शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

रेखा गुप्तांची ‘चैन’, महिला खासदारांची ‘थंड कॉफी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 08:28 IST

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना ‘सुधारणा’ मागे घ्याव्या लागल्या आणि राज्यसभेतल्या महिला खासदारांचे प्रश्नही अर्धवटच लोंबकळत राहिले आहेत!

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

दिल्लीच्याराजकारणात काय घडू शकते, याचा एक उत्कृष्ट नमुना. झाले असे, की भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्यांच्या निवासस्थानी आणि बाजूच्या कार्यालयात काही सुधारणा करण्यासाठी ६० लाख इतक्या माफक खर्चाची योजना आखली; पण ती त्यांना गुंडाळून ठेवावी लागली; कारण समाजमाध्यमातील टीकाकार त्यांच्यावर तुटून पडले. 

प्रशासकीय कारणास्तव आता सार्वजनिक बांधकाम खात्याने निविदा मागे घेतली आहे. या योजनेत मुख्यमंत्र्यांना राजनिवास मार्गावर देण्यात आलेल्या दोन बंगल्यांमध्ये २४ वातानुकूलन यंत्रे, ३९ पंखे आणि ११५ दिवे अशी सुधारणा सुचवण्यात आली होती. ल्युटेन्स दिल्लीच्या मानाने त्यावर होणारा खर्च नगण्य म्हटला पाहिजे. तरीही जनतेच्या पैशावर होणारी चैन म्हणून समाजमाध्यमे रेखा गुप्तांवर तुटून पडली. माजी  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ४० कोटींच्या शीशमहलशी तुलनाही केली गेली. 

गुप्ता यांच्या समर्थकांचे म्हणणे की, दोन्ही इमारतींच्या पायाभूत सुविधांतील दुरुस्तीचा खर्चही त्यात अंतर्भूत आहे. जनतेची ये जा असलेले मुख्यमंत्र्यांचे कार्यालयही त्यात होते; परंतु लढाया ऑनलाइन जिंकता येत नाहीत. गुप्ता यांच्या फोनवरील खर्चावर आधी ५० हजारांची मर्यादा होती; आता त्यांना दीड लाख रुपये खर्चाची मुभा देण्यात आली आहे. टीकाकारांनी त्यावरही झडप घातली. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी सुखसोयी देणारे ‘५ जी’ सरकार असे वर्णन झाले. दिल्लीतील भाजपच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्तांना काही गोष्टी शिकाव्या लागत आहेत. हे सगळे मीम्स आणि चिखलफेकीमुळे पहिला धडा मिळाल्यापासून त्या फारसा उत्साह दाखवेनाशा झाल्या. 

आणखी एक. संसदेच्या नव्या इमारतीत आसनव्यवस्था चांगली नाही, कॉफी मिळत नाही, प्रसाधनगृहेही सुस्थितीत नाहीत याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यसभेतील महिला खासदार राजकारण बाजूला ठेवून एकत्र आल्या. ‘निदान मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे’, असे त्यांनी अध्यक्ष धनखड यांना कळवले होते. भोजनगृहाचे रूपांतर मध्यवर्ती अशा मोठ्या सभागृहात करावे, अशी धाडसी सूचनाही त्यांनी केली. धनखड यांनीही ते मनावर घेतले होते; परंतु पंतप्रधानांना काही ते पटले नाही असे सांगण्यात येते. थोडक्यात काय तर खराब प्रसाधनगृहे आणि थंड कॉफी यामुळे एकी काही होऊ शकली नाही. आता तर धनखडही नाहीत. त्यामुळे  मार्ग निघण्याचा प्रश्नच नाही.

धनखड पुढे काय करणार?

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे दिल्लीतील सत्तावर्तुळात गोंधळ उडाला आहे. अगदी परवा-परवापर्यंत धनखड हे व्यवस्थेच्या विश्वासातले मानले जात होते. पंतप्रधानांच्या फार जवळचे नाहीत, तरी तसे निकटचे; संघाचेही त्यांच्याबद्दल वाईट मत नाही, इतकेच नव्हे, तर वर्ष २०२७ मध्ये कदाचित ते राष्ट्रपतीही होतील, अशीही बोलवा होती. धनखड आणि मोदी बऱ्याचदा भेटत असत. सरसंघचालक मोहन भागवत हेही ‘विपी हाऊस’ या उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी जात असत. अंतस्थ गोटातील सूत्रांच्या सांगण्यानुसार पंतप्रधानांशी मेतकूट वाढल्यानंतर धनखड त्यांच्या पदापेक्षा मोठे झाले. केंद्रीय मंत्र्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देऊ लागले. धनखड पंतप्रधानांचे कान भरत असत. त्यातच कुठेतरी काहीतरी गडबड झाली आणि धनखड यांची गच्छंती कोणतीही अडचण न येता पार पडली. ना गाजावाजा, ना निरोप समारंभ. दबक्या आवाजातील चर्चा आणि ‘राजीनामा का दिला’, याचे गूढ अजून उकललेलेनाही.

आता सुवर्णकाळ सरला आहे. ‘रायसीना हिल’नंतरचे आयुष्य एकट्यानेच घालवावे लागणार हे धनखड यांना उमगले आहे. आता माफक सोयीसवलतींवरच भागवावे लागेल. उपराष्ट्रपतींसाठी नव्याने बांधल्या गेलेल्या भवनात त्यांचा मुक्काम होता. त्यांच्या सचिवालयासाठी विशेष कक्ष उभारण्यात आला. आता तो ओसाड पडला आहे. बरेच अधिकारी दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत. उरलेले सामान बांधताहेत. सामान्यतः अधिकाऱ्यांना गाशा गुंडाळायला १५ दिवस दिले जातात; परंतु धनखड यांचे कार्यालय रात्रीतून बंद झाले.  

माजी उपराष्ट्रपती म्हणून त्यांना चांगले घर, निष्ठावान कर्मचाऱ्यांचा ताफा, स्वीय सचिव, मदतनीस, दोन शिपाई आणि वर्षाला ९०हजार रुपये कार्यालय भत्ता इतक्या गोष्टी मिळणार आहेत. वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील; परंतु हे सगळे सत्तापद गेल्यानंतरचे. उच्चस्तरीय संपर्क आणि घटनात्मक अधिकार, त्याचप्रमाणे भविष्यात राष्ट्रपती होण्याविषयी चर्चा, सगळे हवेत विरून गेले आहे.  धनखड उपराष्ट्रपतिपदावर जितक्या नाट्यपूर्ण रीतीने आले त्याच रीतीने पायउतार झाले. यानंतरची शांतता जीवघेणी असेल. धनखड जाट समाजाचे आहेत. आपल्या समाजाच्या हक्कासाठी आता हा शेतकरी रस्त्यावर उतरतो की काय, हे पाहावे लागेल. 

टॅग्स :BJPभाजपाdelhiदिल्लीPoliticsराजकारण