शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पतंगरावजी, आगंतुक जाणं बरं नव्हं...

By राजा माने | Published: March 12, 2018 12:19 AM

इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर यमके (अर्थात एमके आमीर खानच्या पीकेचा डुप्लिकेट यमगरवाडीचा मनकवडे) आज दु:खी अंत:करणाने महागुरू नारद कोणती असाईनमेंट देणार याची प्रतीक्षा करीत होता. नेहमी व्हॉट्सअ‍ॅपवर आदेश देणाºया नारदांनी त्याला थेट व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगच केले...

इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर यमके (अर्थात एमके आमीर खानच्या पीकेचा डुप्लिकेट यमगरवाडीचा मनकवडे) आज दु:खी अंत:करणाने महागुरू नारद कोणती असाईनमेंट देणार याची प्रतीक्षा करीत होता. नेहमी व्हॉट्सअ‍ॅपवर आदेश देणाºया नारदांनी त्याला थेट व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगच केले... महागुरू काही बोलण्याच्या आधीच यमके बोलू लागला... ‘गुरुदेव आज मी तुमची कुठलीच असाईनमेंट घेणार नाही. उलट आज माझंच तुम्हाला मागणं आहे... आमचा जीवाभावाचा माणूस आगंतुक स्वर्गलोकी निघून गेला आहे. त्यांनाच माझं पत्र पोहोच करा आणि आमच्या मनाची घालमेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा!’ नारदांनी क्षणात यमकेची भावना कुणाबद्दल आहे हे ओळखले. कुलपती स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांना पत्र पोहोच करून शिष्याची इच्छा पूर्ण करण्याचा शब्द दिला. यमकेनेही लगोलग आयपॅडवर विद्युत गतीने बोटे फिरवित आपल्या भावनांना वाट करून दिली... अन् आपले पत्र पूर्ण केले...आदरणीय प्रिय पतंगरावजी, प्रेमपूर्वक साष्टांग नमस्कार, काय लिहू साहेब? हे असं आगंतुक अन् माझ्यासारख्या लाखो स्नेह्यांना चटका लावून स्वर्गलोकी निघून जाणं बरं नव्हं... अहो, मिसरूडही फुटलं नव्हतं तेव्हा विद्यानगरी पुण्यात तुम्ही एका पत्र्याच्या दहा बाय दहाच्या खोलीलाच भारती विद्यापीठ या फलकानं सजवलं... सोनसळच्या मातीत गरिबीने दिलेल्या प्रत्येक चटक्याला तुम्ही समाजाचे दु:ख हलकं करणाºया दागिन्यात रूपांतरित करीत गेलात. यशवंतराव मोहिते-भाऊंचे बोट धरून उभ्या महाराष्टÑात एस.टी. महामंडळाची प्रतिष्ठा वाढवित गेला. लोकनेते वसंतदादांच्या विरोधी गोटात काम करूनही दादांवरचा लळा कधी कमी होऊ दिला नाही. लोकनेते राजारामबापूंवरचंही प्रेम जतन करण्यात कधी कमी पडला नाहीत. १९९५ साली विधानसभा निवडणुकीत तुम्ही पराभवाचं तोंड पाहिलं. पण पुन्हा फक्त मुसंडीच मारली नाही तर महाराष्टÑाच्या राजकारणात सदैव ‘भावी मुख्यमंत्री’ हे मानाचं बिरुद घेऊनच लोकसंग्रह विस्तारत गेलात. मला आठवतं १९९९ च्या निवडणूक प्रचारात भिलवडी परिसरात एका तरुणाने स्वत:च्या रक्ताने तुमचे नाव लिहून तुम्हाला विजयाची खात्री दिली होती. त्यावेळी अश्रूंनी भरलेले तुमचे डोळे आजही आमच्या डोळ्यांसमोर येतात. अरे-तुरे बोलणे हा तर तुमचा स्वभावच! मंत्रालय असो वा मतदारसंघ, मंत्री असो वा अधिकारी अरे-तुरे बोलून ‘जय हो’ म्हणण्याची तुमची शैली आमचा ऊर भरून टाकायची. आलेला माणूस रिकाम्या हातानं जाणार नाही याची काळजी तुम्ही सदैव वाहत आलात. पडत्या काळात मदतीला येणाºया कुठल्याही माणसाचा तुम्हाला कधीच विसर पडत नसायचा. उलट माणूस लहान की मोठा हे न पाहता त्याच्या घरी जाऊन त्याने केलेल्या सहकार्याची तोंड भरून कृतज्ञता व्यक्त करणे ही तुमची खासियत. डोंगराच्या कपारीतून अनेक खाचखळगे पार करीत खळखळ वाहणाºया धबधब्यासारखा तुमचा स्वभाव . प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी होताना प्रत्येक क्षणी निर्भेळ प्रेम, माणुसकी आणि सच्चेपणा जतन करणारा आपल्यातला माणूस भेटायचा. साहेब, तुमच्यातला तो माणूस आता आम्ही कुठे शोधायचा... पतंगरावजी असं आगंतुक निघून जाणं बरं नव्हं...- आपला,यमके (इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर) 

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र