शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मराठी माणस आपणोच छे !

By सचिन जवळकोटे | Published: January 24, 2018 11:37 PM

‘मराठी भाषेला कुणी वाली राहिला नाही,’ अशी तळटीप असलेली पोस्ट सदाशिव पेठेतल्या दामू तात्यांनी टाकताच अनेकजण सुग्रीवासारखे आक्रमक बनले. मराठीच्या बचावासाठी ‘सोशल मीडियावर कमेंटस्’चा भडीमार सुरू झाला. साºया जगाला कामाला लावून दामू तात्या मात्र दुपारी १ ते ४ वामकुक्षीत रममाण झाले.

‘मराठी भाषेला कुणी वाली राहिला नाही,’ अशी तळटीप असलेली पोस्ट सदाशिव पेठेतल्या दामू तात्यांनी टाकताच अनेकजण सुग्रीवासारखे आक्रमक बनले. मराठीच्या बचावासाठी ‘सोशल मीडियावर कमेंटस्’चा भडीमार सुरू झाला. साºया जगाला कामाला लावून दामू तात्या मात्र दुपारी १ ते ४ वामकुक्षीत रममाण झाले.एवढ्यात दार वाजलं. ‘१ ते ४ बेल वाजवू नये. मोबाईलवर रिंगही देऊ नये,’ असा बोर्ड लावूनही त्यांची झोपमोड केली गेली. बाहेरची मंडळी त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेली. ‘मराठीसाठी नेत्यांनी काय केलं, याचा जाब विचारू. चला!’ मंडळींची तळमळ पाहून तात्याही निघाले. पुण्याच्या कट्ट्यावर राजकीय गप्पा मारणाºया मंडळींमध्ये त्यांना चक्क पृथ्वीबाबा क-हाडकर दिसले. ‘बाबा माणसात आले,’ या आश्चर्यानंदानं सा-यांनी एकमेकांकडं बघितलं. ‘मराठीसाठी काय करणार?’ असं विचारताच बाबा म्हणाले, ‘अजितदादांनी एक महिना अगोदर सरकार पाडलं नसतं तर मी नक्कीच मराठी बचावाच्या ठरावाची फाईल मंजूर केली असती. आता दिल्लीत पार्टी हायकमांडशी बोलून जीआर काढतो.’‘अजूनही सत्तेत असल्यासारखं ही मंडळी का वागतात?’ या विचारानं डोक खाजवत टीम कोल्हापूरकडं गेली. तिथं चंद्रकांतदादा भेटले. त्यांचं सारं लक्ष धनंजय बीडकरांच्या सोशल मीडियावरील खड्ड्याच्या फोटोंवर केंद्रित. ‘नमस्कार दादाऽऽ’ टीमनं हाक मारताच ‘हेळरीऽऽ यारू?’ असा प्रतिप्रश्न दादांनी केला. ‘बोलाऽऽ कोण?’ असं दादांनी कन्नडमध्ये विचारल्याचं कुणीतरी सांगितलं, तेव्हा टीमच्या लक्षात आलं की इथं मराठीचा ‘राँग नंबर’ लागलाय. टीम पुरती दचकली. आपण कोल्हापुरात आलोत की गोकाकमध्ये... याची खात्री करण्यासाठी त्यांनी एकमेकांना चिमटेही काढले. टीमनं शेवटी ‘हिंग ह्यँग री चंदू अण्णा ?’ असं काकुळतीनं विचारत त्यांना रामराम ठोकला. (म्हणजे ‘असं कसं हो दादा ?’) कारण कर्नाटकात दादा म्हणजे अण्णा...असो. टीम ‘मातोश्री’वर पोहोचली. तिथं युवराजांच्या राज्याभिषेकाची जोरदार लगबग सुरू झालेली. मिलिंदरावांचा रुबाब (आता सेक्रेटरी झाल्यानं ते राव बनले नां!) भलताच वाढलेला. त्यांनी टीमला स्पष्टपणे सांगितलं, ‘मेट्रो सिटीच्या नाईट लाईफमधील पेग्वीनला मराठीत काय म्हणतात, हे अगोदर शोधा. मग आमच्या छोट्या अन् मोठ्या साहेबांशी भेट घालून देतो.’ चेहरा बारीक करून टीम ‘कृष्णकुंज’वर गेली. मात्र, ‘पद्मावत’ला हीट करण्यासाठी टिष्ट्वट करण्यात ‘वहिनीसाहेब’ रमलेल्या. तेव्हा ‘इंग्रजी मीडियम’च्या अमितशी बोलण्यात अर्थ नाही, हे ओळखून टीम तेथून थेट बाहेर पडली.‘वर्षा’वर आशिषभाई अन् किरीटभाई दीडशे भावी आमदारांच्या विषयावर देवेंद्रपंतांसोबत गंभीरपणे चर्चा करत होते. ‘मराठी’बद्दल बोलावं म्हणून टीम पुढं सरसावली. तेवढ्यात रिंग वाजली. कानाला मोबाईल लावत पंत अत्यंत सावधपणे बोलू लागले, ‘हां अमितभाईऽऽ हूं बोलू छू. अंय्या बध्धू ठीक छे. महाराष्ट्राना विकास माटे तमारू ध्यान रेहवा देजो. मराठी माणस पण आपणोच छे,’ आता हे ऐकून टीम बेशुद्ध पडली... हे शुद्ध मराठीत सांगण्याची गरज आहे काय राव?- सचिन जवळकोटे sachin.javalkote@lokmat.com

टॅग्स :marathiमराठी