आॅनलाइन फार्मसी धोकादायकच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 11:51 PM2018-09-24T23:51:35+5:302018-09-25T00:09:38+5:30

औषध निर्यातीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळखले जाते. जगाला लागणारी ८0 टक्के औषधे भारत निर्यात करतो. या क्षेत्राला आता आॅनलाइन फार्मसी ते बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आक्रमण असे अनेक अडथळे भेडसावू लागले आहेत.

Online pharmacy is dangerous | आॅनलाइन फार्मसी धोकादायकच

आॅनलाइन फार्मसी धोकादायकच

googlenewsNext

- कैलास तांदळे
(
अध्यक्ष, महाराष्ट्र रजि. फार्मा. असो.)

औषध निर्यातीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळखले जाते. जगाला लागणारी ८0 टक्के औषधे भारत निर्यात करतो. या क्षेत्राला आता आॅनलाइन फार्मसी ते बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आक्रमण असे अनेक अडथळे भेडसावू लागले आहेत. २५ सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. फार्मसी आणि रुग्णांसमोरील धोक्यांबाबतची चर्चा यानिमित्ताने होणे गरजेचे आहे.
१९९0 च्या दशकात दहा ते बारा हजार कोटींच्या घरात असलेल्या भारतीय औषधी उद्योगाने २१ व्या शतकात ४0 बिलियन डॉलरकडे झेप घेतली. भारत देशांतर्गत औषधनिर्मितीमध्ये स्वयंपूर्ण आहे. देशामध्ये उपलब्ध असलेले मनुष्यबळ, ज्ञान व कौशल्यामुळे ही प्रगती करणे भारतासारख्या देशाला सहज शक्य झाले. भारतात दरवर्षी तयार होणारे ७0 हजार फार्मासिस्ट औषध संशोधन, उत्पादन, विक्र ी व निर्यात क्षेत्रात काम करतात. याबरोबरच क्लिनिकल रिसर्च, ट्रायल, डेटा मॅनेजमेंट, फार्माकोविगीलन्ससारखी औषधनिर्मितीसाठीची महत्त्वपूर्ण कामेही फार्मासिस्ट करत असतात. या सर्व गोष्टी फार्मासिस्ट करतो याची माहिती बºयाच जणांना नसते.
अन्न व सौंदर्य प्रसाधन कायद्याच्या तरतुदीनुसार औषधविक्री परवानाधारक औषध पेढीतून राज्य औषध व्यवसाय परिषदेत नोंदणीकृत फार्मासिस्टच्या उपस्थितीत व देखरेखीखाली झाली पाहिजे. फार्मासिस्टला औषध व्यवसायात असणाºया संधीबरोबरच थेट डॉक्टरांनी रुग्णांना सुरू केलेली औषधविक्री व आॅनलाइन /ई-फार्मसी आव्हानेही आहेतच. आजकालच्या डिजिटल जमान्यात जीवनावश्यक वस्तू आॅनलाइन वेबसाइट व अ‍ॅप्सच्या माध्यमातून खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. विविध वेबसाइट व अ‍ॅप्सवर औषधेही आॅनलाइन उपलब्ध आहेत. भारतासारख्या देशाची औषधांचा प्रचंड खप असलेली बाजारपेठ बहुराष्ट्रीय कंपन्यांना खुणावत आहे. या कंपन्याही लवकरच किरकोळ औषधविक्र ी व्यवसायात उतरत आहेत. यात रिटेल फार्मासिस्टबरोबरच नुकसान होणार आहे ते रुग्णांचे. कारण आॅफलाइन रिटेल फार्मसीसाठी असणाºया औषधविक्रीसाठी अन्न व सौंदर्य प्रसाधन कायद्याअंतर्गत अनेक नियम आहेत, तसे नियम, मार्गदर्शक तत्त्वे अथवा नियंत्रण आॅनलाइन फार्मसीसाठी नसल्याने आॅनलाइन औषधविक्र ी विनानिर्बंध धडाक्यात सुरू आहे. या आॅनलाइन फार्मसीचे दुष्परिणाम व धोके तरुण पिढीला आहेत.
बरीच कुमारवयीन मुले-मुली आॅनलाइन फार्मसीचा वापर नशा व गुंगी आणणाºया झोपेच्या तसेच गर्भपाताच्या गोळ्या मिळवण्यासाठी करत असल्याचे दिसून आले आहे. नफ्यासाठी सुरू असलेल्या आॅनलाइन फार्मसीवाल्यांना याच्याशी काही घेणे-देणे नाही. आॅनलाइन फार्मसीच्या माध्यमातून खोट्या प्रिस्क्रिप्शनच्या आधारे होणारी विक्री तसेच कुरिअरच्या माध्यमातून होणाºया विक्रीमुळे ३-४ दिवसांच्या कालावधीत औषधांचे तापमान नीट राखले जात नसल्याने औषधी घटक कुचकामी ठरू शकतात. त्यामुळे अशी औषधे योग्य परिणाम साधतील याची हमी नसते.
आॅनलाइन फार्मसीला सरकारने परवानगी दिली तर देशातील नऊ लाख किरकोळ औषध व्यवसायातील फार्मासिस्ट्सबरोबरच या व्यवसायातील जवळपास दोन कोटी लोकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार जाऊन त्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याची भीती आहे.

Web Title: Online pharmacy is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.