शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
2
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
5
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
6
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
7
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
8
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
9
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
10
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
11
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
12
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
13
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
14
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
15
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
16
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
17
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
19
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
20
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?

मूल्यांकनाच्या भ्रामकतेपासून दूर राहण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 5:25 AM

आधुनिक काळातील पत मानांकन करण्याची पद्धत फारशी जुनी नाही. अमेरिकेवर १८३७ साली ओढवलेल्या आर्थिक संकटानंतर मानांकनाची कल्पना अस्तित्वात आली.

वरुण गांधी , खासदार, भाजपाएखाद्या संस्थेचे किंवा एखाद्या राष्टÑाचे मूल्यांकन करण्याची कल्पना जुनीच आहे. इतिहासकार हेरोडोत्सने साहरीनचे विचारवंत कॅलीमेशसच्या साहाय्याने जगातील सात आश्चर्यांची सूची तयार केली होती. त्यात या आश्चर्याचे केलेले वर्णन अतिशयोक्तीपूर्ण होते. आधुनिक काळातील पत मानांकन करण्याची पद्धत फारशी जुनी नाही. अमेरिकेवर १८३७ साली ओढवलेल्या आर्थिक संकटानंतर मानांकनाची कल्पना अस्तित्वात आली. व्यापाºयांची स्वत:ची कर्जे फेडण्याची क्षमता निश्चित करण्यासाठी पत मानांकन संस्था निर्माण झाली. त्यानंतर याचतºहेचे मूल्यांकन समभागांच्या संदर्भातही करण्यात येऊ लागले.त्यानंतर बाजाराविषयी स्वतंत्र माहिती आणि बाजाराची उधार पात्रता निश्चित करण्याची मागणी होऊ लागली. मूडीजच्या मूृल्यांकन संस्थेने औद्योगिक कंपन्यांच्या मूल्यांकनावर लक्ष केंद्रित केले. १९२० पर्यंतच्या काळात मूल्यांकन करण्याच्या क्षेत्रात तीन कंपन्यांची नावे घेण्यात येऊ लागली. मूडीज, फिच आणि स्टॅन्डर्ड अँड पुअर्स १९३३ साली अमेरिकेत ग्लास स्टीगल कायदा मंजूर करण्यात आला. समभागांचे व्यवहार हे बँकिंगच्या व्यवहारापासून वेगळे करण्यात आले. तसेच अमेरिकेतील बँकांना याच आधारावर गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. १९६० सालापर्यंत वृत्तपत्रे आणि बँका यांच्यापर्यंत मूल्यांकनाची संकल्पना पोचली होती. जागतिक रोखे बाजारातही मूल्यांकनासोबत बिझिनेस मॉडेलचा विस्तार करण्यात आला. या मूल्यांकन संस्था गुंतवणूकदार तसेच गुंतवणूक करणाºया संस्था या दोघांनाही सेवा देत त्यांच्याकडून सेवा शुल्क घेऊ लागल्या.जागतिक वित्तीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाºया या मूल्यांकन संस्था लोकांचा विश्वास संपादन करण्यात मात्र असफल ठरल्या. या संस्था चुकीचे मूल्यांकन करतात असे त्यांच्यावर आरोप होऊ लागले. अमेरिकेवर सबप्राईम मॉर्गेज संकट ओढवण्यापूर्वी मूडीज कंपनीने २००० ते २००७ या काळात ४५००० समभागांना एएए मानांकन दिले होते. तरीही २०१० पर्यंत संरक्षित समभागांची संख्या अवघी सहा इतकीच उरली. या मूल्यांकन संस्थांना एन्रॉन कंपनीच्या पतनानंतर तसेच अमेरिकेतील सबप्राईम मॉर्गेज संकटानंतर अनेक खटल्यांना सामोरे जावे लागले. अमेरिकेवर ओढवलेल्या आर्थिक संकटाच्या अनेक कारणांपैकी एक कारण मूल्यांकन संस्थांनी केलेले मूल्यांकन हेही होते, असे अमेरिकेच्या राष्टÑीय आयोगाने स्पष्ट केले आहे.