शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘नमो अ‍ॅप’साठी मोदींचे टुमणे अन् खासदारांची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:28 IST

दररोज सकाळी आपल्या ‘नमस्ते’ला प्रतिसाद न देणाºया स्वपक्षीय खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फटकारल्यापासून त्यांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. भाजपाच्या ३३० खासदारांपैकी फक्त ५ जण दररोज नमो अ‍ॅपला प्रतिसाद देतात, हे मोदी यांनी जाहीर करताच बैठकीला हजर असलेले वरिष्ठ मंत्री खजील झाले तर इतरांची नमस्ते क्लबमध्ये सहभागी होण्याकरिता नमो अ‍ॅप डाऊनलोड करण्याची धावपळ सुरू झाली.

- हरीश गुप्ता(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर) दररोज सकाळी आपल्या ‘नमस्ते’ला प्रतिसाद न देणाºया स्वपक्षीय खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फटकारल्यापासून त्यांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. भाजपाच्या ३३० खासदारांपैकी फक्त ५ जण दररोज नमो अ‍ॅपला प्रतिसाद देतात, हे मोदी यांनी जाहीर करताच बैठकीला हजर असलेले वरिष्ठ मंत्री खजील झाले तर इतरांची नमस्ते क्लबमध्ये सहभागी होण्याकरिता नमो अ‍ॅप डाऊनलोड करण्याची धावपळ सुरू झाली. विशेष म्हणजे खासदारांना हा अ‍ॅप डाऊनलोड करता यावा यासाठी भाजपाने संसदीय पक्ष कार्यालयात एक विशेष काऊंटरही उघडले आहे. याशिवाय लोकसभा आणि राज्यसभा इंटरनेट सेलही खासदारांना सहकार्य करीत आहे. काही खासदार तीन-तीन फोन वापरतात. भरीसभर या खासदारांना मोदी आणि अमित शहा यांना त्यांनी आपापल्या मतदार संघात केलेल्या कामाचा लेखाजोखा, भेटींचे फोटो टाकणे, पंतप्रधानांच्या २० समाजकल्याण योजनांची माहिती देणे आदी कामेसुद्धा करायची असतात. बहुतांश खासदार तंत्रज्ञानस्नेही नसल्याने त्यांना या माध्यमांचा वापर करणे अडचणीचे जाते. काही वावडूक भाजपा खासदारांनी तर स्पष्टच सांगून टाकले,‘काहीही होवो आम्ही नमो अ‍ॅपला उत्तर देणार नाही.’ दररोज नमस्ते करण्यावरच आमच्या कामगिरीचे मूल्यमापन होणार असल्यास आम्ही तिकिटाविनाच खूश आहोत,असेही त्यांचे म्हणणे आहे. हरियाणा, महाराष्ट्र आणि राजस्थानशी संबंधित किमान पाच लोकसभा सदस्यांच्या सांगण्यानुसार पंतप्रधानांना चांगला फिडबॅक मिळत असावा; तर किमान तीन मंत्र्यांनी आपण स्मार्टफोन वापरत नसल्याचे सांगितले.मायावतींची महागडी खेळीआपण फूलपूर लोकसभा मतदार संघातून पोटनिवडणूक लढविणार नसून राज्यसभेच्या जागेसाठीही पुन्हा नामांकन भरणार नाही, असे संकेत बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी दिले आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून कुठल्याही क्षणी केली जाऊ शकते आणि राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुका एप्रिलमध्ये होणार आहेत. भाजपाचे खासदार केशव प्रसाद मौर्य यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ‘बहेनजी’ विरोधकांच्या संयुक्त उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत का, हे जाणून घेण्यासाठी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने आपले खबरे बसपात पाठविले होते. मायावतींनी काही प्रतिक्रिया दिली नाही. पण त्यांच्या पक्षातील सूत्रांच्या सांगण्यानुसार विरोधकांचे ऐक्य हे केवळ एका प्रसंगापुरते असू शकत नाही. दुसरे म्हणजे त्या पोटनिवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत आणि राज्यसभेची जागा त्यांनी दलितांच्या अधिकारांसाठी सोडली होती, शिवाय अद्याप लढाई संपलेली नाही. त्यामुळे तूर्तास त्या राज्यसभेपासून दूर राहतील. बहुदा मायावती महागडी खेळी खेळू इच्छितात.कोण असणार नवे सॉलिसिटर जनरल?काही महिन्यांपूर्वी रंजितकुमार यांनी पदत्याग केल्यापासून नव्या सॉलिसिटर जनरलची नियुक्ती अजूनही टांगणीवरच आहे. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना कुठल्याही कारणाशिवाय पद सोडण्यास सांगण्यात आले त्यावेळी रंजितकुमार यांनी राजीनामा दिला होता. आता रंजितकुमार यांच्या उत्तराधिकाºयाच्या शोधात कायदा व राजकीय वर्तुळाने भुवया उंचावल्या आहेत. मोठ्या अडचणीनंतर सरकार नवे अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुुगोपाल यांना शोधण्यात यशस्वी झाले. परंतु नवा सॉलिसिटर जनरल मात्र अद्याप मिळू शकलेला नाही. आता हे स्पष्ट झाले आहे की, सरकारमधील एक गट तुषार मेहता यांना नवीन सॉलिसिटर जनरल म्हणून पदोन्नत करण्यास इच्छुक आहे.राहुल गांधींचा पश्चिम आशियाचा दौरापंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी येत्या २४ जानेवारीला दावोसला जाणार असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसुद्धा पश्चिम आशियाई देशांचा दौरा करण्याची योजना आखत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी गेल्या वर्षअखेरीस दुबई आणि बहरीनला जाण्याचे ठरविले होते. परंतु संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबल्याने त्यांना आपली योजना बदलावी लागली. शिवाय त्यांच्या विदेश दौºयावर नेहमीच टीका करणाºया भाजपालाही त्यांना कुठली संधी द्यायची नव्हती. मोदी यांनी लोकसभा निवडणूक घोषणेच्या फारपूर्वी अनिवासी भारतीयांचे समर्थन मिळविणे सुरू केले होते. गांधीसुद्धा मोदींची ही कला आत्मसात करीत आहेत. या विशाल क्षेत्राकडे काँग्रेसने गेल्या २० वर्षांत कधी लक्ष दिले नाही. यामुळे काही लाभ होणार नाही,असे पक्षाला वाटत होते. परंतु भाजपा आणि मोदी यांनी या क्षेत्राचा फार चातुर्याने वापर केला.बर्कले युनिव्हर्सिटीत राहुल गांधी यांच्या संवादास देशात परतल्यावर मिळालेला उत्तम प्रतिसाद लक्षात घेऊन, त्यांनी आता अनिवासी भारतीयांवर एका धोरणाच्या रूपात लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. सॅम पित्रोदा हे त्यांचे विदेश धोरण सल्लागार आहेत आणि नेमके काय घडत आहे, याबाबत राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीच्या परराष्ट्र व्यवहार सेलला काहीही माहिती नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणNew Delhiनवी दिल्लीIndiaभारत