धोकादायक चक्रीवादळांची पूर्वसूचना व नवतंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 04:48 AM2019-05-30T04:48:14+5:302019-05-30T04:48:44+5:30

राजकीय त्सुनामी आपण सर्वांनी नुकताच अनुभवला. त्याचे अंदाज अनेकानी वर्तविले.

Precautions and disintegration of dangerous cyclones | धोकादायक चक्रीवादळांची पूर्वसूचना व नवतंत्रज्ञान

धोकादायक चक्रीवादळांची पूर्वसूचना व नवतंत्रज्ञान

Next

- डॉ. दीपक शिकारपूर
राजकीय त्सुनामी आपण सर्वांनी नुकताच अनुभवला. त्याचे अंदाज अनेकानी वर्तविले. त्यात काही प्रमाणात तफावत होती, पण काही दिवसांपूर्वी ‘फणी’ हे चक्रीवादळ ओरिसा, बंगालच्या किनारपट्टीवर धडकले. अतिशय माफक हानी झाली. याचे पूर्ण श्रेय नियोजन व नवतंत्रज्ञानाला द्यायला हवे. संगणकीय प्रणालींच्या जोडीला उपग्रहीय तंत्रज्ञान, विविध प्रकारची छायाचित्रे असल्याने, माहितीचे विविध पैलू हाती येऊन त्यांचा अभ्यासही चटकन करता येतो व इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या मदतीने हे अंदाज सर्वत्र कळूही शकतात. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकलेले ‘फणी’ चक्रीवादळ. त्याची तीव्रता खूप असूनही, पूर्वी आलेल्या वादळांच्या तुलनेत, आपली जीवित आणि वित्तहानी कमी झाली. गेल्या वर्षीदेखील नवतंत्रज्ञानाच्या योग्य वापराने वादळाची सूचना सर्वत्र पोचविणे शक्य झाल्याने नुकसानीचा आकडा कमी होता. २00८ साली आलेल्या नर्गिस चक्र ीवादळामुळे तर तब्बल एक लाखापेक्षा जास्त लोक मरण पावले होते.
आता एक प्रश्न साहजिकच काहींच्या मनात येईल की, उपग्रहीय प्रतिमा उर्फ सॅटेलाइट इमेजेस यापूर्वीही वापरल्या जात होत्याच, मग नवतंत्रज्ञान त्याहून वेगळे काय आहे आणि ते अधिक भरवशाचे कसे ठरते? वर्मोन दोराक या अभ्यासकाने शोधून जवळजवळ परिपूर्णतेकडे नेलेल्या ‘दोराक टेक्निक’चा वापर जगभर केला जातो. भूकंपाप्रमाणेच चक्रीवादळाने होणारे नुकसान त्याच्या तीव्रतेवर म्हणजेच त्यातून निर्माण होणाºया वाऱ्यांचा वेग आणि पडणाºया पावसाचे प्रमाण यावर अवलंबून असते. डिप्रेशन म्हणजेच कमी दाबाच्या पट्ट्यात जमलेल्या ढगांची उंची, तेथील दाब व तापमान यांवरही बरेचसे परिणाम अवलंबून असतात. (खुद्द या वादळांचेही सायक्लोन, हरिकेन, टायफून असे विविध प्रकार असतात). उपग्रहांकडून मिळणाºया प्रतिमा आणि छायाचित्रे यांचा गाढा अभ्यास करून दोराकने वादळांचे त्यांच्या दृश्यरूपावरून वर्गीकरण केले. यासाठी उपारुण किरणतंत्राचा (इन्फ्रारेड रेज) वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. प्रत्येक वादळाच्या ‘चेहरेपट्टी’वरून त्याची तीव्रता पुष्कळच अचूकतेने सांगता येऊ लागली.


तरीदेखील असे जाणवू लागले होते की, या तंत्राने संबंधित वादळाच्या तीव्रतेचे दोन अंदाज मिळतात आणि ते परस्परांहून बºयापैकी वेगळे असतात. म्हणजेच वादळाची तीव्रता अपेक्षित अचूकतेने समजत नाही. यानंतर हे अंदाज अचूक बनवण्यासाठी अर्थातच प्रयत्न सुरू राहिले. इथेच तंत्रज्ञान कामाला येऊ लागले. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला क्लाउड कॉँप्यूटिंगच्या विलक्षण प्रक्रिया - क्षमतेची जोड देऊन, संग्रहात असलेल्या दोन लाखांपेक्षाही अधिक छायाचित्रांचा काही क्षणांतच अभ्यास करून योग्य निष्कर्ष मिळू शकतात. यासाठी कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. वादळापूर्वी त्या भागात मोठ्या प्रमाणात ढगांचे थरावर थर जमा होतात.

प्रत्येक थरातील ढगांच्या ‘पॅटर्न’चा अभ्यास करून पडू शकणाºया पावसाचे प्रमाण संगणकांद्वारे ठरविले जाते. यामध्ये इमेज रेकिग्नशन तंत्राचा वापर केला जातो. यासाठी वापरलेले तंत्रज्ञानही मुद्दामच ‘ओपन सोर्स’ ठेवण्यात आले आहे.
उष्ण किटबंधीय वादळांची तीव्रता आणखीही एका बाबीवर अवलंबून असते. समुद्राच्या पृष्ठभागावरून वातावरणात सोडली जाणारी सुप्त उष्णता. हिला ट्रॉपिकल सायक्लोन हीट पोटेन्शिअल असे नाव आहे. हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील वादळांच्या संदर्भात या औष्णिक शक्तीला महत्त्व आहे. सन १९९७ पासून २00७ दरम्यान घेतलेल्या २५ हजारांपेक्षाही अधिक तापमान-नोंदी प्रकारच्या संगणकीय प्रणालीला पुरविल्या गेल्या.
याशिवाय समुद्रपृष्ठावर २६ डिग्री सेल्सियस असे एकसारखे तापमान असलेल्या बिंदूंना जोडणाºया रेषा (आयसोथर्म) काढून त्यांचाही अभ्यास संगणकांकडून करवून घेतला गेला. विविध प्रकारे विश्लेषण आणि त्यावरून वर्तविलेल्या अंदाजांच्या अचूकतेची तुलना केल्यानंतर, पूर्वीच्या पद्धतींपेक्षा आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क श्रेष्ठ आणि भरवशाचे असल्याचे निर्विवादपणे सिद्ध झाले. हवामानाचे अंदाज अचूकतेने मिळू लागल्याने शेतकºयांचा तर फायदा होतोच, शिवाय अतिवृष्टी, संततधार, वादळे अशा बाबींची पूर्वसूचना वेळेत म्हणजे निदान दोनचार दिवस आधी मिळाल्याने मालमत्तेचे नुकसान टाळता येते. मुख्य म्हणजे आपत्तीने बाधित भागातील अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलविता येऊन प्राणहानी खूपच कमी करता येते.
(संगणक साक्षरता प्रसारक)

Web Title: Precautions and disintegration of dangerous cyclones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.