शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

मनाचिये गुंथी - धनेशाचे गाणे...

By admin | Updated: May 5, 2017 00:19 IST

रायगड जिल्ह्यातील डोंगरी भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोलादपूर तालुक्यातील कुडपण हे अतिदुर्गम ठिकाण. हात लावू तिथे

रायगड जिल्ह्यातील डोंगरी भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोलादपूर तालुक्यातील कुडपण हे अतिदुर्गम ठिकाण. हात लावू तिथे इतिहासाच्या कथा आणि कान लावू तेथे पराक्र माच्या गाथा हे त्याचे वैशिष्ट्य.  कधीकाळी माणूस पोहोचणे अशक्य अशा या कुडपणला भेट देण्याचा योग आला.पोलादपुरातील उपक्रमशील शिक्षक प्रमोद गायकवाड सोबत होते. नजरेचे पारणे फेडणारा निसर्ग आणि माणसाच्या उत्तुंग ध्येयासक्तीचे दर्शन घडवणारा घाटरस्ता असा थरार अनुभवत कुडपणला पोहचलो. सरपंच हनुमंत धोंडू शेलार हे शेलारमामांच्या सतराव्या पिढीचे प्रतिनिधी. ते म्हणाले, आमची रस्त्याची प्रतीक्षा संपायला सोळा पिढ्या जाव्या लागल्या. खरोखरच ते एक विदारक वास्तव होते. रस्ता आला; पण माणसे गेली, असे ते पुढे म्हणाले. त्यांच्या त्या विधानाला, गड आला, पण सिंह गेला या उक्तीचे वजन होते. गावात माणसे राहिली नाहीत, हायस्कूल बंद झाले, मराठी शाळा जेमतेम सुरू आहे, ही त्यांची व्यथा.उदय भानूला मारून तानाजीच्या हौतात्म्याला विजयाची रूपेरी किनार मिळवून देणारे शेलारमामा, काळाचे नवे रूपक म्हणून समोर आले. महाराष्ट्रातील जनता, लेखक, कवी, पत्रकार, कलावंत, विचारवंत, साहसी तरुणांना ते कुडपणला या म्हणून साद घालत आहेत असे वाटले. एक उत्तम पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण योग्य नियोजनाअभावी मरणपंथाला लागले आहे, हे ते सांगत होते. तुमचा बाप येथे मरून पडलेला असताना भ्याडासारखे पळून काय जाता, लढा नाहीतर मरा, हे शब्द नवी प्रेरणा देताना दिसले. कुडपणच्या वारशाचा सर्वांगाने शोध घ्या, तो जतन करण्यासाठी प्राणांची बाजी लावा, किमान जो काही वारसा आहे तो गमवण्याचा करंटेपणा करू नका ही ती प्रेरणा. जुन्या आठवणी निघाल्या. स्वस्ताई, मुबलक दूध, दही, तूप. ताकात भाकरी चुरून खाण्याचा आनंद आणि असेच खूप काही.माळ्यावरच्या तलवारी, बिचवे बाहेर आले. मावळ्यांच्या शौर्याचा इतिहास जागा झाला... परमवीरचक्र पुरस्काराने सन्मानित नाईक कृष्णा सोनावणे यांच्या घराचे दर्शन घेतले, जगबुडी नदीच्या उगमस्थानावर नजर टाकली, साहसी गिर्यारोहकांच्या प्रतीक्षेतील भीमाची काठी हा बेलाग सुळका पाहिला. संध्याकाळी कुडपण सोडले. मावळत्या सूर्याचे किरण अंगावर घेत घाट उतरू लागलो. दोन तीन डोंगरांवर वणवे लागले होते. गवत जळाल्याचा आणि कुड्याच्या फुलांचा संमिश्र गंध वातावरणात भरून राहिला होता. गोळेगणीजवळ एका ऐनाच्या झाडावर चिरक्या आवाजात धनेशाचे (हॉर्न बिल) गाणे सुरू होते. गाडी  थांबवून मिनीटभराचे ते दुर्लभ गाणे ऐकले. गाणे कसले, निसर्गरक्षणाची याचना करणारे करूण प्रार्थनागीत होते ते !- प्रल्हाद जाधव -