शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुक्ताई पावेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 12:05 IST

- मिलिंद कुलकर्णीचार वर्षांपासून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणाऱ्या राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यासाठी अखेर कारभारी गवसले. अ‍ॅड.रवींद्र पाटील हे पक्षाचे हुकुमी एक्के आहेत. जिथे कमी तिथे आम्ही या न्यायाने शरद पवार आणि पक्ष हे जी जबाबदारी सोपवतील, ती प्रामाणिकपणे निभावण्याचे व्रत पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पाळलेले आहे. सुरेशदादा ...

- मिलिंद कुलकर्णीचार वर्षांपासून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणाऱ्या राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यासाठी अखेर कारभारी गवसले. अ‍ॅड.रवींद्र पाटील हे पक्षाचे हुकुमी एक्के आहेत. जिथे कमी तिथे आम्ही या न्यायाने शरद पवार आणि पक्ष हे जी जबाबदारी सोपवतील, ती प्रामाणिकपणे निभावण्याचे व्रत पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पाळलेले आहे. सुरेशदादा जैन यांच्याविरुध्द जळगाव मतदारसंघाची निवडणूक असो की, मुक्ताईनगरात एकनाथराव खडसे यांच्याविरोधातील लढत असो, पक्षादेश पाळून पाटील रिंगणात उतरतात. जिल्हा परिषद, जिल्हा बँकेचा अनुभव गाठीशी असलेल्या पाटील यांचा स्वभाव मवाळ, सौजन्यशील आणि समन्वयवादी आहे. संत मुक्ताई संस्थानची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असले तरी वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे पेलत आहेत. सातत्याने संत मुक्ताईचा गजर केला तरच आपण भक्त, वारकरी आहोत, असे न मानण्याची प्रगल्भता त्यांच्यात आहे. नवीन जबाबदारी निभावताना संत मुक्ताई त्यांना पावते काय, हे आता बघायचे. वडील एकनाथराव पाटील यांची पुण्याई पाठीशी असतानाही पाटील यांनी शरद पवार यांच्याशी कायम निष्ठा ठेवली. आमीषे, प्रलोभने त्यांना आली असतील, पण ती त्यांनी स्विकारली नाही, तसेच त्याची खाजगीतदेखील वाच्यता केलेली नाही. त्यांच्या याच गुणांमुळे पवार कुटुंबियांमधील सर्वच सदस्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. जळगावात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची शाखा स्थापन करण्याचा विषय आला तेव्हा पाटील यांचे नाव समितीत अग्रभागी होते. पाटील हे एक सज्जन राजकारणी आहेत. त्यामुळे निवड चांगली असली तरीही पक्षाला सद्य स्थितीत आक्रमक नेतृत्वाची आवश्यकता आहे, हे विसरुन चालणार नाही. पाटील यांची निवड का झाली असावी,याविषयी राजकीय वर्तुळात जे अंदाज व्यक्त केले जातात, ते पाहता पक्षात नेते खूप आहेत आणि सगळ्यांची तोंडे परस्परविरोधी आहेत. पक्षाला या नेत्यांमध्ये समन्वय साधणारे नेतृत्व हवे आहे, त्या निकषामध्ये रवींद्र पाटील बसतात. विलास भाऊलाल पाटील यांच्यारुपाने अभ्यासू आणि तळमळीचा कार्यकर्ता जिल्हाध्यक्षांना सहकारी म्हणून मिळाला आहे. मात्र जळगावच्या अध्यक्षाचा शोध अद्याप संपलेला नाही.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव