शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक : पुनर्विचार करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 04:55 IST

आम्ही प्लॅस्टिकच्या युगात राहत आहोत आणि आधुनिक अर्थव्यवस्थेवर या सर्वव्यापी साहित्याचा प्रभाव जाणून घेण्याची वेळ आली आहे.

- प्रा. अनुप के. घोषआम्ही प्लॅस्टिकच्या युगात राहत आहोत आणि आधुनिक अर्थव्यवस्थेवर या सर्वव्यापी साहित्याचा प्रभाव जाणून घेण्याची वेळ आली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०१८ मध्ये नवे प्लॅस्टिक युग ही संकल्पना सादर करण्यात आली असून प्लॅस्टिकचे भवितव्य आणि त्याचा आपल्याशी असलेला संबंध याबाबत पुनर्विचार करण्याची वेळ आता जवळ आली आहे. अत्यंत शाश्वत पद्धतीने प्लॅस्टिकचा वापर करण्याबाबत सर्वांगीण विचार करणे फारच गरजेचे झाले आहे. यासाठी सरकार, उद्योगक्षेत्र, शिक्षणक्षेत्र, धोरणकर्ते आणि सर्वसामान्य लोकांच्यात परस्पर संवाद असणे आवश्यक आहे.आपण जेव्हा प्लॅस्टिकबद्दल बोलतो, तेव्हा समाजमाध्यमे किंवा व्यासपीठांमधून पसरत जाणारी चुकीची माहितीच अधिक पुढे येते. प्लॅस्टिकचे आपल्या आयुष्यातले महत्त्व, प्लॅस्टिकचे विविध प्रकार आणि त्यांचा वापर, तसेच त्यांच्या रिसायकलिंगच्या पद्धती यांचा अभ्यास केल्यानंतरच नव्या प्लॅस्टिक अर्थव्यवस्थेची संकल्पना स्पष्ट होऊ शकेल.पिशव्या बनवण्यासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक हे पाण्याच्या बाटल्यांसाठी किंवा शाम्पूच्या बाटल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकपेक्षा वेगळे असते. प्रत्येक प्रकारच्या प्लॅस्टिकला १ ते ७ असे दर्जात्मक क्रमांक असतात, ते रिसायकल ट्रँगलवर लिहिलेले असतात. विविध प्रकारच्या प्लॅस्टिक्समध्ये पेट (पॉलीइथिलीन टेरीफ्लेट) आणि एचडीपीई (हाय डेन्सिटी पॉलीइथिलीन) हे प्लॅस्टिकचे प्रकार सुरक्षित मानले जातात. त्यांच्यातील रसायने पसरत नसून अन्नाच्या पॅकेजिंगसाठी ती वापरता येतात. सर्व प्लॅस्टिकमध्ये भिन्न रासायनिक संरचना आहेत. एखाद्या विशिष्ट प्लॅस्टिकच्या चुकीच्या वापरामुळे दीर्घकाळापर्यंत पर्यावरणीय व आरोग्य समस्या उद्भवू शकतात.प्लॅस्टिक हे निरंतर विकासाचे महत्त्वपूर्ण माध्यम असून रिसायकलिंगची त्यात क्षमता आहे. प्लॅस्टिकच्या वास्तविक पर्यावरणीय कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी आपण जीवनचक्र विश्लेषण (एलसीए) दृष्टिकोन वापरला पाहिजे. एलसीए दृष्टिकोन उत्पादनाच्या संपूर्ण पर्यावरणीय परिणामाचे मूल्यांकन करतो. ज्याला क्रॅडल-टू-क्रॅडल विश्लेषण म्हणतात. उत्पादन स्तरावरील कच्च्या मालाची पत आणि उत्पादनांचा वापर केल्यानंतर त्याची विल्हेवाट वा रिसायकलिंगवर उत्पादनाच्या परिणामांचे मूल्यांकन केले जाते. या सर्व घटकांचे मिश्रण मूळ वास्तवाची एक समग्र प्रतिमा देते. तुलनात्मक एलसीए स्पष्टपणे सूचित करतो की, प्लॅस्टिक आर्थिकदृष्ट्या परवडणारे, सामाजिकरीत्या स्वीकारार्ह आणि पर्यावरणीयदृष्ट्या प्रभावी आहे.आपल्या जीवनात प्लॅस्टिकची अपरिहार्यता ही निश्चित बाब आहे. भविष्यात प्लॅस्टिकचा व्यवहार्य पर्याय असू शकणारी नवीन सामग्री शोधण्यासाठी अनेक वर्षे लागतील. तोपर्यंत आपल्याला प्लॅस्टिकचा सुसंगत वापर करणे अत्यावश्यक आहे. नवी प्लॅस्टिक्स अर्थव्यवस्था ही संकल्पना रेषीय क्षेत्राच्या आर्थिक मॉडेलमध्ये रूपांतरित करण्याच्या फायद्यांचे मूल्यांकन करते आणि या शिफ्टची अंमलबजावणी करण्यासाठी व्यावहारिक दृष्टिकोन बाळगते.