शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

NO राडा ! सोलापूरला संकटातून दूर काढा..

By सचिन जवळकोटे | Updated: July 12, 2020 06:41 IST

लगाव बत्ती...

- सचिन जवळकोटे

भरचौकात पोलीस अधिकाºयाला हातवारे करत जोरजोरात जाब विचारणाºया एका राजकीय नेत्याचं वागणं जेवढं चिंताजनक होतं, तेवढंच सर्वांसमक्ष कॉलर पकडून त्याला रस्त्यावर लोळविणाºया एका हवालदाराचं रांगडं कृत्यही खेदजनक होतं. एकेकाळी सोलापूरच्या दोन नंबर धंद्यांमध्ये  हातात हात घालून भरघोस वाटा उचलणारी ही ‘खादी’ अन् ‘खाकी’ अशी चवताळून एकमेकांवर चालली म्हटल्यावर तमाम सोलापूरकरांनाही उगाचंच गोंधळून जायला होतं. ‘खाकी व्हर्सेस खादी’च्या राड्यात गुर्मी कुणाची अन् मस्ती कुणाची.. अशा प्रश्नांचं भूत डोळ्यांसमोर उभं ठाकून नाचायला लागतं.

साहेबां’समोर मर्दुमकी..

 सोलापुरात रोज शेकडो ‘डबलसीट’वाल्यांवर कारवाई केली जातेय, हे माहीत असूनही अनेक जण आपल्या गाड्या दामटताहेत. पद्मशाली चौकातल्या ‘कारमपुरीं’च्या लाडक्या लेकरालाही अशीच डबलसीट जाण्याची अवदसा सुचली. पार्क स्टेडियमजवळ ते लेकरू नेमकं पोलिसांच्या तावडीत सापडलं. मात्र गुपचूप दंड भरून पुढं जाण्याऐवजी त्याच्या अंगातलं ‘पुढाºयाचं पोर’ जागं झालं. वाद घालू लागल्यानंतर थेट पोलिसांच्या व्हॅनमध्येच त्याची रवानगी केली गेली. हे कळाल्यानंतर पूर्व भागातल्या कामगारांचे कनवाळू ‘पिता’मह थेट चौकात आले. ‘डबलसीट’च्या केसमधून कर्तृत्ववान सुपुत्राला सोडविण्यासाठी तेही चक्क ‘डबलसीट’च आले. त्यानंतर जे काही घडलं, ते साºया जगानं व्हायरल व्हिडिओमधून पाहिलं.

  फौजदार चावडीच्या ‘कडक पाटलां’ना जोरजोरात बोलणाºया या नेत्याला कदाचित त्यांच्या कामाची स्टाईल माहीत नसावी. मात्र हवालदाराला तर हे ‘पावतीछाप महाराज’ पूर्णपणे ठाऊक होते. तरीही त्यांचं बकोटं पकडून आपल्या ‘साहेबां’समोर मोठी मर्दुमकी गाजवली. आपण आपल्या ‘बॉस’सोबत किती प्रामाणिक आहोत, हे दाखवल्याबद्दल नंतर कदाचित ‘बक्षिसी’ मिळेल. ‘खुशी’ही मिळेल. मात्र या विचित्र वागण्यापायी अख्ख्या ‘खाकी’ची विश्वासार्हता या पठ्ठ्यानं ‘सोशल मीडिया’वर टांगली, त्याचं काय ?  एकीकडं भरचौकात या ‘खाकी’चा नको तेवढा अति उत्साह नडला; मात्र दुसरीकडं ही ‘खादी’ तर कुठं साव होती ? स्वत:ला ‘महाराज’ म्हणवूून घेत कपाळावर गंध बडवून अशिक्षित कामगारांमध्ये फिरणाºया या नेत्याविरुद्ध आजपावेतो १५ ते २० पेक्षांही जास्त गुन्हे दाखल. यातली कितीतरी कलमं खूपच ‘नाजूक’ अन् ‘गंभीर’.. तरीही ‘खाकी’समोर हातांचा थयथयाट करणाºया या मुजोर ‘खादी’मध्ये एवढी गुर्मी आलीच कुठून ?  आपल्या पक्षाचा ‘सीएम’ म्हणून कसंही वागलं तरी चालतंय, या बालिश भ्रमात भरचौकात स्वत:चं अंग मोकळं करून घेणारा हा ‘महाराज’ शेवटी न्याय मागण्यासाठी तरी कुणाकडं गेला म्हणता ?.. तर ‘घड्याळ’वाल्या ‘मामा इंदापूरकरां’कडं. खरंतर अजूनही सोलापुरात चाचपडत फिरताहेत बिचारे ‘दत्तामामा’च. त्यांना सोलापूरकरांची नस सापडायला जाऊ द्यावे लागतील किमान सहा महिने. इथल्या पाण्याची चवही ओळखायला करावे लागतील अजून काही दौरे. तसंच सोलापुरात ‘खादी’ अन् ‘खाकी’ची भांडणं होतातच कशी, याचा शोध घेण्यासाठीही त्यांना डोकावून पाहावं लागेल तीन दशकं मागं इतिहासात.

