिदीची नेमकी जागा सोडून इतरत्र मंदिर बांधण्यात काहीच हशील नाही. तशी देशात गावोगावी रामाची मंदिरे आहेतच. मर्यादा पुरुषोत्तम राम पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेले. जन्मस्थळी मंदिर नव्हते म्हणून महात्म्य जराही कमी न होता रामाचे हिंदूंच्या मनात अढळ स्थान आहे. त्यामुळे रामावरील श्रद्धेचा त्याच्या जन्मस्थळी मंदिर असण्या व नसण्याशी काहीही संबंध नाही. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कंसाच्या कारागृहात झाला. मथुरेतील श्रीकृष्णाचे मंदिर त्या कारागृहाच्या ठिकाणी नाही. तरी श्रीकृष्णाचे देवत्व अबाधित आहे. त्यामुळे या दैवतांचा राजकारणी मतांसाठी चलनी नाणे म्हणून वापर करीत आहेत, हे सुज्ञ मतदारांनी ओळखायला हवे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदी