शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

नेत्यांचा पॉलिटिकल बाजार !

By सचिन जवळकोटे | Published: April 23, 2023 11:42 AM

लगाव बत्ती..

- सचिन जवळकोटे

शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळावा यासाठी कधी काळी सुरू झालेल्या यार्डात सध्या नेत्यांची सुगी बहराला आलेली; कारण भावी आमदारकीची भरगच्च तिजोरी यार्डात लपल्याचा शोध या ‘खादी’वाल्यांना लागलेला. प्रत्येक जण धान्याची गोणी मोजावीत तशी मतदारांची डोकी गिनू लागलेला. मतांच्या लिलावाची बोली लावण्यात रमलेला.. मग अशावेळी ‘बत्ती’ तर लागणारच. तीही जोरदार. लगाव बत्ती..

सध्या सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय ‘अक्कलकोट’ तालुक्यानं. टपरीवरच्या आकड्यापासून ते गटारीतल्या डुकरांपर्यंत भलतेसलते विषय ‘बाजार समिती’च्या इलेक्शनमध्ये चघळले जाऊ लागलेत. ‘अक्कलकोट’च्या यार्डात आजपावेतो सत्तेवर राहण्यासाठी ‘तडवळ’च्या ‘सिद्रामप्पां’नी कैक अचाट प्रयोग केलेले. वेळप्रसंगी ‘म्हेत्रे अण्णां’सोबतही इथं दिलजमाई झालेली. यंदा मात्र त्यांच्याविरोधात ‘जेऊर’चे पाटील अन् शिरवळचे ‘तानवडे’ यांनी ‘सिद्धारामअण्णां’च्या तालमीतून शड्डू ठोकलेला. ‘चपळगाव पाटलां’च्या दुकानातल्या सरकारी खताची पुडी गावोगावी सोडलेली. मात्र ‘सिद्रामप्पां’च्या मदतीला धावलेत चक्क ‘सचिनदादा’. त्यांनी म्हणे ‘अप्पां’ना स्पष्टपणे सांगितले, ‘तुम्ही माईक घ्या, मी पेट्या सोडतो’. लगाव बत्ती..

दुसरीकडं हेच ‘कल्याणशेट्टी’ मोठ्या ताकदीनं ‘दुधनी’च्या यार्डात उतरलेले. ‘म्हेत्रे फॅमिली’ला ‘दुधनी’तच अडकवून ठेवण्याची त्यांची खेळी अचूक ठरलेली. कधीकाळी ‘सिद्रामप्पां’नी दुधनी पट्ट्यात अनेक ‘दोन नंबरवाले’ सर्वत्र निर्माण करून ‘म्हेत्रें’च्या ‘मूळ बिझनेस’वर घाला घातलेला. आता याच ‘दुधनी’तल्या ‘एन्ट्री’ कमाईवर ‘दादां’नी वाद केलेला. कर्नाटकातून येणाऱ्या कापसाच्या हजारो ट्रक गाड्यांकडून वसूल केला जाणारा ‘एन्ट्री पास’ अक्कलकोटच्या नेते मंडळींनाही खुणावू लागलेला. मिळत नाही म्हटल्यावर डोळ्यात खुपू लागलेला.

गंमत म्हणजे शेतकऱ्यांच्या यार्डात ‘दोन नंबर’ धंद्यावरून राजकीय गदारोळ माजलेला. ‘शंकरपुत्रां’नी तर ‘दोन नंबरमध्ये माहीर असणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये’ असं ठणकावून सांगितल्यानं बिच्चारे अक्कलकोटवासीय भलतेच गोंधळात पडलेले. इथला धर्मात्मा नेमका कोण? लगाव बत्ती..

‘मोहोळ’मध्ये ‘उमेशदादा’ गट टोटल सरेंडर झाला की बाकीचा विरोधी गट नेहमीप्रमाणं ‘अनगरकरां’च्या निष्ठेला जागला, हे दोन्ही ‘पाटलां’नाच ठाऊक; कारण इथं इलेक्शन अर्ज भरतानाच निकालावर आलेले सारेच बिनविरोध ठरलेले. नाही तरी इथल्या यार्डात गहू, ज्वारीऐवजी टीव्ही, बाइकचीच खरेदी-विक्री जोरात. कदाचित ‘भावी कमळवासीय’ म्हणून ‘संजय-सतीश-सुनील’ त्रिकुटात ‘अनगरकरां’ना विरोध केला नसावा. नाही तरी पुढच्या आमदारकीला हातात कमळ धरून ‘अनगरकर’ हे आपल्याच तिकिटाची पंतांना शिफारस करतील, अशा भाबड्या आशेत ‘संजयअण्णां’चा एकेक दिवस जातोय म्हणे.

कुर्डूवाडीत सारेच नेते ‘यार्डाच्या मैदाना’त उतरलेले. या तालुक्यातल्या नेत्यांची एक खासियत. बहुतांश सारे ‘गाळे सम्राट’. कधी काळी ‘जामगाव’च्या ‘पाटलां’ना आपल्या गटात घेऊन ‘साठे फॅमिली’ला राजकीय धक्का देणाऱ्या ‘शिंदे’ बंधूंसाठी हे इलेक्शन किरकोळ वाटत असेल मात्र ‘संजू बाबा’ लय हुशार. रोज एक भ्रष्टाचाराचा नवा आरोप करून ‘शिंदे’ फॅमिलीची इमेज कशी क्रॅश करता येईल, यावर ‘सावंतां’चाही भलताच जोर. विशेष म्हणजे अख्ख्या गदारोळात ‘साठे’ घराण्याला कुणीच कुठं न विचारलेलं. कदाचित पूर्वी माढा गावच्या इलेक्शनमध्ये ‘मिनलताईं’नी शेवटच्या क्षणी बिनविरोधाला विरोध केल्याची सल ‘शिंदे फॅमिली’ला टोचत असावी. लगाव बत्ती..

