शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

संधिसाधूंचा सुकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 01:05 IST

कोरोनारूपी संकटाने जग भयग्रस्त झाले असताना, अनेक जण संकटात सापडले असताना, मदतीचे अनेक हात पुढे आलेले दिसतात.

माणसाने परोपकाराचा कितीही आव आणला तरी त्याची मूळप्रवृत्ती वेळेवर उफाळून वर येतेच. षड्रिंपूसोबत ही प्रवृत्ती पिंगा घालत असतेच. सद्वर्तनाचा प्रयत्न करून माणूस या सर्वांवर मात करण्याचा प्रयत्न करतो; पण बहुतेक वेळा पराभवच त्याच्या पदरी पडतो. ‘संकटसमयी कोण कामास येतो’ हे वचन वारंवार वास्तवाची जाणीवही करून देत असते; पण जरा काही बरे दिवस आले की, आपल्याला वास्तवाचा विसर पडतो.

कोरोनारूपी संकटाने जग भयग्रस्त झाले असताना, अनेक जण संकटात सापडले असताना, मदतीचे अनेक हात पुढे आलेले दिसतात. त्याचवेळी परिस्थितीची असहायता पाहून हात साफ करणारेही कमी नसतात. कोणत्याही वस्तूची टंचाई नसताना आज बाजारात अन्नधान्य, भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांवर भाजीपाला, फळे फेकून देण्याची पाळी आली. कारण वाहतूक ठप्प आहे. शहरात भाजीपाला आणला तरी व्यापारी भाव पाडून खरेदी करतात, म्हणजे एक तर भाजीपाला, फळे नाशवंत असल्याने हाती पडेल ते घ्यावे लागते.

‘अडला हरी’ यापेक्षा वेगळे काही करू शकत नाही. दुसरीकडे सुगी संपत आल्याने गहू, ज्वारीसारख्या धान्याचे साठे भरपूर आहेत. डाळी मुबलक आहेत; पण किरकोळ विक्रीत यांचीही भाववाढ झाली. सरकारही अशा नफेखोरांवर नजर ठेवून आहे; परंतु सरकारसमोर आजच्या घडीला हा प्राधान्याचा विषय होऊ शकत नाही. अशी संधी साधत नफेखोर उखळ पांढरे करीत आहेत. मागणी आणि पुरवठा यापैकी कोणत्याही घटकात तफावत नसताना अशी भाववाढ अनैसर्गिक असते आणि ती केवळ नफेखोरांनीच केलेली असते, अशीच परिस्थिती दुधाचीही आहे.

दुधाचे उत्पादन नाशवंत असल्याने अनेक शेतकऱ्यांना ते फेकून द्यावे लागते किंवा कवडीमोल दराने तरी विकावे लागते; पण शहरांमध्ये दूध महागले आहे. या साखळीमध्ये सर्वात जास्त नागवला जातो तो शेतकरी. कारण या उत्पादनामध्ये खरी गुंतवणूक त्याची असते. तो जसा पैसा गुंतवतो तसाच तो श्रमही खर्ची घालतो; पण त्याची झोळी फाटकीच राहते. यावर्षी तर पावसाने झोडपल्याने त्याचे खरीप गेले. कोरोनाचा पहिला फटका त्याला बसला. कोरोनामुळे चीनवर संकट आले त्यावेळी कापसाचे भाव गडगडले. हा काळ नेमका कापूस विक्रीला काढण्याचा होता. अतिवृष्टीमुळे मक्याचे उत्पादन घटले आणि आयातही ठप्प झाल्याने मक्याचे भाव कधी नव्हे ते दोन हजारांवर पोहोचले होते; पण कोरोनाने पोल्ट्री उद्योगाचे कंबरडे मोडल्याने मक्याची पार घसरगुंडी झाली. ती सहा-सातशे रुपयांपर्यंत म्हणजे येथेही नुकसान झाले.

आताही रबीची सुगी झाली आणि घाऊक बाजारातील भाव नैसर्गिकपणे उतरले. शिवाय कोरोनाच्या प्रकोपाचाही परिणाम झाला. बाजारपेठा बंद असल्याने स्थानिक पातळीवरच आतबट्ट्याचे व्यवहार करावे लागले. शेवटी नुकसान शेतकºयाचेच झाले आहे. अन्नधान्याचे भाव स्थिर ठेवणे तसेच नफेखोरीला आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा असली तरी ती सध्या वेगळ्या आघाडीवर व्यस्त आहे. संकटात जशा आशादायक बातम्या लढण्याची ऊर्मी वाढवतात, तशा अशा संधिसाधूंच्या कृत्यामुळे एक निराशेचे मळभही येते. तरी लढताना धीर सोडता येत नाही आणि आता तर अदृश्य शत्रूशी अस्तित्वाची लढाई आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर असला तरी प्रामुख्याने युरोप, अमेरिकेत ही प्रवृत्ती दिसत नाही किंवा तशा बातम्याही नाहीत. त्याचवेळी नागरिकही तितक्याच जबाबदारीने वागताना दिसतात. बाजारात अनावश्यक मागणी झाली, तर नफेखोरांसाठी ती संधी असते. देशात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधी, फळे, इंधन, अशी कोणत्याही वस्तूंची टंचाई नाही. सरकारही वारंवार याचा दिलासा देताना दिसते; पण लोकच अनावश्यक खरेदी करून अशा वस्तूंचे साठे करीत आहेत. कारण बाजार बंद राहील ही भीती वाटते. या अकारण काळजीपोटी ही वारेमाप आणि बेभाव खरेदी चालू आहे. कारण कोरोनाच्या भीतीने सारासार विचार करणे समाजाने सोडून दिलेले दिसते.

महाराष्ट्रात तर वर्षभर पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा आहे, तरी जनतेच्या मनात संभ्रम का निर्माण होतो, असा प्रश्न पडतोच. भीतीमुळे सारासार विवेक शिल्लक राहत नाही. अशावेळी उमेद वाढवणाºया गोष्टी असताना मानवी प्रवृत्तीचे दर्शनही प्रकर्षाने होते. शेवटी लोभ, हाव, स्वार्थ याला काहीही म्हणता येते. शेवटी ती मूळप्रवृत्ती आहे आणि आपल्या गूणसूत्रांसह आलेली, म्हणूनच संधिसाधंूसाठी सुकाळ म्हणावा आणि आपला संघर्ष चालू ठेवावा.

देशात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधी, फळे, इंधन, अशी कोणत्याही वस्तूंची टंचाई नाही. सरकारही वारंवार याचा दिलासा देताना दिसते; पण लोकच अनावश्यक खरेदी करून अशा वस्तूंचे साठे करीत आहेत. कारण बाजार बंद राहील ही भीती वाटते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत