सफाई कामगारांकडेही लक्ष द्या

By Admin | Updated: October 28, 2014 00:56 IST2014-10-28T00:56:17+5:302014-10-28T00:56:17+5:30

प्रतिष्ठितांनी परिसर स्वच्छ करायचा आणि कचरा उचलायचे काम जातीवर आधारित लोकांकडूनच करवून घ्यायचे, ही स्थिती कायम राहील.

Pay attention to cleaning workers | सफाई कामगारांकडेही लक्ष द्या

सफाई कामगारांकडेही लक्ष द्या

सफाई कामगारांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम जर स्वच्छता अभियानात होणार नसेल तर प्रतिष्ठितांनी परिसर स्वच्छ करायचा आणि कचरा उचलायचे काम जातीवर आधारित लोकांकडूनच करवून घ्यायचे, ही स्थिती कायम राहील. 
ध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय घरात दर दिवाळीला स्वच्छता अभियान राबविण्यात येते. ही स्वच्छता राखण्याचे काम बहुधा घरातील स्त्रियाच करतात. याचा अर्थ वर्षभर लोक घर स्वच्छ न करता राहतात असा कृपया समजू नये. पण दिवाळीच्या पूर्वीच्या दिवसात मात्र घरातील स्वच्छता ही एखाद्या आंदोलनाप्रमाणो राबविण्यात येते. त्यावेळचा घरातील माहोल अगदी निराळाच असतो. घरातील डाग नीट तपासून ते स्वच्छ करण्यात येतात. भिंतीवरील जाळी-जळमट काढून टाकली जातात. पंखे स्वच्छ करण्यात येतात आणि पूर्वी ज्या कोप:यार्पयत स्वच्छता पोचली नसते, ते कोपरेही झाडून पुसून स्वच्छ करण्यात येतात. काही ठिकाणी घराला रंगसुद्धा देण्यात येतो. 
पण आपले घर रंगविणारे रंगारी कोणत्या स्थितीत जगत असतात याची काळजी करण्याची कुणाला गरज वाटत नाही. रंगविण्याचे त्यांचे कर्तव्य ते बजावीत असतात. मग त्यांची काळजी करण्याचे कारण काय? ही झोपडपट्टीत राहणारी माणसं आपली घरं स्वच्छ ठेवीत असली तरी घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याकडे मात्र त्यांचे लक्ष नसते. कारण ते स्वच्छ करण्यासाठी त्यांना पैसे मिळत नसतात. त्यामुळे घरे लखलखीत पण परिसर अस्वच्छ अशीच स्थिती पाहायला मिळते.
या आठवडय़ाच्या सुरुवातीला एका फ्रेंच पत्रकाराशी माझी भेट झाली. तेव्हा कुतूहल म्हणून त्याने प्रश्न विचारला, की सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लहानाचे मोठे ज्या घरात झाले त्या घराला टॉयलेट होते का? तसे टॉयलेट नसणो हे तर त्यांनी क्षेत्रत स्वच्छता अभियान सुरू करण्यामागील कारण नव्हते? कारण लहानपणी घरी वीज नसण्यामुळेच आपण गुजरात राज्यात प्रत्येक घराला चोवीस तास विजेचा पुरवठा कसा होईल, याचा प्रयत्न त्यांनी केला होता, असे मला  त्यांनी सांगितले होते.
पण त्यांच्या घराला टॉयलेट होते की नव्हते हा विषय त्यांच्याशी बोलताना कधी उपस्थित झाला नव्हता किंवा त्यांनी देशात सुरू केलेले स्वच्छता अभियान हे त्यांना लहानपणी आलेल्या अनुभवातूनच स्फुरले होते असे त्यांनी कुठे सांगितल्याचे ऐकिवात नाही. पण ग्रामीण भागात स्वच्छतेच्या साधनांचा जो अभाव पाहावयास मिळतो त्यातूनच स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली असावी असे मला खात्रीपूर्वक वाटते. आपल्या बालवयात 
त्यांनी अस्पृश्यतेसंबंधीच्या एका नाटकात काम केले होते, असे त्यांनी कुठेतरी सांगितलेले आहे. पण स्वच्छता अभियानात ग्राम स्वच्छतेकडे लक्ष देत असताना ही स्वच्छता राखणा:या स्वच्छता कर्मचा:यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचे प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी कुठेही भर दिलेला नाही.
सध्याचे स्वच्छता अभियान त्यांनी सेलेब्रेटींचा वापर करून जोराने सुरू केले आहे. पण त्याची व्याप्ती फारच संकुचित असल्याचे दिसते. सार्वजनिक ठिकाणी दिसणारा कचरा उचलून ते दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी नेऊन टाकणो एवढे मर्यादित उद्दिष्ट या अभियानात असल्याचे दिसते. सेलेब्रेटींनी जमा केलेला कचरा उचलून नेण्याचे काम शेवटी सफाई कामगारांनीच केलेले पाहावयास मिळत आहे. पण या अभियानात त्यांच्या नावाचा उल्लेख कुठे होताना दिसत नाही. कारण सफाई कामगारांकडे 
हे काम सोपविण्यामागे त्यांची जात हेच प्रमुख कारण असते. परिसर स्वच्छ राखण्याची जबाबदारी इतरांचीही आहे, हे जोवर लोकांच्या मनावर बिंबविण्यात येत नाही तोर्पयत या अभियानाचा गाजावाजा होत राहणार आहे. सफाई कामगारांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम जर स्वच्छता अभियानात होणार नसेल तर प्रतिष्ठितांनी परिसर स्वच्छ करायचा आणि कचरा उचलायचे काम जातीवर आधारित लोकांकडूनच करवून घ्यायचे, ही स्थिती कायम राहील. 
स्वच्छता ही केवळ संकल्पनाच नसावी तर ते प्रत्येक व्यक्तीतील मूल्य असायला हवे. स्वच्छता राखणो हे घाणोरडे काम आहे, हीच भावना भारतीयांच्या मनात रुजविण्यात आलेली असते. घर स्वच्छ ठेवणो योग्यच असते पण घरातील अस्वच्छता उचलून नेणो ही आपली जबाबदारी नसते ही भावना धार्मिक कारणांनी लोकांच्या मनात दृढमूल झाली आहे. भांडी विसळण्याचे काम मोलकरणीनेच करायचे असते आणि ते काम करण्यास ती जेव्हा उपलब्ध नसेल तेव्हा घरच्या स्त्रियांनीच ते काम करायला हवे. पुरुषांचा त्या कामाशी काही संबंध नसतो या त:हेचे भ्रम लोकांच्या मनात रुजविण्यात आले आहेत. मुस्लिम हे घाणोरडे असतात असाच समज लोकमानसात जोपासण्यात आलेला असतो. अशा समजामुळेच सामाजिक विषमता कायम राहण्यास मदत होत असते.
आमच्या लहानपणी टॉयलेट हे घरापासून खूप लांब असायचे आणि तिथे जाताना कंबरेला टॉवेल गुंडाळून जायची रीत होती. टॉयलेटहून परत आल्यावर हात-पाय स्वच्छ धुणो, इतकेच नव्हे तर कंबरेभोवती गुंडाळलेला पंचासुद्धा धुवून टाकणो अनिवार्य असायचे. त्यानंतरच घरात प्रवेश मिळायचा. नाहीतर घरातील सोवळे विटाळून टाकल्याचा आरोप व्हायचा.
आता शहरी भागातील घरातच टॉयलेट असल्याने त्याविषयीचा तिटकारा आता नाहीसा झाला आहे. तरीही  शौचास गेल्यावर स्नान करण्याची प्रथा अजूनही पाळली जातेच. अशा वृत्तीने स्वच्छता अभियान पूर्णपणो यशस्वी कसे होईल? प्रतिकात्मक रीतीने रस्ते स्वच्छ करण्यापुरतेच ते मर्यादित राहील हे उघड आहे. 
स्वच्छता राखण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात काहीच अयोग्य नाही. पण त्याच्या बरोबरच सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे उद्दिष्टही निश्चितच करायला हवे. लोकांत जे भ्रम आहेत ते दूर करण्याचे कामसुद्धा व्हायला हवे. त्या दृष्टीने समाजात जागृती घडवून आणण्यासाठी जातीच्याविरोधात अभियान राबविण्यात यायला हवे. सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांच्यापासून नरेंद्र मोदींनी स्वच्छतेची प्रेरणा घेतल्याचे दिसते. पण भारतासारख्या विशाल देशात स्वच्छता अभियान यशस्वी होण्यासाठी सफाई कामगारांना प्रतिष्ठा मिळवून देणो गरजेचे आहे. तसेच ‘शहरी  गरिबांसाठी घरे’ ही योजनाही राबविण्याला प्राधान्य द्यायला हवे.
 
नीलांजन मुखोपाध्याय
स्तंभ लेखक

 

Web Title: Pay attention to cleaning workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.