शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

मनोहर पर्रीकरांच्या स्मारकावरून उफाळला नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 20:11 IST

मनोहर पर्रीकर यांच्या मिरामार येथे उभारल्या जाणा-या स्मारकावरून गोव्यात नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- राजू नायकमनोहर पर्रीकर यांच्या मिरामार येथे उभारल्या जाणा-या स्मारकावरून गोव्यात नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.‘स्मृतिस्थळ’ या नावाने हे स्मारक मिरामार किना-यावर- जेथे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचेही स्मारक आहे- उभारले जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईस्थित यूसीजे आर्किटेर अॅँड एन्वायरोन्मेंट या संस्थेचे डिझाइन या प्रकल्पासाठी निवडण्यात आले आहे.या प्रकल्पाचा खर्च अद्याप सरकारने जाहीर केलेला नाही; परंतु राज्य सरकारच्याच पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे ते बांधले जाणार आहे.सूत्रांच्या मते, प्रकल्पाचा खर्च नऊ कोटींपेक्षा जादा असेल. तो पर्रीकरांच्या जीवनासंदर्भात एका संग्रहालयाच्या स्वरूपातच असण्याची शक्यता असेल. सरकारच्या मते, ते जनतेसाठी स्फूर्तिदायी ठरावे अशी अपेक्षा आहे.दरम्यान, पर्रीकरांचे एकेकाळचे सहकारी व त्यानंतरचे राजकीय वैरी सुभाष वेलिंगकर यांनी स्व. बांदोडकरांच्या स्मारकाचे नूतनीकरण सर्वात आधी हाती घेण्याची सूचना करताना पर्रीकरांच्या स्मारकापूर्वी हे काम हाती घेण्याचे आवाहन केलेय. वेलिंगकरांना पर्रीकरांसाठी एवढे मोठे स्मारक असावे, हा निर्णय फारसा रुचलेला दिसला नाही. स्वाभाविक आहे, पर्रीकर सरकारच्या भाषा माध्यम प्रश्नावरूनच रा. स्व. संघाशी फारकत घेऊन वेलिंगकरांनी आपली वेगळी चूल मांडली होती. पर्रीकरांचे स्मारक उभारल्यावर बांदोडकरांचे स्मारक दुर्लक्षित वाटू नये, तेही अद्ययावत बनविण्यात यावे, असे वेलिंगकरांनी म्हटले आहे.दुसरीही काही मते आहेत, जी या खर्चासंदर्भात कटू प्रतिक्रिया व्यक्त करतात. भाजपाने स्वत:च्या हिकमतीवर पैसा उभारून हे स्मारक निर्माण करावे, अशा असंख्य प्रतिक्रिया समाज माध्यमांतून व्यक्त झाल्या आहेत.एक गोष्ट खरी आहे की राज्यात जी काही स्मारके आहेत, त्यांच्यावर खर्च बराच होतो; परंतु कालांतराने त्यांची हेळसांड होते. बांदोडकरांच्या स्मारकाकडेही दुर्लक्ष झाले आहे. ते वर्षभर बंद असते व बांदोडकरांच्या स्मृतिदिनीच खुले केले जाते. वेलिंगकर यांनी म्हटले आहे, पर्रीकरांनंतर मिरामार येथे आणखी कोणाचेही स्मारक उभारले जाणार नाही याची तरतूद करावी. मिरामार किना-यावर सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून नवी बांधकामे उभी केली जाऊ नयेत, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.पर्रीकरांनी आपल्या शेवटच्या कारकिर्दीत बरेच वाद ओढवून घेतले होते. त्यामुळे त्यांच्यावर सध्याचे भाजपा नेतेही नाखुश होते. त्यांचे अनेक निर्णय सध्या फिरवले जात आहेत. त्यांच्या शेवटच्या कारकिर्दीत भाजपावर अन्याय झाला व त्यांनी स्वत:ची ‘कोटरी’ निर्माण केली होती, असा आरोप होतो. एक गोष्ट राजकीय निरीक्षक मान्य करतात की पर्रीकरांमुळेच गोव्यात भाजपा सत्तेवर येऊ शकली. परंतु सध्या त्यांच्या बाबतीत त्यांचे सहकारीच नाखुश असता स्मारक उभारून त्यांना विस्मृतीत ढकलण्याचा तर सरकारचा प्रय} नाही ना, असा सवाल केला जातो. सरकारने त्यांचे कुटुंबीय व हितचिंतकांची सतावणूक चालविल्याचा आरोप माजी अॅडव्होकेट जनरल व पर्रीकरांचे जवळचे स्नेही आत्माराम नाडकर्णी यांनी अलीकडेच केला आहे.(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा