शहरं
Join us  
Trending Stories
1
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
2
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
3
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
4
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
5
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
6
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
7
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
8
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
9
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
10
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
11
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
12
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
13
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
14
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
15
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
16
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
17
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
18
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
19
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
20
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

आता कंत्राटदारांच्या आत्महत्या; ‘लाडकी बहीण' सारख्या योजनांवर कोट्यवधी खर्च, थकबाकी भागवायला पैसा नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 09:55 IST

व्यवसायाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी काही खासगी व्यक्तींकडून पैशांची उचल घेतली होती. त्या कथित सावकारांचा तगादा सुरू होता आणि सरकारी खात्यांकडील बिले मिळण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. या तंगीला कंटाळून सोमवारी त्यांनी गळफास घेतला.

खेड्यापाड्यातील जलजीवन मिशनची कामे करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येच्या वेदना ताज्या असताना नागपुरात आणखी एका कंत्राटदाराने मृत्यूला मिठी मारली. पेनमाचा वेंकटेश्वर अर्थात पी. व्ही. वर्मा हे कंत्राटदार हाॅटमिक्सची कामे करायचे. हे वर्मा नागपूर भागातील मोठे कंत्राटदार होते. नागपूर व हैदराबाद येथे त्यांच्या विस्तारित कुटुंबांचा प्रतिष्ठित वर्तुळात वावर होता. बाहुबली चित्रपटाचा नायक प्रभास हा त्यांचा दूरचा नातेवाईक होता. सरकारी कंत्राटांचा कित्येक वर्षांचा अनुभव वर्मा यांच्या गाठीशी होता. सार्वजनिक बांधकाम व इतर सरकारी खात्यांकडे त्यांची ३५-४० कोटी रुपयांची बिले थकली होती. व्यवसायाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी काही खासगी व्यक्तींकडून पैशांची उचल घेतली होती. त्या कथित सावकारांचा तगादा सुरू होता आणि सरकारी खात्यांकडील बिले मिळण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. या तंगीला कंटाळून सोमवारी त्यांनी गळफास घेतला.

 अशा मृत्यूंकडे संवेदनशीलपणे पाहण्याची आपल्या व्यवस्थेला सवय नाही. उलट, असे काही घडले की त्याच्याशी आपला काही संबंध नाही, हे सिद्ध करण्याची अहमहमिका अधिकारी व सत्ताधारी नेत्यांमध्ये लागलेली असते. वर्मा यांच्या आत्महत्येनंतर कोणी साधे दु:खही व्यक्त केले नाही. असा दुखवटा व्यक्त करूनही काही साध्य होणार नव्हते. कारण, हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर डझन-दीड डझन आमदारांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तेही कोरडे सांत्वन. कोणी मदत केली नाही. राज्यातील कंत्राटदारांची संघटना हर्षल यांच्या कुटुंबाच्या मदतीला धावून आली तेवढेच. असो. या आत्महत्यांनी महाराष्ट्राच्या अर्थकारणाविषयी काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.कर्जात बुडालेले शेतकरी, हाताला कामधंदा नसल्याने बेरोजगार किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने व्यवसाय डबघाईस आल्यामुळे छोटे व्यावसायिक हे तुलनेने छोटे घटक आतापर्यंत आत्महत्या करीत होते. अशा आत्महत्यांची समाजाला इतकी सवय झाली आहे की, आता अशा जिवांसाठी कोणी हळहळतही नाही. ज्यांच्या हातात सतत पैसा खुळखुळतो ते कंत्राटदार किंवा ठेकेदार किंवा गुत्तेदार यांचा वर्ग तुलनेने सुखवस्तू, श्रीमंत मानला जातो. अशा मोठ्यांच्या वेदनाही मोठ्या असल्या तरी किमान समाजात या वर्गाची प्रतिमा तरी अशीच आहे. हा श्रीमंत वर्गही गेल्या वर्षभरापासून संकटात आहे. कारण, राज्यभरातील कंत्राटदारांची जवळपास ९० हजार कोटींची बिले थकली आहेत. ही रक्कम केवळ राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या खात्यांची आहे. जिल्हा परिषदांचे अन्य काही विभाग, महापालिका, नगरपालिका, आदींच्या बिलांचा विचार केला तर जवळपास सव्वा लाख कोटींहून अधिक रक्कम या सर्व छोट्या-मोठ्या कंत्राटदारांना घेणे आहे. अधिकारी-कामगारांचे पगार कसे भागवायचे, ही चिंता कंत्राटदारांना भेडसावत आहे. जुन्या कामांची बिले थकली असल्याने गेल्या आठ महिन्यांत नव्या कामांना मंजुरी नाही. जिल्हा नियोजन समित्यांनी मंजूर केलेल्या आराखड्यांमधील कामांना हात लागलेला नाही. आमदारनिधीची कामे सुरू झालेली नाहीत. त्याचे कारण, सरकारकडे अशा कामांसाठी निधीच नाही. महायुती सरकारला सत्तेवर आणणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेसारख्या लोकप्रिय योजनांवर हजारो कोटी खर्च होत असल्याने थकबाकी भागविण्यासाठी, नव्या कामांसाठी पैसा उपलब्ध नाही. 

राज्याचे अर्थकारण पुरते बिघडले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी साठ-पासष्ट हजार कोटी, पेन्शनसाठी चाळीस हजार कोटींहून अधिक, राज्यावरील अंदाजे नऊ लाख कोटी रुपये कर्जाच्या व्याजापोटी लागणारे जवळपास पंचाहत्तर हजार कोटी अशा काही प्रमुख अनिवार्य खर्चाचा विचार केला तर वर्षाकाठी राज्य सरकारला जवळपास तीन लाख कोटी रुपये लागतात. त्यात महिलांना सरसकट दरमहा द्यावयाच्या प्रत्येकी पंधराशे कोटी रुपयांचा वाढीव बोजा सरकारवर आहे. 

परिणामी, कोणी मान्य करो अथवा न करो, राज्य गंभीर आर्थिक संकटात सापडले आहे. चिंतेची बाब म्हणजे या विषयावर ना सत्ताधारी, ना विरोधक कोणीही बोलत नाही. त्याऐवजी कमी महत्त्वाच्या विषयांवर आरोप-प्रत्यारोपात सगळे जण मश्गूल आहेत. कंत्राटदारांच्या आत्महत्यांनीदेखील कोणाची कातडी थरथरत नाही. तेव्हा विकासासाठी निधी कमी पडणार नाही, हे पालूपद ऐकविणारी मंडळी विकास पुढे नेणारे घटक कर्जाच्या विळख्यात सापडले असताना काय करणार आहे?

टॅग्स :nagpurनागपूर