पं. नेहरू- इतिहास घडवणारे राष्ट्रपुरुष

By Admin | Updated: November 13, 2014 23:41 IST2014-11-13T23:41:28+5:302014-11-13T23:41:28+5:30

जवाहरलाल नेहरूंना प्रथम पाहिले, तेव्हा मी आठवी- नववीत शिकत असेन. ही गोष्ट 1955-56 ची आहे. तेव्हा मी दिल्लीला गेलो होतो. कानावर आले, की बाजूलाच नेहरू येत आहेत.

Pt Nehru - The nation's leader who created history | पं. नेहरू- इतिहास घडवणारे राष्ट्रपुरुष

पं. नेहरू- इतिहास घडवणारे राष्ट्रपुरुष

जवाहरलाल नेहरूंना प्रथम पाहिले, तेव्हा मी  आठवी- नववीत शिकत असेन. ही गोष्ट 1955-56 ची आहे. तेव्हा मी दिल्लीला गेलो होतो. कानावर आले, की बाजूलाच नेहरू येत आहेत. बाजूला म्हणजे तालकटोरा स्टेडियम. नेहरूंना पाहण्यासाठी मीही  तिथे गेलो. गर्दीत मागच्या बाजूला उभा होतो.   नेहरूंचे भाषण सुरू होते, तेव्हा मी उभा होतो, त्या भागातून लोकांचा आरडाओरडा सुरू झाला.  नेहरूंचा आवाज त्यांच्यार्पयत पोहोचत नव्हता. पुढे गोंगाट वाढला. नेहरूंनी भाषण थांबवले. काय होतंय, ते त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या चेह:यावर राग स्पष्ट झळकत होता. त्यांचा लाल चेहरा लालबुंद झाला होता. ध्वनिक्षेपण व्यवस्था पुरेशी नव्हती. नेहरूंनी झटक्याने माईक बाजूला सारला आणि व्यासपीठावरून भरभर उतरत ते खाली आले. जिथे गोंगाट सुरू होता, तिथे जाऊन पोहोचले. आता मी त्यांना जवळून पाहत होतो. लेाकांमध्ये येताच त्यांच्यात एकदम बदल झाला. राग पळाला.   आरडाओरडा करणा:यांपैकी एकाच्या खांद्यावर हात ठेवून नेहरू त्याला म्हणाले, ‘‘माझा आवाज   तुमच्यार्पयत पोहोचत नाही का?’’ सारे लोक सुन्न.  नेहरूंकडे नुसते पाहत राहिले, माङयासारखे.  स्मितहास्य करीत नेहरू नंतर आले तसे व्यासपीठावर गेले. माईक पकडून बोलू लागले; जणू काही घडलेच नव्हते. पण, बरेच काही घडले होते. त्या दिवशी मी नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाची जादू पाहिली होती. त्यांचा संताप, त्यांचे हास्य, त्यांचे एका श्रोत्याच्या खांद्यावर हात ठेवणो.. त्या भाषणात नंतर कुणी आरडाओरडा केला नाही. आधीएवढेच कमी ऐकू येत होते. फरक त्या जादूचा होता; जी नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात होती. 
1929मध्ये नेहरू पहिल्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष   बनले, तेव्हा ही जादू पाहायला मिळाली होती. नेहरूंनी तेव्हा संपूर्ण स्वातंत्र्याचा नारा दिला होता. तरुण नेहरूंनी तेव्हा देशातील तरुणांना शपथ देवविली होती, ‘पूर्ण स्वातंत्र्य घ्यायचे आहे, पूर्ण स्वातंत्र्य घेऊ.’ 1947मध्ये स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशाने  नेहरूंना पहिले पंतप्रधान बनवले. पुढे 1955मध्ये अवाडी काँग्रेसच्या अधिवेशनात नेहरूंनी समाजवादी समाजरचनेचे लक्ष्य देशापुढे ठेवले. हा प्रस्ताव ठेवताना नेहरू म्हणाले होते. ‘‘ समाजवादी समाज हे भविष्यातील आमच्या समोरचे आव्हान आहे आणि ते आम्हाला स्वीकारायचे आहे.’’
नेहरू आयुष्यभर या आव्हानाशी झुंजले.   कल्याणकारी राज्य आणि समाजवादी समाजाची उभारणी करण्यात त्यांनी स्वत:चे आयुष्य झोकून दिले. रवींद्रनाथ टागोर यांनी नेहरूंमध्ये एक वसंत ऋतू पाहिला होता, तर गांधीजींना त्यांच्यात आपला वारस  सापडला होता. स्वतंत्र भारताला तर त्यांच्या आवाजात आपल्या आशाआकांक्षांची पूर्ती दिसू लागली होती.  1959मध्ये नेहरूंनी  जनतेला एक  15 सूत्री कार्यक्रम दिला. त्यांना देश आणि देशवासीयांबद्दल काय वाटायचे, त्याचा  हा कार्यक्रम म्हणजे आरसा आहे. या 15 सूत्री आवाहनात नेहरूंनी म्हटले होते.. राजकीय मतभेद असले, तरी देशाचे ऐक्य आणि भल्यासाठी सर्वानी एकजूट असले पाहिजे. देशाचा विचार केला पाहिजे. गरीब-श्रीमंत,  हा वरच्या वर्गातला-तो खालच्या वर्गातला, असा विचार न करता देशहित सर्वश्रेष्ठ मानणारा नागरिक बनण्याचा संकल्प सा:यांनी घेतला पाहिजे.  