शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

जमिनीतून वर येते आहे देखणे मणिकर्णिका कुंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 01:30 IST

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या आवारात गेली ६३ वर्षे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेली एक देखणी वास्तू कमळ उमलावे तशी मातीतून बाहेर येते आहे..

इंदुमती गणेश

करवीरनिवासिनी अंबाबाईचे वास्तव्य आणि राजर्षी शाहू महाराज यांचे पुरोगामित्व लाभलेले कोल्हापूर. अगणित तीर्थकुंडे, जलाशये आणि तळ्यांचे शहर. या जलाशयांमध्ये पुराणकालीन वास्तुसौंदर्याचा अजोड नमुना म्हणजे अंबाबाई मंदिराच्या आवारातील मणिकर्णिका कुंड! भारतीय स्थापत्यशैलीमध्ये मंदिरांच्या शेजारी किमान दोन जलाशयांची निर्मिती असते.

भक्ताला पाणी मिळावे, क्षणभर विश्रांती घेता यावी हा हेतू! देशातील अनेक मंदिरांशेजारी अशी कुंडे असतात. त्यातलेच एक म्हणजे हे मणिकर्णिका कुंड! अंबाबाई मंदिराच्या सपाटीपासून ४० फूट खोल, ६० फूट लांब, ६० फूट रुंद असे चौकोनी! त्यात उतरण्यासाठी शेजारच्या मुक्तिमंडपातून दक्षिणेला तसेच उत्तरेला पायऱ्या. खाली प्रशस्त जलाशय. जिवंत झरे असल्याने यातील पाणी कधीच आटले नाही. मोठी कासवे आणि माशांचा येथे मुक्त वावर असे.  पूर्ण दगडी बांधकाम. भक्तांना स्नानानंतर वस्रे बदलण्यासाठी भव्य मंडप. महिलांसाठी स्वतंत्र बंदिस्त जागा. खांबांवर देखणे कोरीव काम! राजघराण्यातील महिला-पुरुष येथे स्नान करण्यासाठी आले की अंगावरची वस्त्रे येथेच सोडून जात. नंतर ही वस्त्रे घेण्यासाठी स‌र्वसामान्यांची गर्दी होत असे.  शहरीकरण सुरू होताच कोल्हापुरात एवढ्या जलाशयांची गरजच काय, त्यात भराव टाकून जमिनी उपलब्ध करू  अशी चर्चा सुरू झाली. १९५८ साली मणिकर्णिका कुंडावर हातोडा पडला. कुंडात कचरा टाकला जातो, पीडित स्त्रिया  आत्महत्या करतात ही कारणे कुंड बुजविण्यासाठी पुरेशी होती. त्या वेळी कोल्हापूर नगरपालिकेने आधुनिक कोल्हापूरचे शिल्पकार  जे. पी. नाईक यांच्यासह त्रिसदस्यीय नगरविकास समिती नियुक्त केली.  नाडकर्णी नावाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कुंडातील पाण्याचा उपसा करून गाळ काढण्याचा प्रयत्न केला. पण, जिवंत झऱ्यांमुळे पाणी हटेना. पूर्ण उपसलेले कुंड एका रात्रीत पुन्हा भरायचे. असे चार महिने चालले.

शेवटी उपसा थांबवून जे. पी. नाईक यांनी कुंड बुजविण्याचा निर्णय घेतला. शेजारचा महंतांचा वाडा आणि निरंजन आखाड्याची इमारत पाडून त्याचा भराव या कुंडात टाकला गेला. नगरपालिकेला जमीन मिळाली, बाग तयार केली गेली आणि पुढे महापालिकेने त्यावर थेट सुलभ शौचालयच उभारले. अशा रीतीने ‘मणिकर्णिका कुंड’ ही सुरेख वास्तू, त्यासोबत जोडले गेलेले धार्मिक अधिष्ठान सगळे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. १९५८ साली मणिकर्णिका बरोबरच कपिलतीर्थ, खंबाळातीर्थ ही तीर्थकुंडे बुजविली गेली. कोरीव रेखीव दगडीकाम केलेली अनेक मंदिरे, ओवऱ्या, पौराणिक कथा, परंपरा, धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या वास्तू जमिनीखाली गाडल्या गेल्या. तब्बल ६३ वर्षे मातीच्या ढिगाऱ्याखाली बंदिस्त झालेले  हे मणिकर्णिका कुंड आता पुन्हा प्रकाशात येत आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने गेल्या नऊ महिन्यांपासून या कुंडाचे उत्खनन सुरू आहे. त्यात महादेवाची मंदिरे, ओवऱ्या, पायऱ्या, वीरगळ, ध्यानसाधनेसाठीचे मंडप या वास्तू प्रकाशात आल्या आहेत. शिवाय तांब्याची नाणी, अनेक देवतांच्या मूर्तींसोबतच बंदुकीचे बार, पुंगळ्या, घड्याळ, तांब्याचे तांबे, भोजनपात्र, काचेचे कंदील, मापटी, तांब्याची असंख्य नाणी, जर्मन बनावटीची बंदूक अशा साडेचारशेहून अधिक वस्तू सापडल्या आहेत. आतापर्यंत २७ फूट खुदाई झाली असून आणखी १३ फूट खुदाई होईल. सध्या जेथून पाण्याचे उमाळे फुटतात, ते मुख्य १४ बाय १८ फूट आकाराचे चौकोनी कुंड सापडले आहे.

तळ्यातून कमळ उगवावे तशी जमिनीत गाडलेली  एका देखणी वास्तू पुन्हा उमलू लागली आहे. आंधळ्या शहरीकरणाच्या नादात आपण आपल्याच इतिहासाच्या, परंपरांच्या अशा अनेक खुणा जमिनीत गाडतो, तेव्हा त्याबरोबर आपले सत्त्वही गाडले जात असते. आता खिशाला परवडतो म्हणून युरोपचा प्रवास करायला जाणारी आपण भारतीय माणसे तेथील संवर्धन केलेल्या वास्तू पाहून अवाक्  होतो, तेव्हा आपण आपल्याच अंगणात काय काय गाडून वर सिमेंटचे ठोकळे  उभारत सुटलो आहोत, याचा विचारसुद्धा आपल्या मनात येत नाही. दगडी बांधकामातल्या जुन्या देखण्या मंदिरांना सिमेंटचे प्लास्टर चढवून वर लाल-निळे रंग फासण्याचा निर्बुद्धपणा म्हणजेच ‘सौंदर्य’ अशी काहीतरी भलतीच व्याख्या हल्ली झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कौतुक यासाठी की त्यांनी  जमिनीत गाडलेला इतिहास उकरण्याची, झाली चूक दुरुस्त करण्याची तयारी दाखवली. 

(लेखिका लोकमत कोल्हापूर आवृत्तीमध्ये वार्ताहर आहेत )

टॅग्स :kolhapurकोल्हापूर