‘अकलूज’मध्ये ‘रणजितदादां’च्या विरोधात साऱ्याच पक्षाचे नेते मोठ्या त्वेषानं एकवटलेत. ‘हात’वाले ‘धवल’ यांच्यासोबत ‘घड्याळ’वाले ‘जानकर’ अन् ‘कमळ’वाले ‘केके’ही दंड थोपटून मैदानात. अशात ‘निंबाळकर खासदारां’चा रोल अद्याप माळशिरस तालुक्याला न समजलेला. वरून ‘पंतां’चा आदेश आल्यास ते ‘रणजितदादां’सोबत जातील की ‘लाडके सहकारी’ असलेल्या ‘केके’साठी पडद्यामागूनच बारदाने फोडतील, हे कळेलच लवकर. तोपर्यंत लगाव बत्ती..

सांगोल्यात मात्र ‘मित्राचा मित्र शत्रू’ अन् ‘शत्रूचा मित्रही शत्रू’चा बनत चाललेला. मुंबईत ‘कमळ’ हुंगणारे ‘शहाजीबापू’ सांगोल्यात ‘दीपकआबां’च्या हातात ‘घड्याळ’ बांधायचे. आता हे कमी पडलं की काय म्हणून ‘देशमुखां’च्या दुकानात आपलं राजकीय ‘वजन’ चेक करायला निघालेले. मात्र एका ‘सचिन’नामक कार्यकर्त्यानं ‘एकनाथभाईं’च्या ‘शिंदे’ पॅटर्नची पुनरावृत्ती इथं घडविलेली. कैक दशकं सांगोल्यात आमदारकी टिकविणाऱ्या ‘देशमुखां’चे वारसदार यार्डात ‘कमळ-हात-घड्याळा’सोबत गेले असले तरी त्यांच्या विरोधात आडनाव बंधू नेत्यानं ‘गणपतआबां’च्या नावानं विरोधी पॅनल टाकलंय. जसं ‘एकनाथभाईं’च्या पार्टीला ‘बाळासाहेबां’चं नाव. वारसदार राहिले बाजूला, भलत्यांचीच निष्ठा चमकू लागलेली.

पंढरपूरचं यार्ड बेदाण्यासाठी प्रसिद्ध. लिलावाच्या वेळी मूठ-मूठभर बेदाणे खाली फेकून त्यावरही हक्क सांगणाऱ्या दलालांच्या धंद्यात भरमसाठ गल्ला गोळा करणारं यार्ड, म्हणून राज्यात चर्चिलं जाणारं. म्हणूनच ‘पंतां’च्या वाढदिनी ‘चांदीची ढाल अन् सोन्याचं ब्रेसलेट’ देण्यात इथलेच व्यापारी दानशूर. मशहूर पहाटेच्या अंधारात शेतकऱ्यांच्या //// भाजीचा लिलाव करण्यातही अग्रेसर. असो.

‘प्रशांतपंतां’च्या विरोधात ‘अभिजितआबा, भगीरथदास अन् कल्याणराव’ यांची रेस्ट हाऊसला गुप्त मीटिंगही झालेली. मात्र, ‘चंद्रभागा’च्या इलेक्शनमध्ये त्रास द्यायचा नाही, या ‘काळें’च्या अटीमुळं सारंच फिसकटलं. खरं तर इथं पंढरपूरच्या राजकारणाचं समीकरणही मांडलं गेलेलं. ‘भालकें’नी ‘पंढरपूर-मंगळवेढा’ लढवायची. ‘पाटलां’नी ‘माढा-पंढरपूर’ गाजवायची. ‘दिलीपबापूं’नी नगरपालिका हलवायची. या तिघांना ‘काळें’नी सपोर्ट करायचा; पण कुठलं काय अन् कसलं काय? स्वत:च्या स्वार्थापोटी एकमेकांची चप्पल आपल्या पायात घालण्यापूर्वी हे सारे पायात पाय अडकून पडले. ‘काळे-भालके’ सध्या शांत असले तरी भविष्यात ‘अभिजितदादां’च्या विरोधात ‘पंतां’ना मिळाले तर नवल वाटायला नको. ‘चंद्रभागा’ भलेही ‘विठ्ठला’ची झाली नाही तरी ‘पांडुरंगां’ची होऊ शकते की रावऽऽ लगाव बत्ती..

मंगळवेढ्यात मात्र ‘आवताडे’ काका-पुतण्याला एकत्र आणण्यात वडीलधाऱ्या ‘विष्णुपंतां’ना यश मिळालेलं. केवळ चार जागांवर ‘समाधान’ मानून ‘बबनरावां’कडं पुन्हा एकदा यार्डाची चावी देण्याची खेळी केली गेलेली. त्यामुळं ‘दामाजी’ कारखान्याच्या आवारात हवेत असलेलं ‘शिवानंदअण्णां’चं विमान जमिनीवर आलेलं. खरं तर कारखान्याच्या वेळीच ‘आवताडें’ची ही ‘भाऊबंदकी’ भावकीत उतरली असती तर! लगाव बत्ती..

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारण