अन्य कोणत्याही मौसमाप्रमाणे पांच वर्षांनंतर येणारा निवडणुकांचा मौसम जेव्हा स्थिरावून शांत होतो तेव्हा त्या दरम्यानच्या आपल्या चुकार वर्तनाचा परिपाक हताशपणे पुढील पाच वर्षांसाठी पाहाण्याची पाळी जनतेवर येत असते. ...
गेल्या वर्षी सर्वप्रथम चीनमधून आयात होणाऱ्या ६० अब्ज डॉलर्स किमतीच्या मालावर अमेरिकेने १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क आकारून या व्यापारयुद्धाची सुरुवात केली. सध्या २०० अब्ज डॉलर्स किमतीच्या मालावर हे आयात शुल्क आकारले जात आहे. ...
राज्यातील शेवटच्या चरणात मतदान झालेल्या नाशिक जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत यंदा मतदानाचा ‘टक्का’ वाढला खरा; पण तो तसा अंशत: या संज्ञेत मोडणाराच आहे. ...
हा देश आणि सरकार दहशतखोरांच्या बाजूने आहे की विरोधात? आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या एका हिंमतवान जवानाला शाप देणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीला खतपाणी घालणारे आहे की तिचा बंदोबस्त करणारे, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. ...
श्रीलंकेत ‘इस्लामिक स्टेट’ पोहोचलेलीच नाही, मग ती हे स्फोट कसे करणार? असे वाटले होते, परंतु आता वास्तविकता समोर आली आहे. ‘इस्लामिक स्टेट’ (इसिस) या महाभयंकर, निष्ठूर दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी घेतल्याने ही दृष्टी ठेवणे आणखीनच गरजेचे ठरते. ...
एकरूपता हा मोदींचा तर विविधतेत एकता हा राहुल यांचा मार्ग आहे. देशाची मागणीही विविधता राखून देश एक राहावा ही आहे. आपली मागणी व गरज समजायलाही समाजाला काही काळ द्यावा लागतो. तो त्याला आता मिळाला आहे. ...
न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चमधील हल्ल्याचा सूड श्रीलंकेत का, या प्रश्नाचे उत्तर इसिसच्या कार्यपद्धतीत सापडते. ओसामा बिन लादेनची अल कायदा व इसिस यांच्या कार्यपद्धतीतही फरक आहे. श्रीलंकेच्या हल्ल्यानंतर, भारतानेही सावध राहिले पाहिजे. ...