शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा माणसे फणफणायला लागली तर उडून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 07:34 IST

आपल्याला न जमलेली कामे सांगून फडफडू नये! अन्यथा माणसं फणफणायला लागली तर उडून जाल!

महाराष्ट्रातील नेत्यांनी फालतू बडबड बंद करावी. ज्यांना सत्ता मिळाली आहे त्यांनी जोरदार कामाला लागावे. विरोधकांनी त्यांनानवीन कामे सांगावीत, ती करायला भाग पाडावीत; पण आपल्याला न जमलेली कामे सांगून फडफडू नये! अन्यथा माणसं फणफणायला लागली तर उडून जाल! ‘पक्षी फडफडायला लागला, की समजायचं नेम अचूक बसलाय!’ असे टाळीबाज वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक करणारे सध्या कमी पडताहेत वाटते. पु. ल. गेले, व.पु. गेले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची ओघवती वाणीही दृष्टिआड गेली. आता कोण करमणूक करणार? भाऊ कदम कमी पडतो, असे वाटते. चॅनेल्सवर रंगणाऱ्या चर्चेतील दमही हरविला आहे. (त्यांना बोलून बोलून दमा झाला आहे, असे दिसते.) अशा भयानक वातावरणात मराठी माणसाला करमणुकीच्या दुष्काळाला सामोरे जायला लागू नये; असा सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी चंग बांधलेला दिसतो. महाविकास आघाडीचे बाळ जन्माला येऊन अजून पहिला वाढदिवस व्हायच्या आतच कर्जमाफीसाठी भाजपने सर्व जिल्ह्यांत आणि तालुक्याच्या ठिकाणी आठदहा कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन केले. पाच वर्षे राज्यात आणि केंद्रातही सत्तेवर असताना ही कामे निपटता आली नाहीत.

अचानक शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. सत्तेवर असताना शेती अन् शेतकºयांविषयी जाहीर कळवळ्याची भाषा आणि खासगीत माजलेली भाषा वापरणाºयांची ती भाषा आता सत्ता जाताच संपुष्टात आली. अशा भाषेमुळे महाराष्टÑाची वाटचाल विकासाकडे नव्हे तर भकासाकडे चालू आहे. निम्म्याहून अधिक जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न राष्टÑीय दरडोई उत्पन्नाच्या खाली आहे. मराठी कामगारांनी झगडून मुंबई मिळविली म्हणून मुंबई- ठाणे-पुणे-नाशिक पट्टा विकसित झाला. त्याच्या जोरावर तुमच्या तिजोरीत चार पैसे खुळखुळत आहेत. कोल्हापूर सांगलीसारख्या जिल्ह्यांनी स्वकर्तृत्वावर थोडीफार प्रगती साधली; अन्यथा काय वाढून ठेवले आहे? मराठवाड्याची वाटचाल वाळवंटाकडे आणि विदर्भ-खान्देशाची वैराणभूमीकडे सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयमाने राज्यकारभार हाकण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांना दिशा द्या ना! निवडणुका जाहीर होताच, एकमेकांचे कपडे उतरवा! ते जमत नसेल तर पाहूया, महाआघाडीला संधी देऊया! भारतीय जनतेने नरेंद्र मोदी यांना एकदा संधी दिली. ‘कॉँग्रेसला साठ वर्षे दिली, मला साठ महिने द्या, देशाचा चेहरा-मोहरा बदलतो,’ असे सांगणारे नरेंद्र मोदी काठावर पास झाले; तरी मतदारांना वाटले की, आणखीन साठ महिने संधी देणे आवश्यक आहे.देशातील सर्वसामान्य मतदारांमध्ये हा समज आहे. तुम्ही तर राजकारणाचे गारदी आहात. आशिष शेलार काय बोलतात त्याबाबत रोहित पवार काय टिष्ट्वट करतात, त्यावर धनंजय मुंडे कोणता बार उडवितात आणि बिचारा तो पक्षी तडफडायला लागतो. त्याचा काय दोष आहे? तुमच्या या वाचाळ राजकीय धुळवडीने महाराष्टÑाचे थोडेबहुत मनोरंजन होत असेल, पण मराठवाड्याचे वाळवंटीकरण थांबणार नाही. सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्टÑाला भेडसावणाºया दहाच मुख्य प्रश्नांवर एकमत करावे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर येताच शिवसेनेची जहाल तलवार म्यान करून एक नवा महाराष्टÑ घडवायचा ठरविले आहे. त्यांना संधी दिल्याशिवाय संघात पुढे खेळू द्यायचे की नाही, हे ठरविण्यासाठी पाच दिवसांची कसोटी तरी संपायला हवी ना? केवळ एका चेंडूवर सामना संपत नाही. यासाठी ही फालतू बडबडनेत्यांनी बंद करावी. सत्ता मिळाली आहे त्यांनी कामाला लागावे.
विरोधकांनी त्यांना नवीन कामे सांगावीत, ती करायला भाग पाडावीत, आपल्याला न जमलेली कामे सांगून फडफडू नये! अन्यथा माणसे फणफणायला लागली तर उडून जाल! सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील पाणी अडवून पश्चिमेकडे वळविले जाते. ते बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन पूर्वेला नद्यांना वाहू द्या ! सौरऊर्जेच्या माध्यमातून मराठवाड्याला पाणी देता येणे शक्य आहे. कृष्णा आणि गोदावरी नदीखोºयांतील उपनद्यांच्या जोडण्याचा प्रयोग यशस्वी करता येईल. असे काही महत्त्वाचे निर्णय घेण्याऐवजी कलगीतुरा रंगविण्याचा छंद कशाला जोपासता? जनतेची कामे करा. सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, जळगाव या शहरांच्या विकासासाठी विशेष योजना आखावी लागेल. मुंबई-पुण्यावरील ताण याशिवाय कमी होणार नाही. केवळ मेट्रो किंवा वरळी सीफेसच्या रस्त्याने प्रश्न सुटेल, असे वाटत असेल तर ती तुमची घोडचूक आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस