शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

मनाचिये गुंथी - रंग माणसांचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:20 AM

माणसे अनेक रंगांची असतात. रंग म्हणजे स्वभाव. स्वभाव हे रंगाचे द्योतक आहे. अर्थात रंग म्हणजे स्वभावच. आपल्याला सात रंग माहीत असतात. मूळ रंग तर चारच आहेत. ते एकमेकात कमी-अधिक प्रमाणात मिसळत नेले की रंगाच्या असंख्य छटा निर्माण होतात. केवळ हिरवा हा एक रंग घेतला तरी त्याच्या सुमारे ६० छटा आढळून येतात.

- प्रल्हाद जाधवमाणसे अनेक रंगांची असतात. रंग म्हणजे स्वभाव. स्वभाव हे रंगाचे द्योतक आहे. अर्थात रंग म्हणजे स्वभावच. आपल्याला सात रंग माहीत असतात. मूळ रंग तर चारच आहेत. ते एकमेकात कमी-अधिक प्रमाणात मिसळत नेले की रंगाच्या असंख्य छटा निर्माण होतात. केवळ हिरवा हा एक रंग घेतला तरी त्याच्या सुमारे ६० छटा आढळून येतात. मात्र माणसांचे रंग किती, याची अधिकृत यादी कोणी तयार केलेली दिसत नाही. ती करता येईल असेही वाटत नाही. शेक्सपिअरने आपल्या ३६ नाट्यकृतींमधून मनुष्य स्वभावाचे सारे नमुने टिपले आहेत, असे म्हणतात. पण या मताशी कदाचित शेक्सपिअरही सहमत झाला नसता. त्याच्या लेखनात आध्यात्मिक विचारांचा अभाव आहे, असे विंदा करंदीकरांनी म्हटलेच आहे. तात्पर्य काय, तर माणसाच्या रंगांची मोजदाद करता येणे अवघड आहे.एखाद्या माणसाला आपण सरड्यासारखे रंग बदलणारा, अशी उपमा देतो. प्रत्यक्षात हा सरड्याचा अपमान आहे. कारण मातकट, लाल, पिवळा, हिरवा अशा चार-पाच छटा सोडल्या तर त्या पलीकडे सरड्याला रंग बदलता येत नाहीत. माणूस मात्र असंख्य रंग धारण करू शकतो. इतके की त्या रंगांचे माणसाला नामकरणही करता येऊ शकत नाही. सरडा संकटाच्या वेळी आणि तेही स्वसंरक्षणार्थ रंग बदलतो. माणूस मात्र त्याच्या मनात येईल तेव्हा आणि सोईनुसार रंग बदलताना दिसतो. प्रसंगी, तो मी नव्हेच असे म्हणत आणखी एखादा रंग दाखवतो. कधी आपल्या रंग बदलण्याच्या करामतीचा अभिमान बाळगत, रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा असे म्हणायलाही मोकळा असतो.एखाद्या माणसाकडून अपेक्षाभंग झाला की, त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली असे आपण म्हणतो. केसाने गळा कापणारी, पाठीत खंजीर खुपसणारी, आश्वासने देऊन फसवणारी, विविध आमिषे दाखवून भुलवणारी सारीच माणसे कोणता ना कोणता रंग धारण करीत असतात. काही रंग गडद तर काही हलके, काही साधे तर काही विषारी असतात. काही रंग पुसट होत जातात तर काहींचे डाग आयुष्यभर जात नाहीत. रंगांपासून कुणाचीच सुटका नाही. कोळशाच्या खाणीत काम करणाºया माणसाला जसे काळ्या रंगाशी जुळवून घ्यावे लागते तसेच प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रंगाचा सामना करावाच लागतो. प्रेम, वात्सल्य, भक्तीचेही सरळ साधे रंग असतात. यातील आपला रंग कोणता हे जाणून घ्यायचे झाले तर त्यासाठी मनाचा आरसा स्वच्छ, लखलखीत ठेवणे आवश्यक असते, पण त्यावरही बºयाचदा धूळ बसलेली असते !