शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन - कोरोना विषाणूचा इतिहास नऊ दशकांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 23:12 IST

कोरोना विषाणू त्याच्या अजून वेगळ्या स्वरूपात प्रकटला ते २००३ च्या जागतिक उद्रेकात म्हणजेच सार्स (र५ी१ी ंू४३ी १ी२स्र्र१ं३ङ्म१८ २८ल्ल१िङ्मेी - रअफर) आणि त्यावेळी त्याच्या त्या रूपाचे नाव होते

डॉ. राजन वाल्हे ।

कोरोना विषाणू प्रथमत: १९३०च्या दशकात प्राण्यांमध्ये रोगकारक अस्तित्व म्हणून आढळला. १९६०च्या सुमारास तो मानवी श्वसन संस्थेत संसर्गरोग निर्माण करणारा घटक आहे असे समजले. मानवी कोरोना विषाणू या सदराखाली प्रथम निदर्शनास आलेले करोना विषाणू म्हणजे : २२९ ए, डउ४३, डउ१६ आदींचे वर्णने आहेत. परंतु, त्यांचे सखोल असे अन्वेषण झालेले दिसत नाही. कोरोना विषाणूसदृश कण प्रामुख्याने नवजात शिशूंच्या विष्टेत ग्यास्ट्रोइंटेरायटीस आणि एनडो-कार्डायटीस संभाव्य रोगकारक अस्तित्व म्हणूनही मिळालेत. परंतु, तत्कालीन तांत्रिक मर्यादेमुळे त्यांचा बारकाईने अभ्यास होऊ शकला नाही.

कोरोना विषाणू त्याच्या अजून वेगळ्या स्वरूपात प्रकटला ते २००३ च्या जागतिक उद्रेकात म्हणजेच सार्स (र५ी१ी ंू४३ी १ी२स्र्र१ं३ङ्म१८ २८ल्ल१िङ्मेी - रअफर) आणि त्यावेळी त्याच्या त्या रूपाचे नाव होते सार्स करोना विषाणू (रअफर उङ्म१ङ्मल्लं श््र१४२- रअफर-उङ्मश्); नवीन श्वसनसंस्था रोगकारक म्हणून. हा उद्रेक साधारण नऊ महिने चालला. त्यात सुमारे ८००० लोकांना संसर्ग झाला व अंदाजे ७७५ लोकांचा जीव त्याने घेतला. बरेच तज्ज्ञ असे मानतात की, सार्स कोरोना विषाणूची उत्क्रांती सार्स कोरोना विषाणूसदृश विषाणूपासून त्याच्या नैसर्गिक स्रोतात म्हणजेच वटवाघळात व मध्यंतरीच्या यजमानात (इंटरमिजीयेट होस्ट) म्हणजे एकप्रकारच्या मांजरात झालेली आहे, असे संशोधक सुसान पौटनेन उल्लेख करतात.जसे की सार्स उद्रेक हा २००३ मध्ये नियंत्रणात आला व विषाणूने पुन्हा डोके वर काढले नाही. नवीन कोरोना विषाणू २०१२ मध्ये मध्य पूर्व जगतात उदयास आला. त्याचे नाव ‘मर्स कोरोना विषाणू’. तो सौदी अरेबियात व इतर मध्य पूर्व देशात बऱ्याच श्वसनसंस्था संसर्गांना कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले. या संसार्गात मृत्युदर खूप जास्त (अंदाजे ५० टक्के; प्रारंभीच्या उद्रेकात) असला तरी काही तुरळक केसेस वगळता २०१३ पर्यंत उद्रेकाची गती जास्त नव्हती. २०१४ च्या आॅगस्टपर्यंत एकूण ८५० प्रकरणे (केसेस) आणि साधारण ३३० मृत्यू या मर्स कोरोना विषाणुमुळे झाले, असे फेहर व पर्लम्यान (२०१५) या संशोधकांनी लिहिले आहे.

सार्स व मर्सनंतर मानवी कोरोना विषाणू अजून वेगळ्या रूपात अवतरला. तो २०१९ डिसेंबरमध्ये जेव्हा काही अनिश्चित कारणामुळे उद्भवलेल्या न्युमोनियाचे रुग्ण चीनच्या वूहान शहरातील रुग्णालयात दाखल झाले. हे रुग्ण वूहानच्या सीफूड व वेट अ‍ॅनिमलव्होलसेल मार्केटशी संबंधित होते. प्रारंभीच्या तपासणी अहवालात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची संभावना वर्तविली. ११ फेब्रुवारी २०२० ला डब्ल्यूएचओने नव्या ‘मानवी कोरोना विषाणू आजार २०१९’चे ‘कोव्हिड-१९’ असे नामकरण केले. त्याच्या घटनाक्रमानुसार अभ्यास हसीन रोथान आणि इतर संशोधकांनी (२०२०) खालीलप्रमाणे मांडला आहे. पहिल्या केसेसची नोंदणी डिसेंबर २०१९ : पाच रुग्ण एआरडीएस (अक्यूट रेस्पीरेटरी डीस्टेस सिन्ड्रोम) या लक्षणांससह रुग्णालयात दाखल झाले व त्यात रुग्ण दगावला. २ जानेवारी २०२० पर्यंत ४१ रुग्ण दाखल व करोना विषाणू संसर्ग झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालात सिद्ध. २२ जानेवारी २०२० रोजी ५१७ रुग्णांची नोंद (चीनमधील २५ शहरातील); पहिले १७ मृत्यूंची नोंद. २५ जानेवारी २०२० रोजी १९७५ केसेसची नोंद व पुष्ठी. एकूण ५७ मृत्यू. ३० जानेवारी २०२० रोजी ७७३४ केसेसची चीनमध्ये पुष्टी व ९० इतर देशातल्या केसेसची नोंद. एकूण मृत्युदराची गणना २.२ टक्के.

आजतागायत (या लिखाणापर्यंत) ‘कोव्हिड-१९’ची जागतिक आकडेवारी अशी : एकूण केसेस ५,४२,३८५, त्यातले मृत्यूमुखी २४,३६८ आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,२५,४९०. मृत्युदर अंदाजे ४.४ टक्के. ‘कोव्हिड-१९’ची सामान्य लक्षणे आहेत ताप, खोकला, थकवा, त्यासोबत डोकेदुखी, थुंकी येणे, अतिसार, इ. यात असे पाहणे महत्त्वाचे ठरते की ‘कोव्हिड-१९’, सार्स, मर्स व इतर फ्लूसदृश आजारांच्या लक्षणांमध्ये बरेचसे साम्य आहे. प्रतीबंधात्मक उपाय करताना यामुळे गोंधळ होऊ शकतो. श्वसन निष्कासिते, थेंबे आणि श्वसनस्राव हे ‘कोव्हिड-१९’चे ज्ञात प्रेषण मार्ग आहेत. काही बाबतीत जसे की मूत्र वा मल मार्गाने होणारे प्रेषण - ज्यावर अजून अभ्यास गरजेचा आहे. फारसा विचार प्रतिबंधाच्या दृष्टिकोनातून होताना दिसत नाही. ‘कोव्हिड-१९’चा मृत्युदर कमी असला तरी सहज-सोपा प्रेषण मार्ग आणि संसर्गस्रोत परिसरातील संभाव्य प्राप्तकर्ता यांमुळे संसर्ग दर कळीचा आणि काळजीचा मुद्दा असून, त्याची उपाययोजनात विशेष दखल घेतली पाहिजे. म्हणूनच अलगीकरणाच्या निकषांची काटेकोर पालन व जनसामान्यात त्याबद्दल जागरुकता खूप जरुरी आहे. भारतासारख्या देशात जेथे एकूण लोकसंख्येसाठी असलेली वैद्यकीय सुविधांची स्थिती, वैद्यकीय, आहार, स्वच्छतेविषयी जागरुकता इ. पाहता कठोर उपाययोजनांचीच गरज आहे जे की आपण आता बघतो व करतो आहोत. शासनाने घोषित केलेल्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करूया आणि ‘कोव्हिड-१९’ला संपवू या.(लेखक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत, पुणे)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई