शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

अजितदादांच्या कपाळावर आठ्या पसरल्या अन् फडणवीसांनीही हळूच आगीत तेल ओतलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 07:23 IST

इंद्र महाराजांनी फर्मान सोडलं, ‘तीन पक्षांचं सरकार चालविणाऱ्यांना चार चाकाची एसटी पळवता येत नसेल, तर अवघड आहे, मुनीराज ! ताबडतोब भूतलावर जा...’

सचिन जवळकोटे

निवासी संपादक, लोकमत, सोलापूर

भूतलावरून बायकांचा आवाज थेट इंद्र दरबारापर्यंत पोहोचला. इंद्र महाराजांनी चमकून विचारलं, ‘स्त्रीवर्गाचा आवाज एवढा का, बरे मोठा झाला?’, तेव्हा नारदमुनी म्हणाले, ‘ हा आवाज काही घरातील सासुरवाशिणींचा आहे. बेडरूममधे त्या पतीदेवाला काकुळतीनं विचारतायत, अहो, एसटीचा संप कधी मिटणार. सर्व कर्मचारी कामावर कधी रुजू होणार?’  ‘का.. त्यांना  संक्रांतीला माहेरी जायचंय का ?’, - एकानं उत्सुकतेनं विचारलं. तेव्हा गालातल्या गालात हसत मुनी म्हणाले, ‘नाही होss दिवाळीला माहेरी आलेल्या नणंदांसाठी त्या तसं विचारताहेत.’ 

- दरबार अवाक् झाला. इंद्र महाराजांनी लगेच फर्मान सोडलं, ‘तीन पक्षांचं सरकार चालविणाऱ्यांना चार चाकाची एसटी पळवता येत नसेल तर, अवघड आहे हे, मुनीराज ! ताबडतोब भूतलावर जा. तिथली हालहवाल कळवा.’ नारद मुनी थेट बस स्टँडवरच पोहोचले. प्लॅटफॉर्मवर केवळ दोन-चारच गाड्या कशाबशा चालू अवस्थेत होत्या. तिथं चक्क सारे नेते एकत्र जमलेले. परबांचे अनिलभाऊ समोरच्या थोरले काका बारामतीकरांना विनंती करत होते, ‘काहीही करून एसटी शंभर टक्के सुरू व्हायला हवी. वाटल्यास सुरुवातीला आपणच चालवू. दोन-चार खेपा मारल्यावर डिझेलपुरते तरी का, होईना पैसे जमतील.’ 

थोरल्या काकांनी खुणावताच रौतांच्या संजयांनी गाणं गुणगुणत स्वतः भोवती छानपैकी गिरकी घेतली. मग, हाळी देत लगेच शिट्टी फुंकली, ‘चला.. मुंबई मुंबईss’ हे पाहताच अजितदादांच्या कपाळावर आठ्या पसरल्या. फडणवीसांनीही हळूच आगीत तेल ओतलं, ‘आजकाल तुमच्यापेक्षा रौतांशीच बोलून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतात म्हणे तुमचे काका.’ मात्र अलीकडच्या काळात स्वतःला खूप बदलवून घेतलेल्या दादांनी लगेच विषयही बदलला, ‘चला बसा पटकन एसटीत. मी कुणाची वाट नाही पाहणार,’ एवढ्यात साताऱ्याच्या शशिकांतनी थोरल्या काकांना विनंती केली, ‘मला आमच्या बँकेपर्यंत तरी व्यवस्थित पोहोचवा.’ हे ऐकताच पाठीमागं उभारलेल्या तीन राजेंनी एकमेकांना खुणावलं. एक फलटणचे रामराजे. बाकीचे दोन सातारचे राजे. त्यांनी गोड-गोड बोलून शिंदेंना बाजूला नेलं.. अन् त्यांचा हळूच ‘कार्यक्रम करेक्ट’ करून टाकला. 

खूश झालेल्या चंद्रकांतदादांनी चॉकलेटचा अख्खा डबा सर्वांना वाटला. मात्र काका खूप हुशार. त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंची सीट दुसऱ्यालाच देऊन टाकली. हिशोब फिट्टमफाट करुन टाकला. जळगावच्या रोहिणीताईंनी मात्र बसचा दरवाजा उघडला. घाईघाईनं समोरची सीट पकडली. ‘मला बँकेचा स्टॉप मिळाला गं बाई.’ असं त्या म्हणताच अस्वस्थ गिरीशभाऊ पुटपुटले, ‘मला खुर्ची मिळत नसेल तर, मग मी उभारणारच नाही. आमचा बहिष्कार.’ चंद्रकांतदादांनी वेगळंच खुसपट काढलं, ‘मी दरवाजाजवळ बसणार. समजा, बस कुठेतरी दरीत कोसळली तर, लगेच उडी मारायला बरे.’ ठाण्याच्या एकनाथभाईंनी मात्र बसची चावी स्वतःच्या ताब्यात घेत टोला लगावला, ‘कोसळायला-बिसळायला ते काय तुमचं पहाटेचं सरकार वाटलं की, काय ? चला.. उद्धव नाहीत तेव्हा त्यांच्या अपरोक्ष बस मीच चालवणार.’ अनेकांनी सहेतुकपणे नार्वेकरांकडं बघितलं; तर, ते ‘बालाजी दर्शना’साठी दुसरी बस हुडकण्यात व्यस्त ! 

गळ्यात मफलर लपेटत छगनराव मध्येच साहित्यिक भाषेत बोलले, ‘मी पूर्वीपासून तुमच्यासोबतच असतो तर, नक्की मीही ड्रायव्हर बनलो असतो.’ झालं. बसचं स्टेअरिंग कुणाच्या हातात, यावर खल सुरू झाला. वाद वाढू लागला, तेव्हा थोरल्या काकांनी शांतपणे साऱ्यांना सुनावलं, ‘उगाच गोंधळ घालू नका. नसत्या भ्रमातही राहू नका. गाडी कोणीही चालवा पण, पाठीमागची घंटी माझ्याच ताब्यात. टिंग टिंग.’ 

sachin.javalkote@lokmat.com

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस