शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे विनाश अटळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 13:22 IST

- अविनाश कुबल (ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक)  जवळपास २० वर्षांपासून जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होत असलेले ऋतुबदल याचे छोटे-मोठे परिणाम ...

- अविनाश कुबल(ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक) 

जवळपास २० वर्षांपासून जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होत असलेले ऋतुबदल याचे छोटे-मोठे परिणाम दिसून येत होते. परंतु, आता गेल्या पाच वर्षांमध्ये याची तीव्रता आणि याचे प्रमाण वाढत चालले आहे. महाराष्ट्राच्या विविध प्रदेशांचे निरीक्षण आणि अभ्यास केला असता सर्वत्र जागतिक तापमानवाढीच्या आणि ऋतुबदलाच्या खाणाखुणा दिसून येत आहेत.

समुद्रकिनाऱ्याला लागून असलेला कोकण, सह्याद्रीच्या पलीकडचा खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्र, त्याच्या पूर्वेला असलेला मराठवाडा आणि सुदूर पूर्वेचा विदर्भ अशा वैविध्यपूर्ण प्रदेशांवर झालेल्या परिणांमामुळे सर्वत्र हलकल्लोळ माजलेला आहे. अर्थातच त्याला जोड आहे ती मानवनिर्मित घटकांचीसुद्धा. 

कोकणात सह्याद्रीमध्ये प्रमाणाबाहेर गेलेले वणवे, सोबतच गेल्या काही वर्षांत सह्याद्रीमध्ये झालेली बेफाम वृक्षतोड, त्याकडे नियंत्रण ठेवणाऱ्या सरकारी यंत्रणांचे अक्षम्य दुर्लक्ष, नष्ट होत असलेली सह्याद्रीतील जैवविविधता, यामुळे बिघडलेले पर्यावरण आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे होणारे डोंगरांचे भूस्खलन आणि पुरांचे वाढलेले प्रमाण. याचा परिणाम म्हणजे शेती, मासेमारी आणि फळबागा या कोकणातील पारंपरिक व्यवसायांचे प्रचंड नुकसान. डोंगर पोखरून केलेले वाढते खाणकाम, जंगले नष्ट झाल्यामुळे अन्नाच्या शोधत जंगलातून बाहेर पडलेले माकडे, गवे, हत्ती यासारखे प्राणी मोठ्या प्रमाणात शेती आणि फळबागांची नासधूस करीत आहेत. 

मराठवाडा : पाण्याचा अतिउपसामराठवाड्याची परिस्थिती सर्वांत जास्त वाईट आहे. पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचा अभाव, अतिउपशामुळे भूगर्भजलाची खालावलेली पातळी, हा फारच मोठा जटिल प्रश्न या प्रदेशाला भेडसावतो आहे. कोरडवाहू प्रकारच्या शेतीवर प्रामुख्याने अवलंबून असलेला हा प्रदेश सोबतच जमिनीच्या ऱ्हासामुळे झालेले अत्यंत घातक परिणाम भोगत आहे. 

प. महाराष्ट्र : शेती संकटातपश्चिम महाराष्ट्र हा पाण्यासाठी पूर्णपणे सह्याद्रीवर अवलंबून असलेला प्रदेश. पावसाच्या अनियमिततेमुळे आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीमुळे सोबतच भूगर्भजलाचा प्रमाणाबाहेर उपसा यासारख्या मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देणे कठीण झालेले आहे. पाण्याअभावी शेती तर संकटात आलीच आहे, परंतु सोबत भूगर्भातील पाण्याची पातळी प्रमाणाबाहेर खालावल्यामुळे त्याचा परिणाम नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या वनस्पती सृष्टीवर झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक वनस्पती नष्ट होऊन त्याऐवजी आक्रमकपणे फोफावणाऱ्या वनस्पती प्रजातींनी सुपीक जमिनीवर आक्रमण केले आहे. केवळ व्यावसायिक पिके घेण्यावर असलेला भर, त्यासाठी लागणारे भरमसाठ पाणी, रसायनांचा वापर, त्यामुळे नापिक झालेल्या शेतजमिनी, या सर्वांचा अत्यंत वाईट परिणाम शेतीआधारित उद्योगधंद्यांवर झाला आहे.

खान्देश : शहरांकडे स्थलांतरखान्देश प्रदेशाचा विचार केला असता अत्यंत अनियमित झालेल्या पावसामुळे कधी दुष्काळ, तर कधी पूरस्थिती त्यामुळे शेतीचे आणि इतर पारंपरिक व्यवसाय म्हणजे दूधदुभते वगैरेची झालेली प्रचंड हानी. त्यामुळे खान्देशातील लोकांची झालेली वाताहत रोखण्यासाठी कोणतेही ठोस असे प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत. परिणामी खान्देशातील लोकांना शहरांकडे स्थलांतराचा पर्याय स्वीकारणे भाग पडत आहे.

विदर्भ : दुष्काळाची भीतीविदर्भ प्रदेशाची परिस्थितीसुद्धा बऱ्याचशा अंशी मराठवाड्यासारखीच झालेली आहे. पाण्याच्या अभावी जवळपास नष्ट झालेली शेती, फळबागा, पशुधन यामुळे जवळपास दुष्काळी स्थिती या प्रदेशात दिसून येते.

जमिनीचे तापमान वाढले आणि...जमिनीचे तापमान वाढल्याने जिवाणू नष्ट झाले आहेत. जमिनीची फळद्रूपता कमी अथवा नष्ट होत आहे. प्रशासनाने अशावेळी वनविभाग, शेती विभाग, जलसंधारण विभाग, अशा सर्वांना एकत्र करून जागतिक तापमानवाढ आणि ऋतुबदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आराखडा तयार करून आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद करून काम सुरू करायला हवे. समुद्रकिनारपट्टी, डोंगराळ भाग, नद्या, तलाव, पाणथळ जागा, गवताळ प्रदेश आणि शुष्क पठारे अशी कोणत्या प्रकारची भूपृष्ठरचना यातून मुक्त नाही आणि त्यामुळेच आपली सर्व शहरे, खेडी, गावे ही सुद्धा भयानक परिस्थितीला सामोरी जाणार आहेत. हे सर्व थांबवायलाच हवे, अन्यथा मानवजातीचा विनाश अटळ आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