ग्रामोद्योग आणि कुटिरोद्योगाला  प्रोत्साहन मिळाले पाहिजे. खादीचा वापर केला पाहिजे. नेहरूंना बालकांविषयी खूप जिव्हाळा होता. समाजाने बालकांना फुलासारखे जपावे, असे त्यांना वाटायचे. या 15 सूत्री कार्यक्रमात नेहरूंनी व्यसनमुक्तीवर भर दिला आहे. भ्रष्टाचार निमरूलनाच्या गप्पा सध्या सुरू आहेत; पण नेहरूंनी हा रोग आधीच ओळखला होता. भ्रष्टाचारमुक्तीचे माहात्म्य त्यांनी त्या काळात वर्णिले आहे. मोदीजी आता स्वच्छतेवर भर देत आहेत. नेहरूंनी गाव, घर, रस्ते स्वच्छतेचा मंत्र 54 वर्षापूर्वीच दिला. पंचवार्षिक योजनेंतर्गत होणा:या कामांमध्ये जनतेने सहकार्य दिले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. विधायक कामांसाठी शारीरिक परिश्रमाचे महत्त्वही त्यांनी सांगितले. हा देशाला विकास आणि भरभराटीच्या दिशेने नेणारा महामंत्र आहे. आपला देश याच मार्गाने गेला आणि आज आपण ज्या उंचीवर पोहोचलो आहोत, ती नेहरूंच्याच विचारांची देणगी आहे. भाक्रा-नांगलसारखे मोठे प्रकल्प नेहरूंच्या काळात सुरू झाले. पंचवार्षिक योजनांचा त्यांनी पाया घातला. बदलत्या जगात नेहरूंचे विचार कालबाह्य झाले, असे कुणी समजत असेल, तर ते चुकीचे आहे. नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेल्या भरारीमुळे जगाला भारताची दखल घ्यावी लागली. 15 ऑगस्ट 1947 रोजी केलेल्या ऐतिहासिक भाषणात नेहरूंनी ‘नियतीशी करारा’ची भाषा केली. त्यांचे हे विधान भारतापुरतेच मर्यादित नव्हते. दिनदलितांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा तो संकल्प होता. राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी जगात कुठेही होणा:या संघर्षात आपण सहभागी होऊ, अशी ग्वाही ते देत. आयुष्यभर ते संघर्ष करीत राहिले.
स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान होते; पण त्यांना विश्व-नागरिकाच्याच भूमिकेत वावरणो आवडे.  ते राजकारणी नव्हते, राजनेता होते. राजनेता सत्तेचे राजकारण करीत नाही. मानवी कल्याणाचे  माध्यम म्हणून तो राजकारणाकडे पाहतो. याचा अर्थ असा नाही, की नेहरूंमध्ये काहीच दोष नव्हते  किंवा त्यांच्याकडून कधी चुका झाल्या नाहीत. आपल्या देशात असेही लोक आहेत, की जे आजच्या समस्यांसाठी नेहरूंना जबाबदार मानतात. त्यांच्या बोलण्यात काही तथ्य असेलही; पण एक गोष्ट तेवढीच खरी आहे, की देशाच्या भल्यासाठी योग्य वाटले ते जीव तोडून त्यांनी केले. नेहरू यापेक्षा अधिक चांगले काम करू शकले असते; पण म्हणून त्यांनी केलेल्या कामांचे महत्त्व कमी होत नाही. नेहरूंनी भावी भारताचा पाया रचला. नागरिकांना मूलभूत अधिकार, लोकशाही समाजाची संकल्पना या गोष्टींसाठी आपला देश सदैव नेहरूंचा ऋणी राहील. 
सुरुवातीला मी नेहरूंच्या जादूची चर्चा केली; पण ते हातसफाई दाखवणारे जादूगार नव्हते.  संमोहन कलाही त्यांना अवगत नव्हती. मोकळे हृदय आणि त्यात बसलेले बालपण ही त्यांची शक्ती होती. नेहरू एक संवेदनशील पुढारी होते. एका प्रश्नाच्या उत्तरात नेहरू म्हणाले होते, ‘‘मला 36 कोटी समस्यांशी झगडायचे आहे.’’ त्या वेळी देशाची लोकसंख्या 36 कोटी होती. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या समस्येला देशाची समस्या मानली पाहिजे. समस्यांमध्ये माणुसकी शोधणारा हा विचार त्यांच्या समग्र राजकीय व्यक्तिमत्त्वाचे सार आहे. ‘गरिबातल्या गरीब माणसाचे हित पाहिले पाहिजे’, असे महात्मा गांधी म्हणत. नेहरूंनी हे तत्त्व आचरणात आणण्यासाठी धडपड केली. अशाच प्रय}ांतून  कुणी नेता इतिहास घडवतो. तसाच इतिहास नेहरूंनी घडवला. 
 
विश्वनाथ  सचदेव
 ज्येष्ठ स्तंभलेखक

 

Web Title: Pt Nehru - The nation's leader who created history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.