भारतातसुद्धा मूल्यांकन करणाºया संस्थांचा (रेटिंग एजन्सीजचा) रेकॉर्ड संमिश्र स्वरूपाचा आहे. एमटेक आॅटो आणि रिको इंडिया यांच्या मूल्यांकनामुळे सेबीला यात हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर सेबीने आपले या बाबतीतले नियम अधिक कडक केले. मूल्यांकन संस्थांच्या मूल्यांकनाने राष्टÑाच्या महसुलावरही प्रभाव पडू शकतो असे लक्षात आले. भांडवली गुंतवणूक मागे घेतल्याने १९९० मध्ये पूर्व आशियाई राष्टÑे संकटात सापडली होती. अमेरिका आणि युरोपियन राष्टÑांच्या कर्जांचे मूल्यांकन कमी केल्याबद्दल टीका करण्यात आली. ग्रीस, पोर्तुगाल आणि आयर्लंडने बहिष्कार टाकल्यावर त्या बहिष्काराला क्षुल्लक संबोधले गेले. या मूल्यांकनाने युरो चलन अडचणीत सापडले.१९९७ साली आशियावर ओढवलेल्या आर्थिक संकटाचे आकलन करण्यात या संस्था कमी पडल्या. काही राष्टÑांचे मूल्यांकन कमी केल्याचे अनेक दुष्परिणाम दिसून आले. त्यावर टीकादेखील झाली. भारताने जे आर्थिक यश प्राप्त केले होते त्यास मान्यता न मिळाल्याने भारतीय अर्थतज्ज्ञही संतप्त झाले. या सर्व प्रकारामुळे चीन व रशिया या राष्टÑांनी स्वत:च्या मूल्यांकन संस्था निर्माण केल्या. रशियाने क्रिमियाचा ताबा घेतल्यानंतर स्टँडर्डस् अँड पुअर संस्थेने रशियाचे मूल्यांकन कमी केले. हा प्रकार राजकीय विचाराने प्रेरित असल्याचा आरोप करीत रशियाने हे मूल्यांकनच नाकारले!एकूण मूल्यांकनाच्या पद्धतीत दोष असूनही राष्टÑ अशा मूल्यांकनांना महत्त्व देतात. हितांच्या संघर्षाचा विचार केला तर या मूल्यांकन करणाºया संस्थांच्या उत्पन्नात मूल्यांकनबाह्य कामातून प्राप्त होणाºया उत्पन्नाचा वाटा अधिक असतो. मूल्यांकनातून आणि मूल्यांकनबाह्य कामातून प्राप्त नफ्याचा विचार करताना हितांमध्ये संघर्ष होणे अपरिहार्य असते. अशा स्थितीत देशाच्या विकासाचा विचार करताना आपण मूल्यांकन करणाºया स्वदेशी संस्थांना प्राथमिकता द्यायला हवी. त्यामुळे आपल्या कॉर्पोरेट क्षेत्राची प्रतिमा स्वच्छ राहण्यास मदत होऊ शकेल. गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी सेबीकडून याबाबतीत सुधारणा केल्या जातील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. त्यामुळे मूल्यांकन करणाºया संस्थांकडून बिगर मूल्यांकन स्वरूपाची कामे करण्यावर बंधने येतील व त्यांना असे काम करणे अशक्य होईल. अर्थात त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने मूल्यांकनासाठी किती मोबदला घ्यावा याविषयीचे प्रमाण ठरविता येईल. त्यामुळे गुणवत्तेशी तडजोड करणे अशक्य होईल.एखाद्या संस्थेचे चांगले मूल्यांकन केल्यावर त्या संस्थेच्या मूल्यांकनात अचानक घट झाल्यास त्याचे परीक्षण करण्याची तरतूदही नियमात असायला हवी. मूल्यांकन संस्थांकडून सध्या इश्युअर-पे मॉडेलचा वापर करण्यात येतो, त्याऐवजी इन्व्हेस्टर पे मॉडेल विकसित करण्याची गरज आहे. तसेच बाजार नियामक यंत्रणेद्वारा मानधनाचे मानकीकरण व्हायला हवे. सध्या आपण खर्चाचे जे निर्णय घेतो ते बँकांकडून केल्या जाणाºया तिमाही मूल्यांकनाच्या आधारे घेत असतो. ता पद्धतीऐवजी देशात उपलब्ध करण्यात आलेले रोजगार आणि हाती घेतलेले नवीन उपक्रम यांच्या आधारे अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी योग्य ते आर्थिक निर्णय घेण्याची खरी गरज आहे.

(editorial@lokmat.com)