शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

पावसाने शेतीची दाणादाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 06:04 IST

चांदा ते बांदा संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने शेतीची दाणादाण उडविली आहे. तरीही शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. विरोधी पक्ष सरकार कसे अडचणीत येईल, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची कुजबुज कशी रंगेल, यातच मग्न आहे.

चांदा ते बांदा संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने शेतीची दाणादाण उडवून टाकली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या रविवारपर्यंत पावसाचा कहर असणार आहे. या पावसाच्या तडाख्यातून महाराष्ट्राचा कोणताच विभाग सुटलेला नाही. रावेरची केळी, अकोटची ज्वारी, सोयगावची केळीची बाग, शिरूरची बाजरी, पाथरीमधील सोयाबीन, आटपाडीची डाळिंबे, सावंतवाडीचा भात, औंढा नागनाथ, पैठण, नेवासा, राहुरी, हिंगोली, सेलू आदी महाराष्ट्रातील कोणताही तालुका घ्या, कोणतेही पीक डोळ्यांसमोर आणा. ते वादळी, ढगफुटीसदृश पावसाने भुईसपाट तरी झाले किंवा नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने कुजू लागले आहे.रावेरच्या केळींना पावसाचा फटका बसलाच आहे. त्याच्या मागून कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही)चा विळखा पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी आणि चंदगड तालुक्यांत रताळी चिखलातच अडकली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची कापणी जवळ आली आहे. पण, पाऊस थांबायची लक्षणे दिसत नाहीत. अनेक ठिकाणी भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. चालू वर्ष हे कोरोनाच्या प्रादुर्भावाने वेढलेले असताना पाऊस कसा होईल, याची चिंता होती. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यांतील स्थलांतरित मजुरांनी महानगरे सोडून गाव गाठले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच चांगला पाऊस होऊ लागल्याने महाराष्ट्राचा ग्रामीण भाग आनंदात होता. आॅगस्टअखेर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १७ ते २९ टक्के अधिक पाऊस झाला होता. शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतही तो अधिक आहे. महाराष्ट्रातील एकही धरण शंभर टक्के भरायचे राहिलेले नाही. जायकवाडी, उजनीसारखी तुटीच्या पाण्याच्या धरणातूनही दोन-तीनदा पाणी सोडावे लागले. दुधना, करपरा, तेरणा, सीना, इंद्रायणी आदी नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या. मराठवाड्यात तर पावसाने कहरच केला आहे. परभणी, बीड, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांत कडधान्ये, सोयाबीन, ऊस, कपाशी, आदी पिकांचे पावसाने हाल करून सोडले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थकारण उद्ध्वस्त झाले असताना सुरुवातीपासूनच दमदार होणाºया पावसाने पिके तरारून आली होती. जुलै महिन्याच्या मध्यावर थोडी ओढ दिल्याने काळजी वाटत होती. मात्र, परतीच्या मान्सूनचा अवतार यावर्षी वेगळाच आहे. सोयगावसारख्या तालुक्यात एका रात्रीत शंभर मिलिमीटरच्यावर पाऊस झाल्याच्या नोंदी आहेत. पासष्ठ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला तर अतिवृष्टी मानली जाते. शंभरपेक्षा अधिक असेल तर ढगफुटी होते. महाराष्ट्रातील एकही जिल्हा यातून वाचलेला नाही. पाणीटंचाई होणार नाही, धरणे भरल्याने बारमाही सिंचनाचा अडसर येणार नाही, शहरांचा पाणीपुरवठा कमी पडणार नाही, आणि सर्वांत महत्त्वाचे रब्बीचा हंगाम उत्तम येईल, याबद्दल शंका नाही; पण खरीप हंगामाचा शेवट काही चांगला होत नाही, असेच दिसते. रावेरच्या केळींचे शंभर कोटींहून अधिक नुकसान तर आटपाडीसारख्या कायम दुष्काळी तालुक्यात डाळिंब पिकाचे सत्तर कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.प्रशासकीय यंत्रणा कोरोनाशी लढते आहे. सर्वांचे तिकडेच लक्ष आहे. शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. संख्याबळाने मजबूत असलेला विरोधी पक्ष मराठा आरक्षणावरून सरकार कसे अडचणीत येईल, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची कुजबुज कशी रंगेल, यातच मग्न आहे. अनेक मंत्रिमहोदय कोरोनाच्या भीतीने धास्तावले आहेत. कोणी शेताच्या बांधावर जाऊन पाहण्याची तसदी घेत नाही. कृषिमंत्री महोदयांनी गरज नव्हती तेव्हा महाराष्ट्रभर फिरून घेतले. आता ते बोलतानाही दिसत नाही. केंद्राने कांदा निर्यातबंदी केली तरी भाजपचे एक माजी कृषिराज्यमंत्री नाशकात जाऊन गळा काढत आहेत. वास्तविक जेथे-जेथे नुकसान झाले आहे; तेथे तातडीने पंचनामे सुरू करण्याचे काम कृषिखात्याने करायला हवे आहे. अशा शेतकºयांना मदतीचा हात द्यायला हवा आहे. अन्यथा कोरोनाच्या संसर्गातही थोडेबहुत शिल्लक राहिलेले ग्रामीण अर्थकारण संकटात आल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस