शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

कोरोनामुळे देशातील पर्यटनासाठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 04:55 IST

गेले २ महिने कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यावरील अनेक थेअरीज्, चर्चा, व्हिडीओज् पाहून जग एका अदृश्य भीतीतून जात आहे, असे वाटते.

- झेलम चौबळआर्टिफिशिल इंटिलिजन्सच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ‘डिसरप्शन’ हा परावलीचा शब्द झाला आहे़ परंतु तो कॉर्पोरेट जगातून कधी आपल्या जीवनाचाच अविभाज्य घटक होऊन बसला हे कळलेच नाही. गेल्या २० वर्षांत आपल्या आयुष्यात अनेक डिसरप्शन्स आली. त्यातील बहुतांशी कल्पनेच्या बाहेरची होती. ९/११ चा अमेरिकेतील हल्ला, २००० सालचा सार्स आजार, त्सुनामी, इबोला, २००८ सालचे अमेरिकेमधील रिसेशन आणि नुकताच आलेला कोविड-१९ हा कोरोना व्हायरस. जगाची मानसिकता बदलवणाऱ्या या घटना आहेत. आपल्या विचारांवर आणि राहणीमानावर या घटनांचे खोलवर प्रतिबिंंब उमटते. नैसर्गिक आपत्तीला कोणीही रोखू शकत नाही़ मानवनिर्मित संकटांपुढे आपला नाइलाज असता़े़ दुर्दैवाने दोन्हीचे परिणाम भोगावेच लागतात. जगभरात काहीही झाले की त्याचा पहिला दृश्य परिणाम तिथल्या स्थानिक पर्यटनावर होतो, हे मात्र नक्की. इबोला, सार्स, करोना व्हायरस या आजारांचा परिणाम जगभरातील पर्यटनावर झाला आहे. गेले २ महिने कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यावरील अनेक थेअरीज्, चर्चा, व्हिडीओज् पाहून जग एका अदृश्य भीतीतून जात आहे, असे वाटते.चायना आज व्यापाराच्या दृष्टीने जगाशी जोडला गेला आहे. खरेतर, चायनाला ‘फॅक्टरी आॅफ द वर्ल्ड’ असेही म्हटले जाते. कोरोनामुळे सप्लाय चेनमधल्या रिसोर्समध्येच मोठा अडथळा निर्माण झाला आहे. स्टॅण्डर्ड चार्टर्डच्या रिसर्चप्रमाणे चायनाची इकोनॉमी ४२% नी घसरली आहे. चायनीज विमानसेवेला १२.८ बिलीयन डॉलर्सचा रेवेन्यु लॉस होणार आहे. कंपन्यांना त्यांचे नॉन परफॉर्मिंग लोन रिपे करण्यासाठी त्रास होणार आहे. त्याची आकडेवारी १.१ ट्रिलीयन डॉलर्स इतकी आहे. जगभरातील विमानसेवा २९ बिलीयन डॉलर्सपर्यंत तोट्यात येऊ शकते. सगळीकडील शेअर बाजाराचा इंडेक्स कोसळला आह़े़ त्यावरून जगाला कोरोना व्हायरसची झळ बसते आहे, ते आपणाला दिसतेच आहे. काही इकॉनॉमिस्टचे म्हणणे आहे की, खºया परिणामांची धग तेव्हा जास्त जाणवेल जेव्हा व्हायरसमुळे थेट नुकसान न झालेले म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रॅव्हलव्यतिरिक्त इतर इंडस्ट्रीज स्लो डाऊन रिपोर्ट करतील. ‘द आॅर्गनायझेशन ङ्खफॉर इकॉनॉमिक को-आॅपरेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’च्या म्हणण्यानुसार, ग्लोबल ग्रोथ रेट कमी होण्याची दाट शक्यता आहे.

सार्स आणि कोरोना या दोन्ही व्हायरसचा उगम चायनामधून झालेला आहे. सहज मनात विचार आला, नजीकच्या काळात जगात उत्पात घडवेल असा कोणताही आजार किंवा व्हायरस भारताने जगाला दिला नाही. कदाचित याचे उत्तर आपल्या खाद्यसंस्कृतीत किंवा आयुर्वेदात असेल का? आपल्याकडे बरेच लोक शाकाहारी आहेत. जे मांसाहारी आहेत, तेसुद्धा अन्न पूर्ण शिजवतात आणि त्यात हळद, मसाले, आले, लसूण यांचा वापर करतात. यांच्या वापरामुळे कदाचित बॅक्टेरिया मरत असतील किंवा बाधत नसतील. चायनावरचे आणि पर्यायाने जगावरचे हे संकट लवकर आटोक्यात यायलाच हवे. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, पॅनिक होण्याची गरज नाही़ कारण कोविड-१९ साठीचे औषध लवकरच बाजारात येत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जेवढ्या केसेस पॉझिटिव्ह आहेत, त्याच्यापेक्षा जास्त लोक क्युअर होत आहेत.एअरलाइन्स एप्रिल-मे महिन्यांसाठी वेट अ‍ॅण्ड वॉच असा सल्ला देत आहेत़ हे चित्र नक्कीच आशावादी वाटते आहे. मला वाटते, भारताच्या दृष्टीने आपले देशांतर्गत पर्यटन सुरळीत चालण्यासाठी आणि वाढविण्यासाठी ही सुसंधी आहे. जगभरातील पर्यटकांना भारताच्या वैविध्याचे प्रचंड अ‍ॅट्रॅक्शन आहे. राज्याराज्यांप्रमाणे बदलणारी आपली भाषा, पोशाख, खाद्यसंस्कृती याने परदेशी मंडळी अचंबित होतात. योगा, आयुर्वेदा, हिलिंग, ज्योतिष सगळंच त्यांना आकर्षित करतं. शासनाने हा मुद्दा ऐरणीवर घेऊन लवकरात लवकर वर्ल्डक्लास इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याची गरज आहे. मग भारताला पर्र्यटनाच्या बाबतीत कोणीही रोखू शकणार नाही. जगात कुठेच नाहीत अशा अनंत गोष्टी आपल्या भारतात आहेत. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपनीज् आज चायनानंतर दुसरी बाजारपेठ किंवा रिसोर्स मार्केट शोधत आहेत. त्यांची इन्व्हेस्टमेंट भारताकडे वळविण्याची ही उत्तम संधी आहे असे वाटते.
आपण सर्वांनी असा आशावाद ठेवायला हवा़ कारण याआधीच्या साºया संकटांतून आपण बाहेर पडलेलो आहोत़ हेही संकट टळेल. काही वेळा काही मीडियातून भीतीचे वातावरण पसरवले जाते़ परंतु आपण पॉझिटिव्ह न्यूज लक्षात घ्यायला हव्यात. अफवांवर विश्वास न ठेवता सोशल मीडियाचा वापर पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी करायला हवा. सिंगापूर, थायलँड, मलेशियामध्ये कोरोना व्हायरसच्या काही इन्फेक्टेड केसेस सापडल्या आहेत; पण मृत्यूची नोंद नाही. पर्यटकांसाठी हे देश सेफ आहेत. इस्रायलने दावा केलाय की त्यांनी कोरोनावर औषध शोधून काढलेय आणि पुढच्या काही दिवसांत कोरोना आटोक्यात येण्याची शक्यता आहे. तेव्हा योग्य खबरदारी घेऊन पॅनिक न होता येणाºया भविष्यातील संधीचा विचार केला की नक्कीच दिलासा मिळेल. We have to remember our present situation is not our final destination, the best is yet to come.     (संचालिका, केसरी टूर्स)

टॅग्स :corona virusकोरोना