शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

राहुल गांधी आता चीन-रशियाला भेट देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 3:21 AM

अमेरिकेचा दौरा करून परत आल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आता चीन व रशियाचा दौरा करण्याची योजना तयार करीत आहेत.

हरीश गुप्ता, लोकमत समूहाचे नॅशनल एडिटररअमेरिकेचा दौरा करून परत आल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आता चीन व रशियाचा दौरा करण्याची योजना तयार करीत आहेत. तेथील अनिवासी भारतीयांपर्यंत पोहचण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. राहुल गांधींच्या अमेरिकेच्या दौºयानंतरच्या फलश्रुतीमुळे काँग्रेसचे योजनाकार प्रभावित झाले आहेत. राहुल गांधींविषयीच्या लोकांच्या कल्पनेत या दौ-याने बराच बदल झाला असून, देशातील त्यांची स्वीकारार्हता वाढली आहे. राहुल गांधींनी भारताकडे इटलीच्या चष्म्यातून बघू नये, अशी टीका अमित शहा यांनी केल्यावर त्यांना सोशल मीडियावर टीका सहन करावी लागली. राहुल गांधींच्या अमेरिका भेटीचा कार्यक्रम दोन महिन्याहून अधिक काळापूर्वी सॅम पित्रोडा आणि मिलिंद देवरा यांनी आयोजित केला होता. पण आगामी दोन महिन्यात गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका होणार असल्याने, चीन व रशियाच्या दौºयाच्या तारखा त्यानंतरच्या ठरविण्यात येत आहेत. या निवडणुका आटोपल्यानंतरच राहुल गांधी चीनच्या दौ-यावर जातील, असे समजते.

स्टिंग आॅपरेशनबाबत आचारसंहिता समिती अडचणीतलोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेच्या आचारसंहिता समितीचे अध्यक्ष म्हणून लालकृष्ण अडवाणी यांची पुन्हा निवड केली आहे. पण नारदा स्टिंग आॅपरेशनची चौकशी करण्याचे काम अडवाणी सध्या करू शकत नाहीत. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी पैसे घेतल्याची बाब या स्टिंग आॅपरेशनमुळे उघडकीस आली होती. पैसे घेणाºया खासदारात मुकुल रॉय हेही होते. नारदा न्यूजने हे स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यात राज्यसभेचे मुकुल रॉय आणि लोकसभेचे खासदार काकोली घोष दस्तीदार, सौगत रॉय, सुबेंदू अधिकारी, प्रसून बॅनर्जी आणि सुलतान अहमद यांचा समावेश होता. त्यापैकी सुलतान अहमद यांचे अलीकडे निधन झाले. आचारसंहिता समितीने याप्रकरणी अद्याप चौकशी सुरू केलेली नाही. कारण तृणमूलचे खासदार मुकुल रॉय यांची भाजपा नेतृत्वाशी बोलणी सुरू आहे. तसेही ते पुढील एप्रिल महिन्यात निवृत्त होणार आहेत. पण दुर्गापूजेनंतरच खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. खासदारांच्या या भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माकपसह विरोधी पक्षांनी केली असली तरी, सुमित्रा महाजन यांनी त्याला प्रतिसाद दिला नसल्याचे समजते.

स्थानिक भाषेचे महत्त्वहिमाचल प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी नवीन योजना आखली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे राज्यांच्या निवडणुकांमध्ये त्या त्या राज्यात पाळेमुळे असलेल्या व स्थानिक भाषा बोलू शकणाºया नेत्यांनाच प्रचारासाठी पाठवायची त्यांची योजना आहे. सध्या हिमाचल प्रदेशाबाहेर राहत असलेल्या पण हिमाचली भाषा बोलू शकणाºया २०० नेत्यांची त्यांनी प्रचारासाठी निवड केली आहे. त्या राज्याशी परिचय नसलेल्या व्यक्तीला त्या राज्यात प्रचारासाठी पाठविले जाणार नाही. त्याचप्रमाणे कर्नाटकबाहेरच्या पण कन्नड भाषा बोलू शकत असलेल्या ४०० व्यक्तींना प्रचारासाठी कर्नाटकात पाठविले जाणार आहे. गुजरातसाठी गुजराती भाषेत उत्तमरीतीने बोलू शकणाºया ८०० जणांची निवड करण्यात आली आहे.

भाजपा खासदारांवरील संकट तूर्त टळलेभाजपाचे सध्या खासदार असलेले अनेक लोक हे पुरेशा योग्यतेचे नसल्यामुळे, आगामी २०१९ च्या निवडणुकीत किमान ३० ते ४० टक्के खासदारांना पुन्हा तिकीट दिले जाणार नाही, असे भाजपा नेतृत्वाने सूचित केले होते. त्यापैकी काहींवर पंतप्रधानांनी कडक शब्दात टीकाही केली होती. त्यामुळे किमान ७०-८० खासदारांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल व त्यामुळे त्यांनी अन्य पदांचा शोध घ्यावा, असे स्पष्ट दिसत होते. काही खासदारांना याची कल्पना आली होती. त्यापैकी नाना पटोले, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद आणि अन्य खासदारांनी सरकारच्या धोरणावर उघड टीका करायला सुरुवात केली होती. पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष अमित शहा हे २४ तास काम करणारे असल्याने आपण त्यांच्याप्रमाणे काम करू शकणार नाही, असे अनेकांना वाटू लागले आहे. त्यांना तिकीट देण्याचे काम तेव्हाचे अध्यक्ष राजनाथसिंग यांनी केले होते. त्यात अमित शहा व नरेंद्र मोदी यांची कोणतीच भूमिका नव्हती. तेव्हा त्या दोघांना नव्या लोकसभेत स्वत:ची टीम असावी, असे वाटते. पण का कोणास ठाऊक, या भूमिकेत बदल होत असून, खासदारांची टर उडविली जाण्याचे दिवस संपले असून खासदारांनी आपल्या तिकिटाची चिंता बाळगू नये, असे संकेत त्यांना मिळाले आहेत. लोकसभेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या मध्यात जेव्हा सुरू होईल तेव्हा नेतृत्वाच्या खासदारांविषयीच्या दृष्टिकोनात कमालीचे परिवर्तन झालेले पाहावयास मिळू शकते!

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीchinaचीन