शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नेतन्याहूंचा ‘मृत्यू’ आणि त्यांच्या ६ बोटांची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 08:49 IST

मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव वाढलेला असताना अचानक सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. त्यात दावा करण्यात आला होता की इराणच्या हल्ल्यात इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू ठार किंवा गंभीर जखमी झाले आहेत. या दाव्याला कोणताही अधिकृत पुरावा नव्हता, तरीही युद्धकाळातील तणावामुळे लोकांनी त्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली.

जागतिक राजकारणात कधी कधी युद्धापेक्षा अफवा जास्त वेगानं पसरतात. अलीकडे अशीच एक धक्कादायक अफवा जगभर पसरली. काय होती ही अफवा? - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मृत्यू झाला आहे! काही तासांतच ही बातमी सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरली. पण प्रत्यक्षात काय घडलं होतं? ही अफवा कशी जन्माला आली आणि त्यामुळे त्यांना आपण जिवंत असल्याचा पुरावा का द्यावा लागला? युद्धाच्या काळात माहिती युद्धाची ही कहाणी संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरली आहे.

मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव वाढलेला असताना अचानक सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. त्यात दावा करण्यात आला होता की इराणच्या हल्ल्यात इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू ठार किंवा गंभीर जखमी झाले आहेत. या दाव्याला कोणताही अधिकृत पुरावा नव्हता, तरीही युद्धकाळातील तणावामुळे लोकांनी त्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली.

ही अफवा अल्पावधीतच वणव्यासारखी पसरली, कारण काही संशयास्पद फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर फिरू लागले. काही फोटोंमध्ये नेतन्याहू ढिगाऱ्यात पडलेले दिसत होते, तर काहींमध्ये त्यांना जखमी दाखवण्यात आलं होतं. नंतर तपासात हे सर्व फोटो कृत्रिम बुद्धिमत्तेनं तयार केलेले असल्याचं स्पष्ट झालं. पण ज्या वेगानं या एआय प्रतिमा सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

दरम्यान, आणखी एक व्हिडीओ समोर आला, ज्यानं या अफवांच्या वणव्यात तेल ओतलं. या व्हिडीओमध्ये नेतन्याहू भाषण करताना दिसत होते; पण त्या व्हिडीओच्या एका फ्रेममध्ये त्यांच्या हाताला सहा बोटं असल्यासारखं दिसत होतं. सोशल मीडियावर लगेच चर्चा सुरू झाली.. हा व्हिडीओ एआयनं तयार केलेला आहे. खरे नेतन्याहू मरण पावले असून, सरकार एआय व्हिडीओ वापरून ते जिवंत असल्याचं भासवत आहे!

अफवा इतकी वाढली की नेतन्याहूंच्या पंतप्रधान कार्यालयालाच यासंदर्भात थेट प्रतिक्रिया द्यावी लागली. त्यांनी जेरूसलेममधील एका कॅफेमध्ये बसून नेतन्याहू कॉफी पीत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध केला. त्या व्हिडीओत नेतन्याहू विनोद करत म्हणाले, मी जिवंत आणि अगदी व्यवस्थित आहे! त्यांनी आपले दोन्ही हात दाखवत मला पाचच बोटं असल्याचंही दाखवलं. अखेर हा व्हिडीओ ते जिवंत असल्याचा पुरावा म्हणजेच त्यांचा ‘प्रूफ ऑफ लाइफ’ मानला गेला.

या प्रकरणात आणखी एक रंजक गोष्ट घडली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एआय चॅटबॉट ‘ग्रोक’लाही लोकांनी नेतन्याहूंच्या मृत्यूबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली. ग्रोकनं उपलब्ध बातम्या, अधिकृत माहिती आणि विश्वसनीय स्रोत तपासून स्पष्ट केलं की, नेतन्याहू जिवंत आहेत आणि त्यांचा मृत्यू झाल्याची कोणतीही पुष्टी नाही.काही व्हायरल अफवांमध्ये इराण नेतन्याहूंची हत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही दावा करण्यात आला. प्रत्यक्षात, दोन्ही देशांमध्ये लष्करी संघर्ष आणि धमक्या सुरू असल्या तरी नेतन्याहूंच्या हत्येचा ठोस पुरावा कोणत्याही अधिकृत स्रोतानं दिलेला नव्हता. तरीही लोकांनी सोशल मीडियातील प्रचार आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवल्यानं ही अफवा वाऱ्याच्या वेगानं पसरली.

डिजिटल युगात युद्ध केवळ रणांगणावरच होत नाही, तर माहितीच्या जगातही होतं. एआय फोटो, डीपफेक व्हिडीओ आणि सोशल मीडियातील अफवा ‘होत्याचं नव्हतं’ कसं करू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. म्हणूनच नेतन्याहूंच्या कथित ‘मृत्यूची’ ही कहाणी काही क्षणांतच कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरली!

English
हिंदी सारांश
Web Title : Netanyahu's 'Death' Rumor and the Tale of Six Fingers

Web Summary : Rumors of Netanyahu's death spread rapidly online, fueled by AI-generated images and videos. A video showing six fingers intensified the speculation, forcing Netanyahu to release a 'proof of life' video, dismissing the claims and misinformation.
टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायलAmericaअमेरिकाIranइराण