शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

ट्रम्पविरोधात जनतेलाच संघटित व्हावं लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 07:33 IST

अमेरिकेतली मध्यावधी निवडणूक पार पडली. नागरिकांनी काँग्रेस या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात डेमॉक्रॅ ट्सना बहुमत दिलं, पण सेनेट या वरिष्ठ ...

अमेरिकेतली मध्यावधी निवडणूक पार पडली. नागरिकांनी काँग्रेस या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात डेमॉक्रॅ ट्सना बहुमत दिलं, पण सेनेट या वरिष्ठ सभागृहात मात्र डेमॉक्रॅट्सना बहुमत मिळवता आलं नाही. तिथं रिपब्लिकन पक्षाचं वर्चस्व टिकलं. ट्रम्प यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीची प्रतिक्रि या असं या निवडणुकीचं रूप होतं. ट्रम्प यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून, व्यक्तिश: शेकडो सभा घेऊन लोकांकडून मान्यता मागितली. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही स्वत: सभा घेऊन ट्रम्प यांच्यावर टीका केली. ट्रम्प अध्यक्ष झाल्याला दोन वर्षं झाली तरीही ते अजून विरोधी पक्षाचे पुढारी असल्यासारखे वागले. त्यांचा बहुतेक वेळ आधीच्या बराक ओबामा सरकारवर टीका करण्यात गेला. ओबामा यांनी एकूणात देशाची वाट लावली हा त्यांच्या विचारांचा मुख्य धागा आजही आहे. ओबामा यांची धोरणं उलट फिरवणं हेच आपलं काम आहे असं ट्रम्प म्हणतात; पण अजून एकही धोरण त्यांना उलटं फिरवता आलेलं नाही.

या निवडणुकीचे काही विशेष आहेत. काँग्रेसमध्ये १२0 महिला निवडून आल्यात. अमेरिकेत महिलांना राखीव जागा नसताना महिला प्रतिनिधींची संख्या वाढतेय हे विशेष. बहुतेक प्रतिनिधी, दोन वगळता, डेमाक्रॅटिक आहेत. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्या प्रथमच स्थानिक आदिवासी म्हणजे मूळ निवासी महिला निवडून आली आहे. तिचं नाव शेरीस डेविड्स. तिची भाषा गोऱ्या अमेरिकी वळणाची नाही. तिच्या बोलण्यावर, चेहऱ्यावर, कपड्यांवर आणि व्यक्तिमत्त्वावर मूळनिवासी संस्कृतीची गडद छाप आहे. गोरे सोडून इतर वळणाची इंग्रजी कानावर आली की ती व्यक्ती अ‍ॅक्सेंटवाली आहे असं म्हणून आजही टिंगल केली जाते. अशा वातावरणात भरपूरच अ‍ॅक्सेंट असलेली महिला निवडून आलीय. दोन गौरेतर आणि मुसलमान महिला निवडून आल्या आहेत. एक आहे रशीदा तालीब. ती आहे मुळातली पॅलेस्टिनी. दुसरी आहे इल्हान ओमार. ती आहे सोमाली. ट्रम्प यांनी मुस्लीम आणि महिला यांच्याबद्दल कायम असभ्य भाषेत मोहीम चालवली. दोघीही ट्रम्प यांना उघड विरोध करतात, ट्रम्प यांना विरोध करण्याच्या मुद्द्यावरच त्या निवडून आल्या आहेत. तालीब यांना तर २0१६ च्या निवडणुकीत ट्रम्पच्या साथीदारांनी जाहीरपणे धक्काबुक्की करून कार्यक्रमातून हाकलून दिलं होतं.उघडपणे वंशद्वेशाची भूमिका मांडणारे, असभ्य भाषेत बोलणारे, गौरेतर लोकांविरोधात दंगलीला उघड चिथावणी देणारे दोन उमेदवार, इलिनॉयमधे आर्थर जोन्स आणि कन्नासमधे क्रिस कोबेक यांना जनतेनं हरवलं आहे. पदवीधारक मतदारांनी बहुसंख्येनं डेमॉक्रॅट्सना मतदान केलं. कमी शिकलेल्या गोºयांनी ट्रम्पना मतदान केलं. खेड्यातल्या लोकांनी ट्रम्पना मतदान केलं, शहरातल्या लोकांनी डेमॉक्रॅ टना मतदान केलं. ट्रम्प यांना मेक्सिकोच्या हद्दीवर भिंत उभारायची आहे. ट्रम्प यांना आफ्रिकी आशियाई देशातून येणाऱ्या मुसलमानांचा अमेरिका प्रवेश थांबवायचा आहे. ट्रम्प यांना अमेरिकेतील प्रत्येक माणसाला आरोग्य व विमा व्यवस्था देणारी ओबामा यांची योजना हाणून पाडायची आहे. ट्रम्प यांना श्रीमंतांवरील कर कमी करायचा आहे. त्यांच्या या योजनांना आता डेमॉक्रॅ ट्स काँग्रेसमध्ये हाणून पाडू शकतील.निवडणूक मोहिमेत ट्रम्पांनी रशियन लोकांची मदत गैरकायदेशीररीत्या स्वीकारली या आरोपाची चौकशी चालली आहे. चौकशीचा अहवाल लवकरच बाहेर येईल. त्यात आरोप सिद्ध झाले तर ट्रम्प यांना अध्यक्षपदावरून हाकलण्याची कारवाई काँग्रेस सुरू करू शकेल. वरील दोन घटकांमुळं ट्रम्प यांची पुढली दोन वर्षं कठीण जाणार आहेत. कदाचित या सर्वाचा विचार करून रिपब्लिकन पक्ष ट्रम्प यांना पुढल्या वेळी उमेदवारी नाकारू शकेल.

ट्रम्प हा काही स्वस्थ बसणारा माणूस नाही. स्वत:च्या मोठेपणाचा प्रचंड भ्रम त्यांना आहे. त्यात उर्मटपणाची भर पडली आहे. विचार करण्याची त्यांना सवय नाही. ते कायदा मानत नाहीत, राज्यघटना मानत नाहीत. त्यांना परंपराही मान्य नाहीत. त्यामुळंच निवडणुकीत बहुमतानं त्यांना नाकारलं असलं तरी आपला मोठ्ठा विजय झाला आहे असं ते मानतात. लोकमत विरोधी गेलंच नाहीये असं त्यांना वाटतं. माध्यमं आणि डेमॉक्रॅ ट आपल्याबद्दल खोटा प्रचार करतात अशी त्यांची ठाम समजूत आहे. रशियन हस्तक्षेपाची चौकशी कायद्याला धरून नाही असं म्हणत ते चौकशी करणाऱ्या म्युल्लर यांना हाकलण्याच्या बेतात आहेत. कायद्यानुसार तसं करता येत नाही असं म्हणणाºया प्रत्येक माणसाला ते त्याच्या पदावरून हाकलत आहेत. आपणच नेमलेल्या आपल्याच अ‍ॅटर्नी जनरलला, जेफ सेशन्स यांना त्यांनी हाकललं आहे. आणि वृत्तपत्रं जनशत्रू आहेत असं निवडणुकीनंतरच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले. प्रश्न विचारणाºया पत्रकाराला त्यांनी व्हाइट हाउसमध्ये यायला बंदी घातली. ट्रम्प या अडाणी, लहरी, उर्मट हुकूमशहाला संसदीय डावपेचातून हरवण्यावर मर्यादा आहेत. जनतेलाच संघटित होऊन ट्रम्प यांना हाकलावं लागेल.निळू दामले(लेखक आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत)

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पInternationalआंतरराष्ट्रीय