जागतिक स्तरावर वापरल्या जाणाºया प्लॅस्टिकच्या एकूण खंडापैकी २६ टक्के प्लॅस्टिक पॅकिंगसाठी वापरले जाते. १५ वर्षांच्या आत या दरात दुप्पट वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि २०५० पर्यंत हे प्रमाण चौपट वाढून ते ३१८ दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. हा आकडा आज संपूर्ण प्लॅस्टिक उद्योगापेक्षाही अधिक आहे. तथापि, पहिल्या वापरानंतर ९५ टक्के प्लॅस्टिक पॅकेजिंग अर्थव्यवस्थेतून गायब होते. न्यू प्लॅस्टिक्स इकॉनॉमीची दृष्टी अशी आहे की, प्लॅस्टिक कधीही कचरा बनत नाही; त्याऐवजी ते अर्थव्यवस्थेला मौल्यवान तांत्रिक किंवा जैविक पोषकतत्त्वे म्हणून पुन्हा प्रविष्ट करता येते. उद्योगोत्तर वापरल्या जाणाºया प्लॅस्टिक अर्थव्यवस्थेची निर्मिती करणे हे अर्थव्यवस्थेचे मूळ ध्येय असून यामुळे पर्यावरणावरही चांगला परिणाम साधता येतो.भारतीय परिसंस्थेचा विचार करता पुनर्वापर आणि रिसायकलिंगचे प्रमाण वाढवणे; यामुळे केवळ पर्यावरणाला फायदा होणार नाही, परंतु त्याहून मोठे फायदे होतील. प्लॅस्टिक पॅकेजिंग मार्केटमध्ये व्यावसायिक फिल्म्स तयार करण्यासाठी वापरल्या जाणाºया प्लॅस्टिकचे तसेच, पीईटी-आधारित पाणी/पेय बाटल्यांच्या रिसायकलिंगमधून मोठ्या किमतीचा लाभ होतो. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) च्या अभ्यासानुसार, दरवर्षी ९०० किलो टन पीईटीचे भारतातून ९५ टक्के उत्पादन होते. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि कचरा व्यवस्थापनास प्रोत्साहन देऊन या टक्केवारीस प्रोत्साहन दिले जाऊ शकते आणि याचा इतर प्लॅस्टिकच्या बाबतीतही विस्तार केला जाऊ शकतो.नैसर्गिक परिसंस्थांमध्ये प्लॅस्टिकची गळती कमी करण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे मजबूत संग्रह आणि पुनर्प्राप्ती संरचना. भारतासारख्या विकसनशील देशांसाठी हे विशेषकरून महत्त्वपूर्ण आहे, जेथे उत्पादन व वापरामुळे प्लॅस्टिकची पुनर्प्राप्ती वेगाने जुळून येत नाही. यासाठी विस्तारित उत्पादक जबाबदारीच्या कठोर अवलंबनाची आवश्यकता आहे. या अंतर्गत उत्पादकांना उप-ग्राहक मिळतील व उत्पादनांच्या उपचारासाठी किंवा आर्थिक वापरासाठी आर्थिक किंवा भौतिक जबाबदारी त्यांच्यावर देता येईल. सरकारी यंत्रणेला यासाठी प्रमुख भूमिका घेणे अत्यावश्यक असून उत्पादकांद्वारे प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम (२०१६) मध्ये सूचीबद्ध केलेल्या पॉइंट्सच्या अंमलबजावणी धोरणाची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्रोत पृथक्करण. यात कचरा वेचणारी व्यक्ती, रिसायकलर्स आणि कचरा प्रोसेसर या संपूर्ण सिस्टीमचा अविभाज्य वाटा असतो. यामुळे प्रदूषणकारी घटकच नुकसानीत जातो, हे तत्त्व सिद्ध होते. प्लॅस्टिकसाठीचे मानवी आचरण हे या दृष्टिकोनांच्या सोल्यूशन्सच्या मुळांवर आहे. जागरूकता आणि ज्ञान यातून एक उद्दिष्ट तयार होईल, जे कार्यक्षम कचरा व्यवस्थापन व्यवस्थेसह समर्थित असेल. असे झाल्यासच आपल्या देशासाठी उल्लेखनीय आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे मिळण्याची शक्यता आहे.

(मटेरिअल सायन्स व इंजिनीअरिंग विभाग, आयआयटी, नवी दिल्ली)

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी