शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पीपल्स एज्युकेशन सोसायटी : एक सामाजिक क्रांती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 06:28 IST

शेकडो वर्षे शिक्षणापासून वंचित ठेवले गेल्यामुळे अंधारयुगात जगणाऱ्या तत्कालीन अस्पृश्य व एकूणच बहुजन समाजाला उच्चशिक्षणाची दारे मोकळी करून देण्यासाठी त्यानी ‘पीईएस’ची केलेली स्थापना हे त्यांच्या क्रांतिकारक द्रष्टेपणाचे द्योतक आहे.

- डॉ. भालचंद्र मुणगेकर(माजी राज्यसभा सदस्य)आठ जुलै, १९४५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजे आज, ‘पीईएस’चा अमृतमहोत्सव. शेकडो वर्षे शिक्षणापासून वंचित ठेवले गेल्यामुळे अंधारयुगात जगणाऱ्या तत्कालीन अस्पृश्य व एकूणच बहुजन समाजाला उच्चशिक्षणाची दारे मोकळी करून देण्यासाठी त्यानी ‘पीईएस’ची केलेली स्थापना हे त्यांच्या क्रांतिकारक द्रष्टेपणाचे द्योतक आहे. उच्चशिक्षण हेच वंचित, उपेक्षित समाजाच्या सर्वांगीण उत्कर्षाचे साधन आहे, याबद्दल त्यांची खात्री झाली होती.‘पीईएस’ स्थापनेच्या द्रष्टेपणातील आणखी एक क्रांतिकारक द्रष्टेपणा म्हणजे १९४६ मध्ये सुरू केलेले मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज हे देशातील पहिले सकाळचे कॉलेज. तेही फोर्टमध्ये सुरू केले. ‘क्रांतिकारक’ या अर्थाने की त्या काळात सर्व सरकारी, निमसरकारी कचेºया, बँका, विमा कंपन्या, सार्वजनिक उपक्रम व खासगी कंपन्यांच्या कचेºया फक्त फोर्ट भागात होत्या, त्यामुळे नोकरी करून कॉलेज करणे शक्य होई. दलित समाजातील तरुणांचीच नव्हे, तर तथाकथित उच्चवर्णीय समाजातील तरुणांची ती गरज होती. सन १९६५ ते १९७४ या काळात मी रिझर्व्ह बँकेत नोकरी करताना बँकेतील माझ्या पूर्वीच्या पिढीतील ५० टक्क्यांहून अधिक पदवीधर सिद्धार्थ आर्टस् अ‍ॅन्ड कॉमर्स कॉलेजमध्ये शिकल्याचे ते अभिमानाने सांगत. मुंबईतील वकील तर बघायला नको. सिद्धार्थ लॉ कॉलेज संध्याकाळी सहानंतर. हजेरीची फारशी अट नसल्याने थेट परीक्षेला बसण्याची सोय असलेले कॉलेज. बाबासाहेबांनी आर्टस् कॉलेजच्या इमारतीचे नाव ‘बुद्ध भवन’, तर कॉमर्स व लॉ कॉलेजच्या इमारतीचे नाव ‘आनंद भवन’ ठेवले. त्यांच्याकडे पाहताना आजही मन अभिमानाने व कृतज्ञतेने भरून येते.सन १९६४ मध्ये मुंबईतील वडाळा येथे सोसायटीच्या कॉलेजांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना राहण्यासाठी १३० खोल्यांचे हॉस्टेल बांधले आणि सन १९७२ मध्ये बाजूलाच ‘डॉ. आंबेडकर कॉमर्स कॉलेज’ स्थापन करून कामगार विभागातील मुलांच्या शिक्षणाची सोय केली. महाड व बंगलोर येथेही सोसायटीने कॉलेज स्थापन केलीत; परंतु औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची स्थापना ही बाबासाहेबांच्या व्यक्तिगत जीवनातील आनंदाची बाब होती. औरंगाबादच्या कॅन्टॉन्मेंट भागात काही बराकीमध्ये भाडेतत्त्वावर दि. १९ जून १९५० रोजी हे कॉलेज स्थापन केले. प्रारंभी ते इंटरपर्यंत होते. पदवी अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मुख्यत: हैदराबाद संस्थानातील मुख्य असलेल्या उस्मानिया विद्यापीठात जावे लागे. मराठवाड्यात सर्वांमध्ये, विशेषत: मागासलेल्या समाजात उच्चशिक्षणाची इतकी आस होती की, एका वर्षात विद्यार्थ्यांची संख्या १४० वरून ३३२ वर गेली आणि जागेअभावी प्रवेश बंद करावे लागले.कॉलेजची स्वत:ची इमारत बांधणे गरजेचे होते, त्यामुळे हैदराबाद संस्थानातील शेड्युल्ड कास्ट फंडातून १२ लाख रुपये कर्ज घेऊन सोसायटीने १५५ एकर जागा खरेदी करून बाबासाहेबांनी हे कॉलेज सुरू केले. दि. १ सप्टेंबर, १९५१ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांनी कॉलेजचा शिलान्यास समारंभ केला. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी हैदराबाद व मराठवाडा आणि त्यातही औरंगाबाद का निवडले तसेच उच्चशिक्षण हाच प्रगतीचा मार्ग कसा आहे, याचे मर्मग्राही विवेचन केले आहे. प्रारंभी ‘पीईएस’चे कॉलेज, औरंगाबाद हे नाव बदलून सन १९५५ मध्ये ‘मिलिंद कॉलेज’ असे त्याचे नामाभिदान केले. पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे मराठवाड्यातील हे पहिले कॉलेज. त्याचदरम्यान स्वामी रामानंद तीर्थ यांनीही तेथे शैक्षणिक कार्य सुरू केले होते. परंतु, बाबासाहेबांनी तेथे उच्चशिक्षणाचा पाया घातला नंतर सोसायटीने कॉमर्स, सायन्स, लॉ, फिजिकल एज्युकेशन, अशी कॉलेजीस स्थापन केली. वसतिगृहे बांधली. परिसराचे नाव ‘नागसेन वन’ ठेवले. त्याची सर्व धुरा ‘मिलिंद’चे पहिले प्राचार्य एम. बी. चिटणीस यांनी सांभाळली.सन १९५८ मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केली. त्याच्या नामांतराचा इतिहास सर्वांना माहीत आहे. नामांतराच्या आंदोलनात बारा दिवस मी तुरुंगात राहिलो. हा मी मोठा आत्मसन्मान समजतो. सन १९७४ मध्ये रिझर्व्ह बँकेची १६०० रुपयांची नोकरी सोडून केवळ ६५० रुपयांच्या पगारावर आंबेडकर कॉलेजमध्ये लेक्चरर झालो आणि ऐन उमेदीची आठ वर्षे सर्वस्व पणाला लावून शिकविले ते बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. ‘पीईएस’ने उच्चशिक्षणाच्या माध्यमातून दलित समाजामध्ये भौतिक, सामाजिक व सांस्कृतिक क्रांती घडवून आणली. हजारो लोकांचे आयुष्य सोसायटीने घडविले. लेखक, कवी, कथाकार, डॉक्टर, वकील, आदी क्षेत्रांतील नामवंत ही ‘पीईएस’ची देणगी आहे.अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत सोसायटीची ५० कॉलेजीस व २०० हायस्कूल्स पाहिजे होती. बाबासाहेबांच्या नावामुळे दानशूरांनी कोट्यवधींची देणगी दिली असती. १५० वर्षे पूर्णत्वाबद्दल मुंबई, कोलकाता आणि मद्रास विद्यापीठांना सन २००६ मध्ये माझ्या विनंतीवरून तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रत्येकी २५ कोटींचे अनुदान दिले. ‘पीईएस’साठी आर्थिक मदतीसाठी मी त्यांना विनंती केली असती, तर बाबासाहेबांच्या नावासाठी त्यांनी ती मान्य केली असती. परंतु, अनुदान देणार कुणाकडे? अकरा आजीव सदस्यांपैकी फक्त धर्मादाय आयुक्तांकडे कुणीतरी एकाच सदस्याला मान्यता दिली आहे. म्हणजे ‘पीईएस’ला पूर्ण गव्हर्निंग बॉडी नसणे वेदनादायक आहे. कितीतरी अनिष्ट गोष्टी मला माहिती झाल्या आहेत. परंतु, केवळ औचित्याचा भाग म्हणून त्याविषयी मी काही लिहीत नाही. ज्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलमध्ये चार वर्षे राहिलो आणि जे सन १९७० च्या दरम्यान दलित चळवळीचे केंद्रस्थान होते, ते जमीनदोस्त झाले. ही घटना मात्र वेदनादायक आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रPeople's Education Societyपीपल्स एज्युकेशन सोसायटी