खाकी’ अन् ‘खादी’ची नको तेवढी जवळीक..

 गेल्या तीन-चार दशकांत ‘मंथली’ला चटावलेल्या ‘खाकी’ची दोस्ती ‘खादी’शी जमलेली. नको तेवढी जवळीक वाढत गेलेली. यामुळेच  शहराच्या विकासासाठी लोकांनी निवडून दिलेली ‘मेंबर’ मंडळी आपल्या कार्यकर्त्यांची नसती लफडी सोडवण्यासाठीच पोलीस ठाण्यात पडिक दिसू लागलेली. ‘जगा अन् जगू द्या’च्या धर्तीवर ‘खा अन् खाऊ द्या’चा ‘सोलापुरी मंत्र’ही अनेक अधिकाºयांच्या पचनी पडलेला. यातूनच एकेकाळी ‘जेलरोड’च्या ‘पोस्टिंग’चा ‘रेट’ अख्ख्या महाराष्ट्रात टॉप फाईव्हमध्ये पोहोचलेला.

 या ‘अभद्र युती’तून काही अधिकाºयांच्या बंगल्यांवर मजले चढत गेले असले तरी ‘खाकी’चा दरारा मात्र या खादीमुळं पुरता झाकोळून गेला होता. ‘शहीद कामटें’पासून ‘उपाध्यायां’पर्यंत अनेक कर्तव्यदक्ष आयुक्तांनी सोलापूरच्या ‘खाकीची प्रतिष्ठा’ उंचावण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात तो यशस्वीही ठरला. सध्याचे ‘शिंदे’ सरकारही अशा ‘तोडपाणी’ बहाद्दरांवर ‘अंकुश’ ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करताहेत. त्यांना सोलापूरकरांचीही साथ नक्कीच मिळेल. मात्र भरचौकात विनाकारण ‘फुकटची फौजदारी’ करणाºया त्यांच्या अतिउत्साही सहकाºयांनीही यापुढं किमान सार्वजनिक ठिकाणी तरी संयम दाखविणं गरजेचं. तसंच घरदार विसरून रस्त्यावर ड्यूटी बजावणाºया या ‘खाकी वॉरियर्स’ची शान जपणंही जनतेसाठी महत्त्वाचं.

सोलापूरकरांच्या आत्मसन्मानाला ठेच नको..

 सुमारे १९९३-९४ ची एक आठवण. सोलापुरात नुकतंच आयुक्तालय सुरू झालेलं. डायरेक्ट पोस्टिंगवर आलेल्या एका नव्या ‘डीसीपीं’च्या तरुण रक्तात आक्रमकता सळसळू लागलेली. सात रस्त्याजवळ त्यांच्या गाडीला पाठीमागून ठोकर बसली म्हणून ते तावातावात एका उद्योजकाच्या चालकाला मारण्यासाठी धावलेले. तेव्हा ‘लोकमत’नं ‘खाकी वर्दीतली गुंडगिरी’ नावाची आक्रमक मालिका बरेच दिवस चालविलेली. गाजविलेलीही. सोलापूरकरांनीही त्यावेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केलेल्या. संतप्त जनता रस्त्यावर उतरलेली. मग काय.. अखेर त्या अधिकाºयाला ‘सिद्धेश्वर एक्सप्रेस’चं रिटर्न तिकीट काढावं लागलेलं. असो. आताही पुन्हा ‘खाकी’नं सर्वसामान्य सोलापूरकरांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवू नये, हीच जनतेची प्रामाणिक इच्छा.. कारण सोलापूरकर जेवढे शांत; तेवढेच सटकले तर ‘गये काम से’..  लगाव बत्ती.

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसPoliticsराजकारण