मोले घातले रडाया..
By Admin | Updated: October 26, 2015 22:54 IST2015-10-26T22:54:42+5:302015-10-26T22:54:42+5:30
इराकचा दीर्घकाळचा सर्वेसर्वा सद्दाम हुसेन याला दंडित करण्याच्या अमेरिकेच्या इराद्याला सशस्त्र पाठिंबा दिल्याबद्दल जवळजवळ बारा वर्षांनी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी

मोले घातले रडाया..
इराकचा दीर्घकाळचा सर्वेसर्वा सद्दाम हुसेन याला दंडित करण्याच्या अमेरिकेच्या इराद्याला सशस्त्र पाठिंबा दिल्याबद्दल जवळजवळ बारा वर्षांनी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी खेद व्यक्त करतानाच सद्दाम यांच्या पाडावामुळेच इस्लामीक स्टेट आॅफ सिरियाचा (इसिस) उदय झाला असे म्हटले असले तरी तेव्हांचे अमेरिकी अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या ‘नादी’ लागल्याबद्दल माफी मागण्यास मात्र नकार दिला आहे. सद्दाम यांनी रासायनिक अस्त्रांचा प्रचंड मोठा साठा तयार करुन ठेवला आहे आणि त्यापासून जगाला व विशेषत: अमेरिकेला धोका आहे असे जगाला सांगून बुश यांनी सद्दामचा खात्मा करण्याचा डाव रचला होता. पण त्याच काळात हे अमेरिकेचे कुभांड असल्याचे व तिचा इराकमधील तेलाच्या खाणींवर डोळा असल्याचे आणि सद्दामसमोर अमेरिकेची डाळ शिजणार नसल्याने सारे कुभांड रचले गेले असल्याचे मत अनेक निरीक्षकांनी नोंदविले होते. बुश यांच्या या साहसवादास ब्रिटनने साथ देऊ नये असे त्या देशातील बहुसंख्य लोकाना वाटत होते. पण ब्लेअर यांनी ती जनभावना विचारात न घेता बुश यांना साथ दिली. परिणामी तब्बल सहा वर्षे ब्रिटनमध्ये या प्रकाराची चौकशी सुरु होती. तिचे निष्कर्ष अद्याप जाहीर झाले नाहीत. ते जाहीर झाले तर तेव्हां कदाचित ब्लेअर यांना माफी मागणे भाग पडू शकते. बुश यांनी इराक आणि विशेषत: सद्दाम हा विषय किती व्यक्तिगत बनविला होता याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सद्दाम यांच्या फाशीची चित्रफीत संपूर्ण जगभर प्रदर्शित होत होती. त्याच अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेन याचा खात्मा केल्यानंतर ओसामाचे पुढे काय झाले याबाबत मात्र आजदेखील अत्यंत गोपनीयता बाळगली जात असून केवळ तर्ककुतर्कच केले जात आहेत.