शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मिस्टर बिल गेट्स, शेम ऑन यू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 09:29 IST

Wania Agarwal: वाणिया अग्रवाल नावाच्या एका भारतीय अमेरिकन सॉफ्टवेअर इंजिनिअरने चक्क हा शिष्टाचार धाब्यावर बसवला आणि सत्या नाडेला, बिल गेट्स, स्टीव्ह बाल्मोर अशा मंडळींना शिंगावर घेतलं.

आपले बॉस काही बोलत असतील तर सहसा त्यांच्या हो ला हो करावं, त्यांना प्रतिप्रश्न करू नयेत, तुम्ही खोटं बोलताय असं तर अजिबात म्हणू नये, नाही तर नोकरी आलीच धोक्यात, असा एक सर्वसामान्य अलिखित शिष्टाचार आहे. पण वाणिया अग्रवाल नावाच्या एका भारतीय अमेरिकन सॉफ्टवेअर इंजिनिअरने चक्क हा शिष्टाचार धाब्यावर बसवला आणि सत्या नाडेला, बिल गेट्स, स्टीव्ह बाल्मोर अशा मंडळींना शिंगावर घेतलं.

वाणिया ही गेलं दीड वर्ष अमेरिकेत मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत होती. मायक्रोसॉफ्टने नुकताच आपला ५० वा वर्धापन दिन साजरा केला. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सत्या नाडेला बोलत असताना त्यांना रोखून ‘तुम्ही सगळे ढोंगी आहात, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मानवजातीच्या भल्यासाठी करण्याच्या बाता करता, पण प्रत्यक्षात तिकडे गाझामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांचं जे शिरकाण चाललंय त्यासाठी इस्रायलला तुम्ही एआय तंत्रज्ञान पुरवत आहात’, असं सुनावण्याचं धाडस वाणियाने दाखवलं आहे. त्यामुळे अर्थातच मायक्रोसॉफ्टनं तिला नारळ दिला. 

वाणियासह इब्तिहाल अबुसादनंही असंच धाडस केल्यामुळे तिलाही नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. वाणियाने २०१६-१९ या काळात ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतून बॅचलर्स डिग्री घेतली. २०१७ मध्ये विद्यापीठाने तिला ‘ग्रेस हॉपर’ शिष्यवृत्ती प्रदान केली होती. यापूर्वी तिने ॲमेझॉनमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंटर्न म्हणून काम केलंय. २०२३ पासून ती मायक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत आहे. ‘ज्या कंपनीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये वंशसंहार घडवून आणत आहे, त्या कंपनीशी जोडलेलं राहणं हे माझ्या नैतिकतेला धरून नसल्यामुळे मी राजीनामा देत आहे’, असं वाणियाने स्पष्ट केलं आहे. वाणिया आणि इब्तिहाल या दोघीही वर्णभेदविरोधी विचारांच्या ‘No Azure for Apartheid’ नावाच्या गटाशी जोडलेल्या आहेत.

 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धUnited StatesअमेरिकाArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सBill Gatesबिल गेटस