शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मोसमी पावसाचा घोर, त्यात बनावट बियाणांचे चोर!

By वसंत भोसले | Updated: June 20, 2023 07:46 IST

मोसमी पावसाने शेतकऱ्यांना घोर लावला आहे. त्यात बोगस बियाणांमुळे शेती आणि शेतकरी भरडले जात आहेत. या दुहेरी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढले पाहिजे.

- डाॅ. वसंत भोसले(संपादक, लोकमत, कोल्हापूर)

मोसमी  पावसाने साऱ्यांची झोप उडवल्याची चर्चा चालू असली तरी खरीप हंगाम हातून गेला आहे, असा निष्कर्ष तातडीने काढण्याची गरज नाही. मोसमी पावसाचे आगमन आता कोठे होणार आहे. त्याला सोळापैकी दोन आठवड्यांचा उशीर झाला आहे. संपूर्ण देशभरात पोहोचण्यासाठीदेखील तेवढाच उशीर होणार आहे. गेल्या काही वर्षांतील हवामान बदल पाहिले तर इतका उशीर समजून घेता येईल.महाराष्ट्रात पहिल्या दोन आठवड्यांत सरासरी ११५ मिलिमीटर पाऊस पडतो, असे अनेक वर्षांच्या आकडेवारीवरून सांगण्यात येते.

सध्या तरी दहा टक्केच पाऊस झाला आहे. सुमारे शंभर मिलिमीटरने उणे पाऊस झाला आहे. ही गती अशीच राहील, असे मानण्याचे कारण नाही. खरीप हंगामातील पिकांची पेरणी १५ जून ते १५ जुलैपर्यंत होत राहते. अद्याप तीन आठवडे आहेत. त्यानंतरही पेरण्या होतील. त्यास थोडा उशीर झालेला असेल. खरीप हंगामावर गेल्या वर्षी जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्याने परिणाम झाला होता आणि खरीप पिकांच्या कापणीच्या वेळी जोरदार पाऊस झाल्याने साधलेले पीकही हातचे गेले होते. गतवर्षीच्या हंगामात नुकसानीचे तीन वेळा पंचनामे करावे लागले होते, त्याच्या आधारावर नुकसानभरपाई देण्याची घोषणा वारंवार करावी लागली होती. ही अवस्था दरवर्षी उद्भवणार आहे. त्याची तयारी सरकारच्या पातळीवर होताना दिसत नाही. निसर्गानेही आता पाठ फिरविली आहे! बाजारपेठेतील चढ-उताराने शेतकरी हैराण होतोय. आता मोसमी पाऊस संधी घेऊन न येता संकट घेऊन येऊ लागला आहे. 

दुसऱ्या बाजूला उत्पादित मालाच्या आधारे चढ-उतार करून गैरफायदा घेणारी बाजारपेठ तयारच असते. बनावट खते आणि बियाणी तयार करून विकणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. शेतमालाच्या उत्पादनावर या देशाची आर्थिक व्यवस्था चालते. तरीदेखील या शेतीची निगा राखणारी खते, औषधे अणि बियाणे तयार करणाऱ्या बनावट कंपन्यांचा सुळसुळाट आहे. वास्तविक, हा फार मोठा गुन्हा आहे. समाजद्रोह आहे. देशाची आर्थिक स्थिती बिघडविण्यास कारणीभूत ठरणारी ही साखळी आहे. महाराष्ट्रात कृषी खात्याची महाकाय यंत्रणा आहे. सुमारे तीस हजार कर्मचारी, अधिकारी वर्ग या खात्याकडे आहेत. त्यांनी प्रत्यक्षात शेती करायची नाही तर शेती करणाऱ्या शेतकऱ्यास मदत करायची आहे. मार्गदर्शन करायचे आहे.

शेतकऱ्यांना उत्तम बियाणे दिल्यास मोसमी पावसाने साथ दिली तर सर्वोत्तम उत्पादन भरघोस येऊ शकते, हा तांदूळ आणि गव्हाच्या बाबतीत आलेला अनुभव आहे. त्यासाठी मोसमी पावसातील बदलाची गांभीर्याने नोंद घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवे. त्यापेक्षा अधिक सतर्कता बनावट खते आणि बियाणांविषयी बाळगणे महत्त्वाचे आहे. मराठवाडा तसेच खान्देशातून अशा बनावट बियाणांच्या सुळसुळाटाच्या बातम्या येत आहेत. त्यांच्यावर समाजद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. दरम्यान, मोसमी पावसाच्या आगमनास उशीर होतो आहे, याचा परिणाम कडधान्ये उत्पादनावर होईल, अशी अफवा पसरविणे चालू झाले आहे. परिणामी, कडधान्याचे दर वाढत राहतील. महागाई वाढेल, अशी अर्धवट माहिती दिली जाऊ लागली आहे.

अशा वातावरणात सरकारने अधिक आणि खरी माहिती देण्याचे काम केले पाहिजे. बदलत्या हवामानाचा परिणाम होतच राहणार आहे. त्यातील चढ- उतार वाढतील तसे शेतीवर परिणाम होणारच आहे. तो गृहीत धरून नियोजन करावे लागणार आहे. पीक पद्धतीत अचानक बदल करता येत नाहीत. ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वानुसार बाजारपेठेची गरज पाहूनच शेतीचे नियोजन करावे लागणार आहे. याबाबत सरकार गंभीर नाही. येत्या पंधरा दिवसांत मोसमी पाऊस सर्वदूर पसरला तर खरीप हंगामावरील संकट टळेल. विदर्भ आणि मराठवाडा वगळता बहुतांश भागात उन्हाळी पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाण्याचा वापर अधिकाधिक झाला आहे.

आता त्याचा साठा जेमतेम दोन-तीन आठवडे पुरेल इतका शिल्लक आहे. याचाच अर्थ सर्व काही मोसमी पावसावर अवलंबून आहे. पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदिल झाला असताना पेरलेले बियाणे बनावट निघाले तर शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान होईल. अधिक उत्पादनासाठी सकल बियाणे, उत्तम खते आणि परिणामकारण औषधांचा पुरवठा कसा होईल, याची तरी जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. अशा दुहेरी संकटातून शेती-शेतकऱ्यांना सोडविले पाहिजे.

टॅग्स :Farmerशेतकरी