‘ब्रँड’च्या नादात...‘अमूल’ने जाहिरात केली खरी, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 05:15 AM2020-02-13T05:15:34+5:302020-02-13T05:15:55+5:30

जगात सेवन केल्या जाणाऱया दुधाचा वाटा ५४ टक्के असतो. यासाठी गायी-म्हशींसह अन्य मुक्या दुधाळ जनावरांवर अनन्वित अत्याचार केले जातात. फिनिक्स यांचा रोख पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणाऱ्या देशांकडेही होता.

In the name of 'brand' ...Amul did Advertisement but | ‘ब्रँड’च्या नादात...‘अमूल’ने जाहिरात केली खरी, पण...

‘ब्रँड’च्या नादात...‘अमूल’ने जाहिरात केली खरी, पण...

googlenewsNext

‘अ‍ॅकॅडमी आॅफ मोशन पिक्चर्स’ या अमेरिकेतील चित्रपट उद्योगाच्या शीर्षस्थ संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या आॅस्कर पुरस्कारांच्या ९२ वर्षांच्या इतिहासात यंदा सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार दक्षिण कोरियाच्या ‘पॅरासाईट’ या परदेशी चित्रपटास प्रथमच जाहीर झाल्याची खूप चर्चा झाली. जगभरातील कोट्यवधी चित्रपटशौकिनांनी हा सोहळा टीव्हीवर पाहिला. विजेत्यांनी पुरस्कार स्वीकारताना आपापली हर्षभरीत मनोगते व्यक्त केली. त्यापैकी अभिनेते जोकिन फिनिक्स यांचे छोटेसे मनोगत त्याच्या वेगळेपणामुळे लक्षणीय होते

. फिनिक्स यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तो स्वीकारताना केलेल्या भाषणातून फिनिक्स यांच्या पडद्यावर दिसणाºया व्यक्तिमत्त्वामागे दडलेला एक संवेदनशील माणूस समोर आला. फिनिक्स ‘व्हेगान’ आहार घेतात. म्हणजे मांस-मच्छी तर सोडाच, पण ते दूध व दुग्धजन्य पदार्थांचेही सेवन करत नाहीत. त्यामागचे तत्त्वचिंतनच जणू त्यांनी आॅस्करच्या व्यासपीठावरून जगापुढे मांडले. फिनिक्स म्हणाले, ‘आपल्या सर्वांची नैसर्गिक जगापासून नाळ तुटली आहे, असे मला वाटते. आपल्यापैकी अनेक जण आत्मकेंद्रित दृष्टीने जगाकडे पाहात असतात. आपणच जगाच्या केंद्रस्थानी आहोत, असे ते मानतात. आपण नैसर्गिक साधनसंपत्ती स्वार्थीपणे लुबाडून घेतो. गायींची कृत्रिम रेतन पद्धतीने गर्भधारणा करणे आणि नंतर होणाºया कालवड किंवा गोºह्याची तिच्यापासून ताटातूट करणे हा जणू आपला हक्कच आहे, असे आपण मानतो. यामुळे गायीला होणाºया दु:खाची आपल्याला तमाही नसते. एवढेच करून आपण थांबत नाही. गायीला तिच्या वासरासाठी पान्हा फुटतो. पण तिचे दूधही आपण पळवतो. कशाचा तरी त्याग करावा लागेल या कल्पनेने आपण स्वत:मध्ये बदल करायला घाबरतो. पण माणसाने मनावर घेतले तर तो उत्तमात उत्तम गोष्टी करू शकतो. अशाच पद्धतीने सर्व सजीवांसह एकूणच पर्यावरणास लाभदायक ठरेल अशी व्यवस्था करण्यासाठी आवश्यक असलेले बदलही तो नक्की घडवून आणू शकतो.’ फिनिक्स यांचे विचार खरेच मूलगामी आहेत. दुसºयाचे दूध पिणारा आणि वयाने मोठे झाल्यावरही दूध पिणारा माणूस हा या पृथ्वीतलावरील एकमेव प्राणी आहे. खरे तर नवजात शिशूला सुरुवातीचे सहा महिने सोडले तर माणसाच्या आयुष्यात दूध ही एक निरर्थक व अनावश्यक वस्तू आहे. पण या अनावश्यक वस्तूचीही जगभरात अब्जावधी डॉलरची बाजारपेठ उभी केली गेली आहे.

आहार आणि पोषण या दोन्ही दृष्टीने गरज नसताना जगभरातील माणूस ५२२ दशलक्ष टन दूध व दुग्धजन्य पदार्थांचा फडशा पाडत असतो. फिनिक्स यांनी त्यांचे हे विचार मांडण्यासाठी आॅस्करचे व्यासपीठ निवडले हेही उत्तम केले. कारण नाशाडीमूलक जीवनशैलीचा अमेरिका हा महामेरू आहे आणि तेथील हॉलीवूड हे अमेरिकेच्या जगभरातील सांस्कृतिक आक्रमणाचे मुख्य साधन आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या या बाजारात भारतात ‘अमूल’ हा नावाजलेला अग्रगण्य ब्रँड आहे. एखाद्या महत्त्वाच्या घटनेच्या वेळी ‘अमूल’कडून सर्जनशीलतेने केली जाणारी जाहिरात हा नेहमीच कौतुकाचा विषय असतो.

जोकिन फिनिक्सच्या आॅस्करच्या निमित्तानेही ‘अमूल’ने अशीच जाहिरात केली आणि कौतुकाऐवजी स्वत:चे हंसे करून घेतले! या जाहिरातीत नटखट ‘अमूल बेबी’ ‘व्हेगान’ असलेल्या फिनिक्सला बटर (लोणी) खाऊ घालत असल्याचे दाखविले गेले होते!! प्राणीहक्क आणि भूतदया यासाठी काम करणाºया ‘पिपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू अ‍ॅनिमल्स’ (पेटा) या स्वयंसेवी संस्थेने ‘अमूल’चे वाभाडे काढत टिष्ट्वटरवरून या जाहिरातीवर खरपूस टीका केली. दुग्धोत्पादन उद्योगातील क्रूरतेवर बोट ठेवणाºया फिनिक्सला लोणी भरवून ‘अमूल’ने हसे करून घेतले. याऐवजी ‘अमूल’ने सोया, बदाम, ओट किंवा अन्य वनस्पतीजन्य पदार्थांच्या दुधाचा धंदा सुरु केला तर गायींवर खूप उपकार होतील, असा टोलाही ‘पेटा’ने हाणला. सर्व गोष्टींचे व्यापारीकरण करण्याच्या आणि ‘ब्रँड बिल्डिंग’च्या निरंकुश विश्वात कशाचाच विधिनिषेध नसतो हेच यातून सिद्ध होते.
 

Web Title: In the name of 'brand' ...Amul did Advertisement but

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.