महाराष्ट्राच्या राजकारणातील बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे व धनंजय मुंडे, वसंतराव नाईक व मनोहर नाईक, शरद पवार व अजित पवार, अनिल देशमुख व आशिष देशमुख अशा काही काका-पुतण्यांच्या जोडय़ांनी राजकारण गाजविल्याची उदाहरणे कमी नाहीत. ...
जगाच्या राजकारणाला आणि अर्थकारणाला दिशा देणाऱ्या ब्रिटनची अधोगती रोखण्यासाठी आता त्या देशाला आपल्या नीतिमूल्यांच्या फेरतपासणीपासूनच सुरुवात करावी लागेल; अन्यथा सूर्यास्त अटळ आहे. ...
जैश ए मोहम्मद ही कुख्यात दहशतवादी संघटना आणि तिचा पाकिस्तानस्थित म्होरक्या मसूद अजहर याला साऱ्या जगाने दहशतवादी ठरवावे म्हणून सर्व प्रमुख राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रसंघटनेत मांडलेला प्रस्ताव एकट्या चीनच्या आडमुठ्या नकाराधिकारामुळे बाजूला पडला ...
अवकाशसंशोधन, कालगणना, टाइम-ट्रॅव्हल, सापेक्षतावाद, गुरुत्वाकर्षण अशांसारख्या बाबी सहजपणे उलगडून दाखवणारे थोर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आपल्याला लाभलेले असल्याने अवघड गोष्टी सोप्या झाल्या आहेत, असे म्हणता येईल. ...
यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे प्रचारयुद्ध हे समाजमाध्यमांवरच मोठ्या प्रमाणात लढले जाणे उघड असल्याने त्यावर करडी नजर ठेवण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे, हे योग्यच झाले ...
शिरोड्याचे भाजपाचे नेते महादेव नाईक यांच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री व भाजपाचे पहिल्या श्रेणीचे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर बंडखोरी करायला प्रवृत्त झालेत याचे कारण त्यांच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका हेच आहे. ...