एक देश- एक नागरी कायदा, एक देश- एक करप्रणाली, एक देश- एक धर्म, एक देश- एक समाज, एक देश- एक भाषा अशाप्रकारची भाषा राष्ट्रीय एकात्मतेशी विशेष संबंध असलेलीच असते असे काही नाही. ...
एखादा अधिकारी किंवा कर्मचारी यांनी एखादे काम केले नाही म्हणून त्याच्या अंगावर शाई फेकणे, तोंडाला डांबर फासणे किंवा चिखलफेक करणे असे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. अशाप्रकारे दांडगावा करून प्रश्न सुटत नाहीत, हेदेखील सिद्ध झाले आहे. ...
विरोधकांचे काम सरकारवर टीका करण्याचे आहे. ते करताना केलेल्या टीकेवर सर्वत्र खटले दाखल करून संबंधिताला त्रास देण्याचा हेतू असेल, तर न्यायालयाने हा बदनामीचा प्रकार नसल्याचे ठणकावून सांगितले पाहिजे. ...
‘झीरो बजेट शेती’ हे ऐकून काल रात्रभर गंगाधरच्या स्वप्नात शून्यांनी फेर धरला होता. जेव्हा-जेव्हा जाग येई त्या-त्या वेळी त्याच्या डोळ्यासमोर फक्त शून्य दिसत होते. ...
भविष्यात साकार करावयाच्या एका भव्य (?) अर्थचित्राची ढोबळ चौकट काय ती नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दुस-या सरकारने आज संसदेत सादर केली. त्या चित्रामध्ये तपशिलाच्या रंगरंगोटीचा पत्ताच नाही. ...