शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर EMI मध्ये तुर्तास दिलासा नाही, रेपो दर जैसे थे; ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार
2
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनचे वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
3
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
4
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
5
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
6
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
7
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
8
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
9
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
10
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
11
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
12
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
13
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
14
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
15
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
16
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
17
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
18
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
19
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
20
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 08:29 IST

अनेक वर्षे भिजत पडलेले हे प्रकरण आता ईडीने हाती घेतले आहे. राहुल यांचे विदेशातील व्यवहार, बँक खात्यांची माहिती ईडी जमवत असल्याचे कळते.

हरीष गुप्तानॅशनल एडिटर,लोकमत, नवी दिल्ली

अंमलबजावणी संचालनालयातर्फेराहुल गांधी यांची चौकशी चालू असताना राहुल यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा समोर आला आहे. हा वाद नवा नाही. काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याविरुद्ध एक याचिका दाखल झाली होती. त्या भारतीय नागरिक नाहीत असा आरोप होता. न्यायालयाने याचिका फेटाळली. राहुल गांधी यांच्याविरुद्धची याचिका मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर पडून आहे. राहुल यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व असून, त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करावे, अशी मागणी करणारी याचिका एस. विग्नेश शिशिर यांनी उच्च न्यायालयात केलेली आहे.९ सप्टेंबरला ईडीने शिशिर यांनाच बोलावून घेतले तेव्हा या प्रकरणाला अनपेक्षित वळण लागले. सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. ईडी आता राहुल यांच्या नागरिकत्वाविषयी पुरावे गोळा करत आहे काय? असा प्रश्न त्यामुळे विचारला जाऊ लागला. आपली चौकशी फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) पुरती मर्यादित असल्याचे ईडीने तूर्तास स्पष्ट केले आहे. 'परदेशातील व्यवहार सुलभ करण्यासाठी राहुल यांनी ब्रिटिश नागरिकत्व घेतले' असे शिशिर यांचे म्हणणे आहे. लंडन, व्हिएतनाम आणि उज्बेकिस्तानमधून आपण त्यासंबंधीची कागदपत्रे मिळवल्याचा दावा ते करतात. राहुल यांच्या विदेशातील व्यवहारांची, उत्पन्न स्त्रोतांची आणि बँक खात्यांची माहिती ईडी जमवत असल्याचे कळते. शिशिर यांनी ईडीला नेमके काय सांगितले हे उघड झालेले नाही. परंतु ईडीचा या प्रकरणात प्रवेश एकूण विषयाला गती देणार आहे. गेली अनेक वर्षे हे प्रकरण भिजत पडलेले आहे. आता ही चौकशी आर्थिक स्वरूपाची राहते की राहुल गांधी यांच्या राजकीय अस्तित्वाला व्यापक प्रमाणात घेरते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.खैरातीची वाढती लाट'अवास्तव निवडणूक आश्वासने देऊन खजिना रिकामा करणाऱ्या राज्यांना केंद्र सरकार मदत करू शकत नाही', असे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अधिकृतपणे म्हटले आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राजकीय पक्षांनी एकामागून एक आश्वासने देत सुटण्याविषयी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात टीव्हीवरील एका कार्यक्रमात नापसंती व्यक्त केली होती. 'सार्वजनिक खर्चाविषयी अशी बेफिकीरी दाखवली जाता कामा नये' असे त्या म्हणाल्या होत्या. परंतु महिला, तरुण आणि इतर मतदार गटांना लक्ष्य करून त्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवून भाजपच एकामागून एक निवडणुका जिंकत सुटला आहे. हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुका अशा प्रकारे रोखीने पैसे खात्यात पाठवून या पक्षाने जिंकल्या. आता बिहारमध्ये निवडणूक होत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यांनी चालविलेली खैरात वर्षाला ४० हजार कोटींपेक्षा जास्त होईल. पाठोपाठ पंतप्रधानांनी ७५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये पाठवले. सव्वा कोटी महिलांना कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर प्रत्येकी २ लाख रुपये मिळतील. कृषिप्रधान राज्यांमध्ये शेतीवरील कर्जे माफ करण्याचा पायंडा ८० च्या दशकात पडला. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत स्वस्त धान्य

देण्याचे आश्वासन हा दुसरा प्रकार होता. अलीकडे मात्र निवडणुका आल्या की खात्यात थेट पैसे पाठवायला सुरुवात झाली आहे. २०१४ पासून नऊ राज्यांनी कर्जमाफी जाहीर केली. त्यातून २.५३ लाख कोटी रुपये माफ केले गेले. मात्र मार्च २०२२ पर्यंत जे शेतकरी खरोखरच कर्जमाफीला पात्र होते त्यापैकी ५० टक्के शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला. दिल्लीत दीड कोटी मतदारांपैकी ७१ लाख महिला मतदार आहेत. २५०० रुपये महिना, अधिक इतर सवलती देऊन सरकारने त्यांना आपल्याकडे वळवले. या खैराती तशा महाग पडतात. एक अभ्यास असे सांगतो की ज्या २१ राज्यांनी निवडणुकीपूर्वी कर्जमाफी जाहीर केली त्यापैकी फक्त चार ठिकाणी पराभव पदरात पडला. बहुतेक राज्यात सत्ताधाऱ्यांचा फायदाच झाला.महिला, मंदिर आणि मोदीनितीशकुमार यांनी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना जाहीर केली; परंतु ती सुरू करण्याची वेळ आली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ लाख महिलांना प्रत्येकी १०,००० दिले. बहुधा पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या योजनेचे पैसे पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिले गेले. बिहारमधली निवडणूक महिला, मंदिर आणि मोदी या तीन 'एम'वर लढवली जाईल. भाजप त्यात नितीशकुमार यांचा उल्लेखही करत नाही. निवडणुकीपूर्वी ही नवी संहिता तर लिहिली जात नाही ना?

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi's citizenship, ED probe take unexpected turn: Lokmat

Web Summary : Rahul Gandhi's citizenship is under scrutiny as ED investigates financial dealings. Simultaneously, freebie promises by political parties raise concerns about state finances. BJP's focus on women, temples, and Modi defines Bihar's election strategy, sidelining Nitish Kumar.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय