शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीचे रक्षण आणि जीओइंजिनीअरिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 05:42 IST

ज्या वेगाने कार्बनचे जागतिक उत्सर्जन केले जात आहे, ते पाहता जागतिक वातावरणातील संचित कार्बन डाय आॅक्साईडचे आकारमान एक लाख कोटी टन एवढे होईल. यामुळे जागतिक सरासरी तापमान अंशाने वाढले तर पुढील तापमान वाढ आपोआप होणार आहे.

- शिरीष मेढी(पर्यावरणतज्ज्ञ)ज्या वेगाने कार्बनचे जागतिक उत्सर्जन केले जात आहे, ते पाहता जागतिक वातावरणातील संचित कार्बन डाय आॅक्साईडचे आकारमान एक लाख कोटी टन एवढे होईल. यामुळे जागतिक सरासरी तापमान अंशाने वाढले तर पुढील तापमान वाढ आपोआप होणार आहे. आणि तेव्हा हवामान गुणात्मकदृष्ट्या वेगळे असेल. आत्ताची जागतिक राजकीय व्यवस्था कार्बन उत्सर्जन थांबवू शकत नसल्यामुळे, तांत्रिक मार्गाचा उपयोग करून वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या तांत्रिक उपायांना जिओइंजिनीअरिंग असे म्हटले जाते. हे जिओइंजिनीअरिंगचे प्रयोग केवळ बिल गेट्स, रिचर्ड ब्रँनसन यांसारखे लक्षकोट्यधीश करीत नसून; काही पर्यावरणवादी संस्था, बौद्धिकतेचा आव आणणाऱ्या ब्रेकथ्रू संस्था, क्लायमेट कोड रेड संस्था आणि एक्साँन, शेल व अन्य तेल उद्योग आणि अमेरिका, यूके, रशिया व चीन येथील सरकारे करीत आहेत.जर वातावरणातील कार्बनचे प्रमाण ४५० पीपीएम एवढे होऊ द्यायचे नसेल व ते गेल्या हजारो वर्षांतील प्रमाणासमान आणायचे (म्हणजे ३५० पीपीएम) असेल तर हवामान वैज्ञानिक जेम्स हँनसेन यांनी सुचविल्याप्रमाणे वातावरणातून कार्बन बाहेर काढून घेणे आवश्यक आहे व हे करण्यासाठी तंत्रज्ञान वापरावे असे वरील व्यक्ती व संस्था सांगत आहेत. असे शक्य झाले तर काही डावे विचारवंत सुचवित असलेला उत्पादन व उपभोग यांवर जनतेचे नियंत्रण आणून कार्बन उत्सर्जनात कपात करण्याची गरज पडणार नाही. दुसºया शब्दांत ज्यास ‘पर्यावरणवादी - समाजवादी’ क्रांती म्हणतात ती टाळून अंतहीन भांडवल संचय प्रक्रिया चालू ठेवणे शक्य होईल. रशियन वैज्ञानिक मिखाईल बुडिको यांनी जगात हरित ग्रह वायुंमुळे होणाºया हवामानातील बदलांबाबत १९६० साली सर्वप्रथम इशारा दिला होता. अर्थात मानवांमुळे होणाºया हवामान बदलांबाबत जगाला याआधीच जाणीव झाली होती. पण उत्तर ध्रुवावरील बर्फ वितळणे, सूर्यापासून येणाºया ऊर्जेला वरच्या वातावरणात अडकविल्यामुळे वाढणारे तापमान या बाबी प्रथमच ज्ञात झाल्या होत्या. बुडिको यांनी १९७४ साली उंच उडणाºया विमानांचा वापर करून वातावरणात सल्फरची पावडर सोडून तापमानावर नियंत्रण आणण्याचा उपाय सुचविला होता. मात्र १९७७ मध्ये इटालियन पदार्थशास्रज्ञ सिझर मर्चेट्टी यांनी जेव्हा विद्युतनिर्मिती करणाºया उद्योगातील उत्सर्जित होणारा कार्बन वायू तेथेच पकडून पाइपवाटे तो समुद्रांच्या तळाशी सोडण्याचा उपाय सुचविला तेव्हा जिओइंजिनीअरिंग हा शब्द उदयास आला.