शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

नैसर्गिक आपत्ती आणि आधुनिक तंत्राचे साहाय्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 06:25 IST

 - डॉ. दीपक शिकारपूर (संगणक साक्षरता प्रसारक) जागतिक हवामान संघटना २३ मार्च रोजी हवामान दिवस साजरा करतात. दरवर्षी यासंबंधी ...

 - डॉ. दीपक शिकारपूर (संगणक साक्षरता प्रसारक)जागतिक हवामान संघटना २३ मार्च रोजी हवामान दिवस साजरा करतात. दरवर्षी यासंबंधी काही विशेष बाबींवर भर दिला जातो. २0१९ मध्ये सूर्य, पृथ्वी आणि हवामान अशी थीम निवडली आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्ती हा घटकही तितकाच महत्त्वाचा आहे. मानवाने स्वत:च्या उत्क्रांतीच्या आणि तांत्रिक प्रगतीच्या कितीही बढाया मारल्या तरी नैसर्गिक आपत्तींपुढे तो काहीही करू शकत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे.पूर, वणवे, ज्वालामुखी, बर्फाची किंवा पावसाची (किंवा नुसतीच) वादळे, अगदी त्सुनामीदेखील. या संकटांची थोडीतरी पूर्वकल्पना माणूस आपल्या तांत्रिक प्रगतीमुळे मिळवू शकतो आणि काहीतरी बचावात्मक हालचाली करू शकतो. परंतु एक बाब अद्यापही आगाऊ मानवी आकलनाच्या कक्षेबाहेर राहिली आहे. भूकंप! खरे आहे. कितीही तीव्रतेचा भूकंप अक्षरश: कधीही, कोठेही होऊ शकतो आणि पडलेली घरे व गाडलेली माणसे यांच्याकडे हताशपणे बघण्यापलीकडे माणूस फारसे काही करू शकत नाही. अशा परिस्थितीत भूकंपाचे अचूक भविष्य वर्तवणे हे सर्वच भूगर्भ आणि हवामानतज्ज्ञांचे प्रथम ध्येय असण्यात तर काही आश्चर्य नाही. शास्त्रज्ञांच्या या उद्दिष्टाकडे जरा लवकर पोहोचणे आता कदाचित शक्य होणार आहे. फक्त त्यांनाच नाही तर तुम्हाआम्हालाही! यात आपणास साहाय्य करणार आहे बहुतेकांचा दररोजचा साथी स्मार्टफोन!कार्यक्षमता आणि विविध अ‍ॅप्सच्या एकीकरणाच्या बाबतीत स्मार्टफोनने पारंपरिक पीसी उर्फ संगणकाला केव्हाच मागे टाकले आहे. जवळजवळ प्रत्येकच स्मार्टफोन आणि टॅबमध्ये ‘एक्सिलरोमीटर्स’ असतात, म्हणजेच त्यांची विविध दिशांना होणारी सततची हालचाल आणि वापरादरम्यान त्यांना बसणारे धक्के नोंदणाऱ्या मायक्रोचिप्स. यामुळे या साधनाला वर-खाली हालचालींचे व दिशादर्शनाचे भान राहते आणि वापरकर्त्याला एकसारख्या स्वरूपात स्क्रीन व त्यावरील डेटा वापरता येतो. म्हणजेच, दुसऱ्या भाषेत सांगायचे तर, स्मार्टफोन बाळगणारी प्रत्येक व्यक्ती स्वत:सोबत एक छोटेखानी भूकंप-पूर्वसूचना केंद्रच बाळगत असते.भूकंपाचा प्रत्यक्ष विनाशकारी दणका बसण्याआधी काही काळ जमिनीखाली सूक्ष्म थरथर सुरू झालेली असते. या थरथरीमधून दोन प्रकारचे तरंग निर्माण होतात पी म्हणजे प्रायमरी वेव्हज आणि एस म्हणजे सेकंडरी वेव्हज. प्रायमरी वेव्हज जमिनीतून वेगाने प्रवास करू शकतात (या जाणवल्यामुळेच पशुपक्षी अस्वस्थ होतात वा ओरडू लागतात). तर सेकंडरी वेव्हजची गती तुलनेने कमी असली तरी खरी विनाशकारी ताकद त्यांच्यात असते. या प्रायमरी वेव्हज, फोन आणि टॅबमधील एक्सिलरोमीटर्सद्वारे, नोंदवून तसा इशारा देणारी अनेक ‘अ‍ॅप्स’ विकसित झाली आहेत. विशेषत: दाट लोकवस्तीच्या आणि बहुमजली इमारतींची संख्या भरपूर असलेल्या शहरी व महानगरी भागांत अशा तºहेच्या सूचनेचा फार मोठा उपयोग होऊ शकेल. कारण अशा ठिकाणी भूकंपामुळे होणारे आर्थिक नुकसानही जबरदस्त असते. शिवाय तेथे स्मार्टफोन्स आणि टॅब्जची संख्याही मोठी असणार, यामुळे ‘रिअल-टाइम अर्बन सीस्मिक नेटवर्क’ आपोआपच तयार होईल व या माहितीचा वापर भविष्यातदेखील करता येईल. 

टॅग्स :Indiaभारत