मिशन -44 यशस्वी होणे अवघड

By Admin | Updated: November 28, 2014 23:40 IST2014-11-28T23:40:36+5:302014-11-28T23:40:36+5:30

सर्व जगाचे लक्ष असलेल्या जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांमधील पहिल्या टप्प्यातील मतदान केवळ शांततेतच नाही, तर अतिशय उत्साहात पार पडले.

Mission-44 is very difficult to succeed | मिशन -44 यशस्वी होणे अवघड

मिशन -44 यशस्वी होणे अवघड

सर्व जगाचे लक्ष असलेल्या जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांमधील पहिल्या टप्प्यातील मतदान केवळ शांततेतच नाही, तर अतिशय उत्साहात पार पडले. बांदीपुरासारख्या दहशतग्रस्त भागातही 72}पेक्षा अधिक मतदान झाले. यापूर्वी कधीही या भागात इतके मतदान झाले नव्हते. तरुण मुले, वयोवृद्ध माणसे आणि महिलांचासुद्धा मतदानामध्ये मोठा सहभाग होता. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 87 जागांवर मतदान होत असते. पाकिस्तानव्याप्त काश्मीरसाठीही काही जागा आपण रिकाम्या ठेवतो. त्या स्वातंत्र्यापासून तशाच ठेवल्या जातात. त्या जागा 87 पेक्षा वेगळ्या असतात. 87 पैकी 46 जागा खो:यात, 4 कारगिल लेह भागात, तर 37 जम्मू  भागात आहेत. जम्मूतील जागा ¨हंदूबहुल, काश्मीरमधील मुस्लिमबहुल, तर लेहमध्ये शियापंथीय तसेच बौद्धधर्मीय मतदारांची संख्या अधिक आहे. सामान्यपणो जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री काश्मीर खो:याचाच असतो. गुलाम नबी आझाद जम्मूचे होते, हा अपवाद होता. मात्र, या राज्याच्या धोरणांवर काश्मीर खो:याचा जास्त प्रभाव असतो. राजधानी सहा महिने जम्मूत, तर सहा महिने काश्मीरमध्ये असते. तरीही प्रशासनावर सध्या काश्मिरी मुस्लिमांचा जास्त प्रभाव आहे. तो कमी करून जम्मूचा प्रभाव वाढण्यासाठी जम्मू-काश्मीर व लेह असे वेगळे करण्याची संघाची तसेच अमेरिकास्थित पाकिस्तानींची मागणी आहे. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी कारगिलमधील निवडणूक प्रचारात या भूमिकेचाही पुनरुच्चर केला. 37क्वे कलम आणि लेह काश्मीरपासून वेगळे करणो किंवा ¨हंदू अथवा जम्मूतील मुख्यमंत्री हा नेहमी संवेदनशील मुद्दा असतो. जम्मू भागात नेहमी वेगळेपणाची आणि अन्याय होत असल्याची भावना असते. अशा सगळ्या मुद्दय़ांच्या गदारोळात जम्मू-काश्मीरची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
यंदा भारतीय जनता पक्षाने जम्मू-काश्मीर विधानसभेच्या 87 पैकी 44 जागा जिंकून बहुमत मिळविण्यासाठी मोदींच्या प्रतिमेचा पुरेपूर वापर केला असून, मिशन-44ची घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसबद्दल असलेली नाराजी आणि प्रचंड संताप  आहे. नुकत्याच आलेल्या पुराच्या वेळी पीडीपीने अथवा त्या पक्षाच्या नेत्या महबुबा मुफ्ती यांनीही जनतेसाठी विशेष भूमिका न बजावल्याने त्यांच्याबद्दल काश्मीर खो:यात फारशी सहानुभूती राहिलेली नाही. हुरियत कॉन्फ रन्सच्या एका गटाचा, तसेच सज्जाद लोनसारख्या कुपवाडा भागात प्रभावी असलेल्या फुटिरतावाद्यांचा, तसेच काही अपक्षांचा पाठिंबा आणि स्थलांतरित काश्मिरी पंडितांच्या मतांवर मिशन-44ची योजना आखण्यात आली; पण प्रत्यक्ष अंमलबजावणीत गडबड झाली. जम्मूतील ¨हंदूंना आणि स्थलांतरित काश्मिरी पंडितांना हाताळताना पंतप्रधानांनी मुस्लिमांनाही या देशात सन्मान मिळेल, अशी घोषणा केल्यामुळे एकाच वेळी सर्वाना वेगवेगळे मॅनेज करण्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे उत्तर प्रदेश, हरियाना आणि काही प्रमाणात महाराष्ट्रात यशस्वी झालेले डावपेच जम्मू-काश्मीरमध्ये मात्र अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात भाजपाला प्रतिसाद चांगला असला, तरीही त्याचे परिवर्तन जागा जिंकण्यात होणो अवघड आहे.
पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी जम्मू-काश्मीरची विभागणी जातीय, धार्मिक आणि विभागीय अस्मितांमध्ये करून त्याचा लाभ भाजपाला मिळेल, असे वातावरण होते. मात्र, पंतप्रधान मोदींची भूमिका सर्वसमावेशक, युवकांना विकासाचे स्वप्न दाखविणारी आणि अटलबिहारी वाजपेयींपेक्षाही दोन पावले पुढे जाऊन काश्मिरींसाठी भावनिक आवाहन करणारी होती. त्यांनी दिवाळी काश्मीर खो:यात साजरी केली. अर्थात, ते ईदला आले नाहीत, असाही प्रचार झाला. मात्र, ज्या भागात भाजपाचा ङोंडा कधीही दिसत नव्हता, अशा श्रीनगरमधील मुस्लिमबहुल भागातही भाजपाच्या ङोंडय़ांची संख्या वाढलेली दिसत होती. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पनुन काश्मीर आणि ¨हंदुत्ववादी संघटनांनाही जम्मू भागात पा¨ठंबा आहे. त्यांची भूमिका मात्र 37क्वे कलम रद्द करणो, जम्मूला न्याय देणो आणि या राज्याला ¨हंदू मुख्यमंत्री देणो अशी आहे. भाजपा आणि ¨हंदुत्ववादी संघटनांच्या एकमेकांशी विसंगत भूमिकांमुळे या राज्यात कधी नव्हे ते भाजपाला लोकसभेच्या काळात निर्माण झालेल्या लाटेमुळे बहुमत मिळण्याची निर्माण झालेली शक्यता नंतर हळूहळू कमी होत गेली. लोकसभेच्या सहा जागांपैकी तीन जागा जिंकणारा आणि विधानसभेच्या 37 जागांवर आघाडी मिळवलेला पक्ष काश्मीर खो:यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पीडीपी, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यातील भांडणाचा लाभ मिळवेल आणि मिशन 44 यशस्वी होईल, असे वातावरण होते. 
डॉ. हीना भट यांच्यासारख्या पुण्यात शिकलेल्या आणि शफी भटसारख्या नेत्याची राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या युवतीला आणि अनेक मुस्लिम चेह:यांना पक्षाने संधी देऊन आपण सर्वसमावेशक आहोत, असे दाखविण्याचा प्रय} केला. त्यांनीही जाहीरपणो 37क् कलम रद्द केल्यास बंदूक हातात घेण्याची भाषा केली. त्याच वेळी किश्तवाडमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दंगलीत नुकसान झालेल्या ¨हंदूंच्या जखमांवर मलमपट्टी करण्याऐवजी त्याचा उल्लेखही न करता काश्मीर खो:याचे गुणगाण केल्याने जम्मूमध्ये भाजपाची लाट असली, तरीही एका गटात अस्वस्थता पसरली. जिथे 32 ते 33 जागा मिळू शकतात असे वातावरण होते, त्या जम्मूत भाजपाला आता पंचवीसच्या वर जागा मिळण्याची शक्यता दिसत नाही. येथे काँग्रेस आणि इतर छोटय़ा पक्षांचेही अस्तित्व शिल्लक राहील, असे वातावरण आहे. 
म्हणजेच कशाही प्रकारे जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाच्या सदस्यांची संख्या 3क् ते 32 च्या पुढे जाऊ शकत नाही. आता भाजपाचा प्रय} इतरांच्या मदतीने सत्ता स्थापन करणो अथवा सत्ता स्थापनेसाठी पीडीपी अथवा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा देऊन आपले नियंत्रण ठेवण्याचा दिसतो. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर पीडीपी हा भाजपाखालोखाल क्रमांक 2च्या जागा जिंकणारा पक्ष असेल, असे चित्र आहे. दहशतीला आणि हुरीयत कॉन्फरन्सच्या बहिष्काराला न जुमानता जम्मू- काश्मीरच्या 15 मतदारसंघांमध्ये मोठय़ा प्रमाणात ऐतिहासिक मतदान झाल्याच्या बातम्या आहेत; 
तर या निवडणुकांवर कोणाचाही बहिष्कार नव्हता, असा दावा सय्यद अली शाह गिलानी यांनी केला आहे. 
बांडीपुराचे जिल्हाधिकारी म्हणजे आयएएस परीक्षेत देशात पहिले आलेले डॉ. शाह फैजल यांच्या म्हणण्याप्रमाणो काश्मिरी माणूस आता दहशतवाद, अस्थिरता याला कंटाळला आहे. युवकांमध्ये बुद्धिमत्ता आहे, तर कलाकारांना आता शांतता, विकास आणि रोजगार हे मुद्दे आकर्षित करतात. म्हणूनच मोदींबद्दल व्यक्तीश: काश्मिरींना मोठे आकर्षण आहे. त्याच वेळी 37क्वे कलम, मुस्लिमबहुल काश्मीरवर सांस्कृतिक आक्रमण ही भीतीही आहे. या सर्वाचे प्रति¨बंब मतदानात उमटलेले दिसते. लोक नदीपार करून, सकाळी लवकर निघून आणि रांगा लावून मतदान करत होते. 
 
संजय नहार
सामाजिक कार्यकर्ते

 

Web Title: Mission-44 is very difficult to succeed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.