आता गरज सायबर एज्युकेशनची

By Admin | Updated: November 9, 2014 01:24 IST2014-11-09T01:24:16+5:302014-11-09T01:24:16+5:30

डॅशिंग, अॅक्शनपॅक्ड जाहिरातींचा मुलांवर, विशेषत: टिनएजरवर दुष्परिणाम होत असतो. अल्कोहोलिक पेयांची जाहिराती उघडपणो करण्यास बंदी आहे,

Now need cyber education | आता गरज सायबर एज्युकेशनची

आता गरज सायबर एज्युकेशनची

डॅशिंग, अॅक्शनपॅक्ड जाहिरातींचा मुलांवर, विशेषत: टिनएजरवर दुष्परिणाम होत असतो.  अल्कोहोलिक पेयांची जाहिराती उघडपणो करण्यास बंदी आहे, म्हणून त्याच नावाच्या सोडय़ाच्या जाहिराती क्षणाक्षणाला दिसतात.
 
मार्केटिंगचा जमाना अपरिहार्य आहे. त्याचे काही फायदेही आहेत. केवळ मुले गैरवापर करतात, यासाठी आपण ते रोखू शकत नाही. पाऊस कोसळत असताना तो थांबवता येत नाही, पण आपण किमान छत्री तर उघडू शकतो. त्यासाठी अनेक बाबी पालकांच्या हातात आहेत. मुलांना केवळ विरोध करण्यापेक्षा त्यावर चर्चा घडवून आणत त्यातील वास्तवता त्यांच्या नजरेस आणून द्यावी. किंबहुना त्यांनाच त्याचे विेषण करावयास लावून त्यातून निर्णय घेण्याची त्यांची क्षमता वाढीस कशी लागेल, हे पालकांनी पाहावयास हवे. एकूणच सेक्स एज्युकेशनप्रमाणो आता मुलांना सायबर एज्युकेशन देणो ही काळाची गरज झाली आहे. 
इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बरसणा:या जाहिरातींना बळी पडून मुलांनी अनावश्यक शॉपिंग करण्यामागे अनेक कारणं असतात. लहानपणी आपल्याला मिळालं नाही म्हणून गरज असो वा नसो, पालकांकडून मुलांची हौस पुरवली जाते. अनेकदा मुलांना कसं समजवायचं हेच पालकांना माहीत नसतं, त्यामुळे ते मुलांचा हट्ट पूर्ण करतात. आपलं मूल मागे पडायला नको, अशी अनेकांची भावना असते. काही पालक स्वत:च महागडय़ा अथवा अनावश्यक असताना ब्रँडेड वस्तू वापरत असतात. मग आपल्या मुलांना कसं समजवायचं, हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाइन शॉपिंगचा बाऊ करीत मुलांना घाबरवून सोडू नये. कारण पुढेमागे ऑनलाइन बँकेचे व्यवहार करण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. त्या वेळी भीतीचा बागुलबुवा त्यांच्या मानेवर असायला नको. मात्र इतर शॉपिंग करताना केवळ उत्पादनाच्या बाह्यरूपाला न भुलता उपयोगी वस्तू रास्त किमतीत मिळत असेल तर ती का नको, असा प्रश्न मुलांना कसा पडेल याची खबरदारी घेतली पाहिजे. जाहिरातींचा नकारात्मक परिणाम मुलांवर होणार नाही, यासाठी पालकांनी जागरूक राहायला हवे. अशावेळी अनावश्यक शॉपिंग, ऑनलाइन शॉपिंगचे अनुभव सांगणो त्यावर साधकबाधक चर्चा होणो अपेक्षित असते. 
मुले रोल मॉडेल म्हणून आईवडिलांकडे पाहात असतात. तेच जर घरातील इतर कुणाची मते विचारत न घेता खरेदी करीत असतील तर मुलेही त्यांचेच अनुकरण करतात. असे पालक मुलांना दटावू शकत नाहीत. त्यासाठी महागडय़ा वस्तू घेताना घरातील सर्वच सदस्यांनी चर्चा करण्याचा पायंडा पाडला पाहिजे. मुलांनाही त्या चर्चेत सहभागी करून घेतलं पाहिजे. मुले एकलकोंडी आहेत, केवळ आपल्याच विश्वात रमतात, लॅपटॉप, मोबाइल हेच त्यांचे जग असेल तर त्यासाठी त्यांना आरोपीच्या पिंज:यात उभे करू नये. त्यामागे त्यांची विशिष्ट मनोवस्था असू शकते, हे समजून घेतलं पाहिजे. कदाचित त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दोष असू शकतो. काहींचं नैराश्य त्यासाठी कारणीभूत असू शकतं किंवा काहीतरी गंड त्यांना असू असतो. अंतमरुख मुलगा सोशल मीडियावरच अधिक रमत असेल तर तो दोष कुणाचा, समन्वयात कोण कमी पडते आहे, अशा प्रकरणात तज्ज्ञांकडून समुपदेशन अथवा सायकोथेरपीद्वारे मुलांना त्यातून बाहेर काढता येतं. 
एकूणच बदलती सामाजिक स्थिती, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वाढता पगडा लक्षात घेता सायबर एज्युकेशनची आवश्यकता आहे. जाहिरातींचा भूलभुलैयापासून सावध राहाणो, ख:याखोटय़ाची पारख करणो, आवश्यक तेच आपली मर्यादा लक्षात घेऊन खरेदी करणो, पासवर्ड, पिन नंबरसारखी महत्त्वाची माहिती उघड न करण्याची खबरदारी घेणो, असे शिक्षण मुलांना देण्याची गरज आहे. काळाच्या ओघात आपण ई मार्केटिंग थांबवू शकत नाही. मात्र त्याच्या दुष्परिणामापासून मुलांना नक्कीच दूर ठेऊ शकतो.  
(लेखक  मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)
 
-डॉ. प्रज्ञा दिवाण

 

Web Title: Now need cyber education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.