तसे मौलाना, असे अलिगड

By Admin | Updated: November 12, 2014 00:33 IST2014-11-12T00:33:32+5:302014-11-12T00:33:32+5:30

अलिगड विद्यापीठाच्या मौ. आझाद ग्रंथालयात विद्यार्थिनींना प्रवेश नसणो ही नुसती बातमी नाही, मौलाना अबुल कलाम आझाद या ज्ञानर्षीच्या स्मृतींचा तो अपमानही आहे.

Maulana, such as Aligid | तसे मौलाना, असे अलिगड

तसे मौलाना, असे अलिगड

अलिगड विद्यापीठाच्या मौ. आझाद ग्रंथालयात विद्यार्थिनींना प्रवेश नसणो ही नुसती बातमी नाही, मौलाना अबुल कलाम आझाद या ज्ञानर्षीच्या स्मृतींचा तो अपमानही आहे. मौलाना हे ज्ञानाच्या क्षेत्रतले प्रतापी सूर्य होते. वयाच्या अठराव्या वर्षी पवित्र कुराणावर एक संपूर्ण नवे भाष्य लिहून त्यात कुराण शरीफाचा खरा संदेश जिहाद हा नसून सर्वधर्मसमभाव हा आहे, असे प्रतिपादन मांडणा:या या ज्ञानसूर्याला त्याच काळात ‘अबुल कलाम’ म्हणजे विद्यावाचस्पती या सन्मानाने मक्केच्या काबा मशिदीने गौरविले होते. मौलानांच्या ज्ञानाचा व पुरोगामीत्वाचा दरारा एवढा, की जगाने त्यांच्या पदव्याच तेवढय़ा लक्षात ठेवल्या. त्यांचे खरे नाव कोणते याची चौकशी करावी असेही कोणाला वाटले नाही. कोलकात्याच्या मशिदीचे इमाम म्हणून ते ‘मौलाना’ होते. अबुल कलाम हा त्यांना मिळालेला मक्केचा सन्मान होता आणि ‘आझाद’ हे त्यांचे संपादकीय टोपणनाव होते. (‘अल् हिलाल’ आणि ‘अल् हिजाब’ या दोन उर्दू दैनिकांना त्यांच्या नेतृत्वात सा:या उत्तर भारतात प्रचंड लोकप्रियता लाभली होती.) त्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशाने दिपून गेलेल्या देशाने ‘मोहियुद्दीन अहमद’ हे त्यांचे खरे नाव कधी लक्षातच घेतले नव्हते. त्यातून मौलाना हे काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक तरुण अध्यक्ष बनलेले नेते होते. त्यांचा सामाजिक दृष्टिकोन कमालीचा आधुनिक व समतावादी होता. 1942 मध्ये बगदाद येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय मुस्लिम परिषदेचे निमंत्रण काँग्रेस पक्षाला मिळाले तेव्हा त्याच्या अध्यक्षपदावर असलेल्या मौलानांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळात चार महिला सदस्यांची निवड केली. त्यावर सारे मुस्लिम जग संतापले तरी मौलानांनी आपला आग्रह अखेर्पयत रेटून धरला. अशा पुरोगामी मनाच्या ज्ञानी माणसाचे नाव असलेल्या वाचनालयात मुलींना प्रवेश नाकारला जावा या एवढी उद्वेगजनक बाब दुसरी कोणतीही नाही. त्यातून हा प्रवेश नाकारण्यासाठी अलिगडच्या कुलगुरूंनी जी कारणो पुढे केली, ती तर आणखीच संतापजनक आहेत. वाचनालयात विद्यार्थिनींना प्रवेश दिला, की त्यातली विद्याथ्र्याची गर्दी चौपटीने वाढेल व त्यामुळे जागेचा, गर्दीचा व प्रसंगी शांतताभंगाचाही प्रकार घडेल, असे या कुलगुरूंचे म्हणणो आहे. वाचनालयातील आताची जागा अपुरी असल्यामुळे त्यात मुलींना येऊ दिले जात नाही, असेही त्यांनी सांगून टाकले आहे. विद्यार्थिनींना दिली जाणारी पुस्तके त्यांच्या महाविद्यालयात पुरविली जातात त्यामुळे त्यांना असा प्रवेश देण्यात अर्थ नाही, असा खुलासाही त्यांनी केला आहे. मुली वाचनालयात आल्या तर ‘शांतताभंगा’सारख्या (म्हणजे विनयभंगासारख्या) घटना घडतील असे म्हणणो हा तर खास अपमानजनक प्रकार आहे. तो सा:या विद्यार्थिवर्गावर अविश्वास दर्शविणारा व त्यांचा अपमान करणारा आहे. या वाचनालयात आम्हाला प्रवेश द्या आणि त्यातले ग्रंथ आम्हाला पाहू व वाचू द्या, अशी मागणी विद्यार्थिनींनी केल्यावरून हा वाद निर्माण झाला. अलिगडचे विद्यापीठ तसेही धार्मिक बाबतीत कर्मठ म्हणून इतिहासात गाजले आहे. बुरखा ही त्याची निशाणी आहे आणि पाकिस्तानच्या, म्हणजे फाळणीच्या मागणीची सुरुवातही त्याच विद्यापीठात झाली आहे. एकेकाळी या विद्यापीठाचे नाव अलिगड मुस्लिम विद्यापीठ असे होते. त्या वेळी बनारस विद्यापीठाचे नावही बनारस हिंदू विद्यापीठ हे होते. न्या. छागला हे देशाचे शिक्षणमंत्री असताना त्यांनी या दोन्ही विद्यापीठांच्या नावांतील धर्मवाचक संज्ञा गाळणारी दुरुस्तीच कायद्यात करून घेतली. पण नावे बदलण्याने वृत्ती बदलतेच असे नाही. अलिगड विद्यापीठाचा आताचा तिढा असा आहे. त्याच्या वाचनालयाला मौलानांचे पवित्र व पुरोगामी नाव दिले असल्याने त्याची तीव्रता वाढली आहे. वाचनालयाचे क्षेत्र विद्याथ्र्याना अपुरे पडत असेल तर जास्तीच्या बांधकामाने ते वाढवून घेण्याची व त्यात गर्दी होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी विद्यापीठाला सहजपणो घेता येणारी आहे. मात्र तसे न करता केवळ विद्याथ्र्याना प्रवेश देऊन विद्यार्थिनींवर प्रवेश बंदी लादणो ही त्याची मनमानी आहे आणि ती ीविरोधी, कायदाविरोधी व संविधानविरोधीही आहे. अलिगड विद्यापीठात केवळ मुस्लिम विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच जातात असे नाही. त्यात सर्व जातीधर्माच्या विद्याथ्र्याना प्रवेश आहे. त्यामुळे या विद्यापीठाच्या प्रमुखांचा विद्यार्थिनीविरोधी पवित्र सा:यांसाठीच निषेधार्ह ठरावा असा आहे. तेवढय़ावर हे विद्यापीठ ऐकेल असे मात्र नाही. त्यासाठी आवश्यक तर केंद्र सरकारनेच योग्य तो निर्देश संबंधितांना दिला पाहिजे आणि शक्य तर त्यांच्यावर कारवाईही झाली पाहिजे. 

 

Web Title: Maulana, such as Aligid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.