शहरं
Join us  
Trending Stories
1
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
2
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
3
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
4
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
5
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
6
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
7
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
8
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
9
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
10
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
11
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
12
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
13
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
14
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
15
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
16
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
17
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
18
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
19
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

आता चित्रपटातील पात्रांची ‘भाषा’ परस्पर बदलणार एआय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 11:45 IST

डबिंग ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये अनेक टप्पे असतात : अनुवाद, लिप-सिंक (ओठांच्या हालचाली जुळवणे), आवाज देणाऱ्या कलाकारांची निवड, रेकॉर्डिंग.. आणि अंतिमत: मिक्सिंग.

दीपक शिकारपूर -

कृत्रिम बुद्धिमत्ता हे आतापर्यंतचे सर्वांत वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आहे. आतापर्यंत शास्त्रीय व तांत्रिक बाबींमध्ये या तंत्राचा वापर झाला होता, कलाक्षेत्र यापासून दूर कसे राहील?  एका भाषेत बनवलेला चित्रपट जगभरातील वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविताना डबिंगचा उपयोग केला जातो.  उपशीर्षके (सबटायटलस)  वाचण्याऐवजी डब केलेला चित्रपट पाहणे अधिक सोयीचे वाटते. एकाच चित्रपटाच्या वेगवेगळ्या भाषांतील आवृत्त्या तयार केल्याने तो विविध प्रादेशिक बाजारपेठेत यशस्वी होऊ शकतो. वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट पुन्हा शूट करण्यापेक्षा डबिंग करणे अधिक सोपे आणि कमी खर्चाचे ठरते. यामुळे निर्मात्यांना कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते. आपण हे दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल पाहिले आहे. डबिंग ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये अनेक टप्पे असतात : अनुवाद, लिप-सिंक (ओठांच्या हालचाली  जुळवणे), आवाज देणाऱ्या कलाकारांची निवड, रेकॉर्डिंग.. आणि अंतिमत: मिक्सिंग.  डबिंगमध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि या प्रक्रियेत अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवत आहे. एआय-आधारित सॉफ्टवेअर मूळ संवादांचे जलद आणि अचूक भाषांतर करू शकते. एआय आता मानवासारखे नैसर्गिक आवाज तयार करू शकते. ‘टेक्स्ट-टू-स्पीच’ तंत्रज्ञानाचा वापर करून, भाषांतरित मजकूर स्वयंचलितपणे आवाजात रूपांतरित केला जातो. एआय अल्गोरिदम व्हिडीओतील पात्रांच्या ओठांच्या हालचालींचे विश्लेषण करून, तयार केलेला आवाज त्यांच्याशी जुळवण्याचा प्रयत्न करतात. एआय तंत्रज्ञान मूळ कलाकाराच्या आवाजाची नक्कल करू शकते. यामुळे डब केलेल्या संवादातही मूळ कलाकाराचाच आवाज असल्याचा अनुभव येतो. मूळ कलाकार डबिंगसाठी उपलब्ध नसतात तेव्हा याचा मोठा उपयोग होतो.काही प्रगत प्रणाली तर व्हिज्युअल माहितीचा वापर करून अधिक नैसर्गिक लिप-सिंक तयार करू शकतात, ज्यामुळे डब केलेला भाग पडद्यावर मूळ भागासारखाच दिसतो. स्वीडिश  चित्रपट ‘वॉच द स्काइज’मध्ये ‘व्हिज्युअल डबिंग’  तंत्राचा वापर करून एकही दृश्य पुन्हा शूट न करता कलाकारांच्या ओठांच्या हालचालींमध्ये बदल करत आहे. हे लॉस एंजेलिसमधील चित्रपट निर्माती एआय फर्म फ्लॉलेस आणि त्यांच्या ट्रूसिंक तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. ट्रूसिंक तंत्रज्ञान अभिनेत्यांच्या चेहऱ्याचे व्हॉल्यूमेट्रिक 3D प्रतिनिधित्व तयार करण्यासाठी डीप लर्निंगचा वापर करते. नंतर पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये फुटेजमध्ये त्यांच्या तोंडाच्या हालचाली अनुकूल करते.डबिंगच्या क्षेत्रात एआय एक शक्तिशाली साधन म्हणून उदयास आले आहे, ज्यामुळे भाषांतर, आवाज संश्लेषण आणि लिप-सिंक यांसारख्या प्रक्रियांमध्ये सुधारणा झाली आहे. यामुळे चित्रपट निर्मात्यांना जागतिक स्तरावर मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे आणि प्रभावी झाले आहे.      deepak@deepakshikarpur.com

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सcinemaसिनेमा