बुडिको यांनी सूचित केलेल्या मार्गाद्वारे सल्फर कणांद्वारे सूर्यकिरणांना अंशत: वरच्या स्तरातूनच परावर्तित करण्याच्या पद्धतीस आता स्टँटोस्फेरिक एअरोसोल इंजेक्शन या नावाने ओळखले जाते. या पद्धतीला सोलार रेडिएशन मॅनेजमेंट पद्धत म्हटले जाते. मर्चेट्टी यांनी सुचविलेल्या पद्धतीत कार्बन जेथे उत्सर्जित होतो तेथेच त्यास पकडून समुद्राच्या तळाशी सोडण्याच्या पद्धतीला कार्बन डाय आॅक्साईड रिमुव्हल पद्धत म्हणतात. यात मरिन क्लाउड ब्राइटनिंग हा उपाय समाविष्ट आहे. या उपायात साधारणपणे १५०० जहाजे सेटेलाईटच्या मदतीने समुद्राच्या पाण्याचे सूक्ष्म कण वातावरणात सोडतात व त्या पाण्याची वाफ झाली की मिठाच्या चमकदार कणांद्वारे काही सूर्यकिरणांना परावर्तित करायचे असे उद्दिष्ट आहे. पण एअरोसोल्स इंजेक्शने व मरिन क्लाऊड ब्राइटनिंग या दोन्ही उपायांवर टीका केली जाते की या पद्धतीमुळे हवामान बदलांना चालना मिळेल व हे उपाय म्हणजे हवामान बदलांच्या कारणांना हात न लावता, फक्त वरवरची मलमपट्टी करणे आहे. तसेच या उपायांमुळे पाणी चक्रावर अनपेक्षित परिणाम होतील व ग्रहावरील वाळवंटीकरण अधिकच वाढू शकेल. तसेच भारतीय पर्जन्य व्यवस्था संकटग्रस्त होऊ शकेल.अजूनही ओझोनचा विनाश, अ‍ॅसिडचा पाऊस यांसारखे अनेक धोके या पद्धतीमुळे संभवतात. तसेच असे स्टँटोस्फेरिक उपाय दरवर्षी पुन्हा पुन्हा करावे लागतील. सोलार रेडिएशन मॅनेजमेंट पद्धतीमुळे समुद्राचे आम्लीकरण वाढतच जाईल, कारण कार्बनचे वातावरणातील प्रमाण कमी केले जात नाही. पहिल्या सुचविलेल्या उपायात समुद्रांत लोखंडाच्या कणांचे खत टाकायचे व त्याद्वारे अन्नमालिकेतील प्राथमिक घटक असणाºया फायटोप्लँक्टॉनची संख्यात्मक वाढ करायची व त्याद्वारे वातावरणातील कार्बन पाण्यात शोषून घ्यायचा. यासंदर्भात अनेक प्रयोग करण्यात आले, पण अनंत अडचणी निर्माण झाल्या. छोट्या माशांपासून ते व्हेलसारख्या मोठ्या माशांपर्यंत पर्यावरणीय दुष्परिणाम आढळून आले. या लोखंडाच्या कणांमुळे समुद्रातील काही भाग अधिक हरित झाले, पण अनेक विभागांतील नायट्रेट, पोटॅश, फॉस्फेट व सिलीका यांसारखे पोषक घटक नाहीसे झाले व तेथील जीवन संपुष्टात आले.यात काही संशय नाही की हवामानातील बदल रोखण्यासाठी जगातील कार्बन उत्सर्जन ताबडतोबीने बंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी फोसिल इंधनाचा वापर मानवजातीने ताबडतोबीने बंद करणे आवश्यक आहे. आणि हे मानवांस सहज शक्य होऊ शकेल. सगळ्यांना उपलब्ध टिकाऊ व पुनर्वापर होणाºया ऊर्जेचाच वापर करायचा असा निर्धार करावा लागेल. याचबरोबर संसाधनांचा गैरवापर थांबवून जीवनावश्यक वस्तू व सेवांचीच निर्मिती केली जाईल, असे पाहावे लागेल.

टॅग्स :Earthपृथ्वीenvironmentवातावरण