शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

सुवर्णकाळातलाच नव्हे सार्वकालिक सर्वोच्च ‘डी-जोकर’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 5:42 AM

नोवाक शरीराने जितका चिवट तितकाच मनानेही तो मजबूत आहे. १९८७ मध्ये त्याचा जन्म झाला तेव्हा सर्बियात रणगाड्यांची धडधड आणि कुठेही, कधीही होणारे बॉम्बस्फोट ही आम बात होती. युगोस्लाव्हियातल्या यादवीत वयाच्या चौथ्या वर्षी नोवाकने स्टेनगन हाती धरली असती किंवा तो अगदी ड्रगच्या कचाट्यात सापडला असता तरी तो नियतीला दोष देऊ शकला असता. पण नोवाकने टेनिसची रॅकेट जवळ केली.

प्रतिष्ठेच्या चार ग्रॅण्डस्लॅम प्रत्येकी दोन किंवा जास्त वेळा जिंकणारा नोवाक पहिलाच टेनिसपटू. ‘फ्रेंच ओपन’ जिंकल्यानंतरची त्याची प्रतिक्रिया जगाला उमेद देणारी आहे.शिडशिडीत शरीरयष्टीचा नोवाक दिसतो मरतुकडा; पण त्याच्यात इतका दम आहे की सलग चार-चार तास तो प्रतिस्पर्ध्याला सहजपणे झुंजवतो. भले त्याच्याकडे राफेल नदालचा जोरकसपणा, ताकद नसेल, रॉजर फेडररची नजाकत नसेल; पण चिवटपणा, तंदुरुस्ती याबाबतीत नोवाक या दोघांपेक्षाही काकणभर कणखरच म्हणावा लागतो. रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच हे तिघेही एकमेकांपेक्षा अगदी भिन्न शैलीचे खेळाडू गेले सुमारे एक तप एकमेकांविरोधात झुंजताना पहायला मिळणे ही टेनिस रसिकांसाठी मेजवानीच आहे. यातल्या रॉजर आणि राफेल या दोघांनी तर प्रत्येकी वीस ग्रॅण्डस्लॅमवर नाव कोरले आहे. कालच ‘फ्रेंच ओपन’ जिंकून जोकोविचने वैयक्तिक ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांची संख्या एकोणीसवर नेऊन ठेवली आहे. या त्रिमूर्तीमध्ये नोवाक सगळ्यात लहान. त्याचा सध्याचा धडाका लक्षात घेतला तर तो ‘ऑल टाइम ग्रेट’ होणार यात शंका नाही. ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांच्या केवळ संख्येमुळे तो महान ठरणार नाही, तर एकाच वेळी वीस ग्रॅण्डस्लॅम जिंकणारे दोन ‘ग्रेट्स ऑफ द गेम’ कोर्टवर असताना त्यांच्याशी लढत, या दोन महायोद्ध्यांना नमवत एकोणीस ग्रॅण्डस्लॅम जिंकणे यात नोवाकची थोरवी आहे.

नोवाक शरीराने जितका चिवट तितकाच मनानेही तो मजबूत आहे. १९८७ मध्ये त्याचा जन्म झाला तेव्हा सर्बियात रणगाड्यांची धडधड आणि कुठेही, कधीही होणारे बॉम्बस्फोट ही आम बात होती. युगोस्लाव्हियातल्या यादवीत वयाच्या चौथ्या वर्षी नोवाकने स्टेनगन हाती धरली असती किंवा तो अगदी ड्रगच्या कचाट्यात सापडला असता तरी तो नियतीला दोष देऊ शकला असता. पण नोवाकने टेनिसची रॅकेट जवळ केली. वयाच्या अठराव्या वर्षी नोवाकने व्यावसायिक टेनिसपर्यंत बाजी मारली. त्यानंतर तर त्याने ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा सपाटा लावला. तेव्हापासून त्याची कमान सातत्याने चढती राहिली आहे. हा यशाचा मार्ग नशिबाच्या बळावर सर होत नसतो. यात योगायोग तर अजिबात नसतो. पॅरिमसधल्या रोलॅण्ड गॅरोसच्या लाल मातीवर कालच्या रविवारी नोवाकने जो चमत्कार केला तो अवर्णनीय होता. एक तर ‘फ्रेंच ओपन’ची अंतिम फेरी त्याने गाठली तीही ‘क्ले कोर्ट’वरच्या बादशहाला, नदालला संघर्षपूर्ण सामन्यात नमवून. त्यानंतर अंतिम सामन्यातही ग्रीसच्या तरण्याताठ्या स्टेफानॉसने पहिल्या दोन सेट्समध्ये जेव्हा नोवाकला हरवले तेव्हा ‘फ्रेंच ओपन’ला यंदा नवा विजेता मिळणार असेच टेनिसप्रेमींना वाटले. पण आपल्यापेक्षा बारा वर्षांनी लहान असलेल्या स्टेफानॉसला नोवाकचा धडाका पेलवला नाही आणि सरतेशेवटी नोवाकने विक्रमी विजेतेपद मिळवले. 

चार-साडेचार तासांच्या दीर्घ लढती खेळणे आणि त्यात प्रतिस्पर्ध्याला हरवण्याची सवयच जणू नोवाकला जडली आहे. प्रतिस्पर्ध्याविरोधात कडवा असणारा नोवाक कोर्टवर तितकाच मिश्कील असतो. म्हणूनच ‘डी-जोकर’ ही त्याची आणखी एक ओळख आहे. ‘फ्रेंच ओपन’ जिंकल्यावर नोवाकने लगेचच त्याची विजयी रॅकेट मैदानातल्या एका लहानग्या प्रेक्षकाला देऊन टाकली. कधी तो उन्हात थांबणाऱ्या बॉलबॉयला स्वत:कडचे ‘ड्रिंक’ देतो किंवा स्वत:च्या छत्रीत घेतो. मैदानात तो खूप चुरशीने खेळतो; पण तो चिडखोर नाही. सामना कोणत्याही स्थितीत असला तरी स्वच्छ मनाने हसण्याची दुर्मीळ निरागसता तो मैदानातही सहज दाखवू शकतो. हे सगळे येते कुठून? मानसिक कणखरतेविषयी, ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी नोवाक योगसाधना करतो. त्यातून मनावर ताबा मिळवायला तो शिकला. आता नोवाकची नजर आहे विम्बल्डनच्या हिरवळीवर आणि त्यानंतर ऑलिम्पिकमधल्या सुवर्णपदकावर. गुडघेदुखीने त्रस्त असलेला ‘ग्रास कोर्टवरचा राजहंस’ रॉजर फेडरर आता चाळिशीच्या उंबरठ्यावर आहे. विम्बल्डनच्या रूपाने विक्रमी एकविसावे ग्रॅण्डस्लॅम जिंकून त्याला त्याच्या स्वप्नवत कारकिर्दीची अखेर करायची आहे. पण त्याच्यापुढे नोवाकचे कडवे आव्हान असेल. विम्बल्डनमध्ये आता फेडरर-नोवाक यांच्यात अंतिम फेरीचा थरार रंगावा हेच स्वप्न प्रत्येक टेनिसप्रेमी पाहतोय. टेनिसमधल्या सुवर्णकाळाचा हा सर्वोच्च क्षण ठरेल.- सुकृत करंदीकर, सहसंपादक, लोकमत, पुणे

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिच