शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

पदोपदी जाणवणारी दातृत्वाची थोरवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 02:51 IST

दानशूर व्यक्तींच्या दातृत्वाचा सन्मान समाजात नेहमीच केला जातो़ अशीच एक व्यक्ती म्हणजे उद्योग महर्षी रसिकलाल धारीवाल़

- मिलिंद फडे दानशूर व्यक्तींच्या दातृत्वाचा सन्मान समाजात नेहमीच केला जातो़ अशीच एक व्यक्ती म्हणजे उद्योग महर्षी रसिकलाल धारीवाल़ एक वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले़ त्यांच्या निधनानंतरही त्यांचे कार्य त्यांच्या पत्नी शोभाताई आणि कन्या जान्हवी यांनी सुरू ठेवले आहे़जेव्हा रसिकभाऊंना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मोठा उद्योगपती हा दर्प त्यांच्यात कुठेच दिसला नव्हता. उलट अत्यंत विनम्रशील आनंदी आणि आस्थेने विचारपूस करीत आपलेसे वाटेल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणवले. त्या वेळी त्यांच्यासोबत पत्नी शोभाताईदेखील होत्या. कुटुंबवत्सल असे हे जोडपे म्हणजे, लक्ष्मी-नारायणाचे जोडपेच वाटले. पुढे कालौघात या दोघांशीही वारंवार संपर्र्क येत गेला़ पुढे त्यांच्या विराट कर्तृत्व आणि दातृत्वाचे दर्शन घडत राहिले.धारीवाल यांनी केलेल्या प्रचंड कार्याची प्रचिती त्यांना मिळालेल्या पहिल्या ‘पुलाकभूषण’ पुरस्काराने आली़ देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार जैन समाजाचे मुनीश्री प़ पू़ १०८ पुलाकसागरजी महाराज यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला़रसिकभाऊंनी शिक्षण संस्था, शाळा कॉलेज मुला-मुलींसाठी वसतिगृहे उभारली. शेकडो जैन-अजैन शिक्षण संस्थांना भक्कम आर्थिक देणगी देऊन स्थिर केले. रुग्णालयाची उभारणी, तसेच विविध रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले़ याबरोबरच निसर्ग महाविद्यालय, वृद्धाश्रम यांचीही जोड त्यास दिली. धार्मिक पातळीवर तर रसिकभाऊ व त्यांची पत्नी शोभाताई सतत सक्रि य असायचे. त्यामुळेच रसिकभाऊंना उद्योग महर्षी या बिरुदावलीप्रमाणेच दानशूर आणि समाज भूषण या गौरवानेदेखील उल्लेखिले जाऊ लागले. हीच त्यांच्या कार्याची पावती मानावी लागेल.स्वत: रसिकलाल धारीवाल हे देशातले उद्योगपती असले, तरी त्यांची खरी ओळख हजारो गरजूंना आणि शेकडो संस्थांना कोट्यवधी रुपयांची देणगी देऊन, त्यांच्या जीवनात आणि वाटचालीत चांगले दिवस आणणारा दानशूर उद्योग महर्षी हीच राहिली.श्री क्षेत्र सम्यक शिखरजी असो, पालीठाणा , श्री क्षेत्र जिरावाला असो, हे दाम्पत्य खूपच भक्तिभावाने या जैन तीर्थस्थळांच्या विकासाबद्दल वारंवार बोलत असे़ विशेष म्हणजे, त्यांनी स्वत:च तेथे विकास कामासाठी कोट्यवधी रुपये देणगी दिल्याचा उल्लेख कधीच ते करत नसत. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे नव्याने साकारल्या जात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयास त्यांच्या उद्योग समूहातर्फे तब्बल ५१ कोटी रुपये देणगी दिल्याचे जेव्हा समजले, तेव्हा आश्चर्य वाटले नाही.विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळण्यासाठी, गरजू रुग्णांना मोफत अथवा माफक शुल्कात वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांची ट्रस्ट उभारून, त्याद्वारे आपल्या सामाजिक कार्याचा झरा सदैव वाहता राहील याची दक्षता घेतली. जैन संस्कारांचा प्रभाव असणारे रसिकभाऊ अन्य धर्मियांबद्दलही आस्था बाळगत आणि मदतीचा हात पुढे करायचे़ गुजरात व महाराष्ट्रामधील भूकंप, आंध्र प्रदेशामधील वादळ, पूर, कारगिल युद्ध अशा प्रत्येक नैसर्गिक व राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी रसिकभाऊ आणि शोभाताई मदतीसाठी पुढे असायचे. या त्यांच्या दानशूर वृत्तीमुळेच त्यांच्याकडे मदतीसाठी येणारी संस्था कधी विन्मुख परत गेले नाहीत. किंबहुना, एखाद्या दिवशी असे कोणी त्यांना भेटले नाही, तर पटकन शोभातार्इंना म्हणायचे की, आज माझे पुण्य कमी पडलेले दिसतेय.

(धारीवाल यांचे स्नेही)