शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश

By admin | Published: March 16, 2017 1:06 AM

प्रकल्पग्रस्तांना सुखाने जगता येत नसेल तर शासन व प्रशासनालाही सुखाने राहण्याचा अधिकार नाही, अशी घोषणा देत नवी मुंबईतील हजारो भूमिपुत्रांनी कोकणभवनवर धडक दिली.

प्रकल्पग्रस्तांना सुखाने जगता येत नसेल तर शासन व प्रशासनालाही सुखाने राहण्याचा अधिकार नाही, अशी घोषणा देत नवी मुंबईतील हजारो भूमिपुत्रांनी कोकणभवनवर धडक दिली. पाच दशके अन्याय सहन केला. प्रश्न सोडविण्याऐवजी कोरडी आश्वासनेच पदरात पडली. पण आता सर्व प्रश्न सुटेपर्यंत माघार नाहीच असा इशारा देत भूमिपुत्रांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. सिडको व एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबईत आंदोलन सुरू केले असले तरी त्यानिमित्ताने सर्वच प्रकल्पबाधीतांची व्यथाच समोर आली आहे. सरकार आश्वासन देते; पण त्याची पूर्तता करत नसल्याने आधी पुनर्वसन व नंतरच प्रकल्प अशी भूमिका शेतकरी घेऊ लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये जमीन संपादनाअभावी देशातील तब्बल ८०४ प्रकल्प रखडले असून, त्यामध्ये सर्वाधिक १२५ प्रकल्प महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील सर्वच सिंचन प्रकल्प रखडले आहेत. हिंजवडी, तळेगाव, रांजणगाव, कार्लामधील आयटी पार्क व एमआयडीसी प्रकल्प रखडले आहेत. गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होऊ शकत नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी झालेल्या विरोधामुळे तब्बल १० वर्ष हा प्रकल्प उशिरा सुरू होत आहे. सध्या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाबाबतही भूमिपुत्रांनी आंदोलनाची हाक दिली आहे. धरण, महामार्ग, विमानतळ, एमआयडीसी व रेल्वेसारख्या प्रकल्पांसाठी सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करते. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन केले जाते; पण त्यांचे पुनर्वसन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नवी मुंबईमध्ये १९६५ मध्ये एमआयडीसी व १९७० मध्ये शहर वसविण्यासाठी शंभर टक्के जमिनीचे संपादन केले. पण पाच दशकानंतरही पुनर्वसन झाले नसल्याने हजारो प्रकल्पग्रस्त रस्त्यावर आले आहेत. शासनाने पुनर्वसनास प्राधान्य दिले नाही तर भविष्यातील एकही महत्वाचा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार नाही व त्यामुळे महाराष्ट्र विकासामध्ये पिछाडीवर जाण्याची भीती व्यक्त होत असून, यातून हा मूलभूत प्रश्न शासन कसा हाताळते यावर राज्याच्या विकासाचे भवितव्य अवलंबून आहे.