शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मनाचिये गुंथी - गाववाड्यातील लोकरंग

By admin | Updated: March 30, 2017 00:41 IST

भारतीय संस्कृती आणि लोकजीवनातील प्रत्येक सण हा एकीकडे आध्यात्मिक आणि धार्मिक तत्त्वाने जोडला आहे

भारतीय संस्कृती आणि लोकजीवनातील प्रत्येक सण हा एकीकडे आध्यात्मिक आणि धार्मिक तत्त्वाने जोडला आहे, तर दुसरीकडे मुक्त आनंदाचा लोकोत्सव म्हणून तो उत्साहात साजरा होतो आहे. उत्सवांचे नियोजनही ऋतुमानाप्रमाणे आणि निसर्ग घटकांच्या ऋतुचक्राप्रमाणे केले गेले आहे. चैत्रात वसंत ऋतू येतो तो चैतन्याची अनुभूती घेऊनच. या वसंत आगमनाच्या स्वागतासाठी ‘वसंत आगमनोत्सव’ म्हणून होळीचा सण साजरा होतो. या उत्सवाचे रूप पाहता हा सण मूलत: अगदी लौकिक पातळीवरचा असून, नंतर त्यात कालांतराने धार्मिक व सांस्कृतिक विधी विधानांची भर पडून त्याचे स्वरूप तयार झाले. होलिकोत्सव म्हणजे होळी, धुलिकोत्सव म्हणजे धुळवड आणि रंगोत्सव म्हणजे रंगपंचमी. या तिन्हीचे एकत्रिकरण होऊन या लोकोत्सवाच्या अंगाने होळी पौर्णिमेपासूनच रंग, ढंग आणि शृंगाराची उधळण होते. शेतातले पीकपाणी घरी आलेले असते. गावगाड्यातील उरुस, जत्रांना सुरुवात होते. होळी पेटल्यानंतर तर मनसोक्तपणे बोंब मारायला पूर्ण मुभा असते. गंभीर तत्त्वज्ञान, सात्त्विक आदर्शवाद या साऱ्यांना क्षणभर बाजूला ठेवून एक वेगळीच धुंदी गावगाड्यात अवतरते. राजस वृत्तीचे सारे खेळ, लीला, क्रीडा याला उधाण येते. सर्वसामान्यांना स्वभावधर्म ओळखून मनात दाबून ठेवलेल्या शृंगारवृत्तीला मुक्तपणे शब्दातून व्यक्त करण्याचा जणू धार्मिक परवानाच शिमग्याच्या निमित्ताने या कालावधीत लोकांना मिळतो. विनोदी कार्यक्रमांद्वारा विडंबनात्मक अश्लील बोलण्यातून लोकांना हसविणारे ‘भाव’ हे याच काळात गावगाड्यात हिंडू लागतात. दरवेशी, कोल्हाटी, शकुनी, बहुरूपी, पिंगळे, पांगूळ, बाळसंतोष, सरवडा या साऱ्या लोकभूमिका गावगाड्यात येऊन आपल्या आगमनाने रंग भरवतात. त्यांच्या वर्षाच्या फेराचा डेकार त्यांना शेतकऱ्यांच्या खळ्यावर मिळे आणि मग तृप्त होऊन या लोकभूमिका आपल्या पारंपरिक लोककलांमधून लोकांना रिझवित नाथमहाराजांनी भागवतात या भांडांचा संदर्भ दिला आहे. ‘‘का भांडांचे तोंडी भंडपुराण। त्यावरी आला शिमग्याचा सण। मग करिता वाग्विटंबन। आवरी कवण तयासी।’’ शिमग्याच्या पंधरवड्यात वाग्विटंबनेपासून समाजाच्या विकृतींवर मार्मिक शैलीने आघात करणाऱ्या भांडाच्या भंडपुराणाला उधाण येत असे. त्याच काळात गावगाड्यात बारा बलुतेदारांचा तमाशा होत असे. गावच्या उत्पन्नातून ‘देकार’ नावाची देणगी या खेळ-तमाशासाठी बाजूला काढून ठेवली जायची. गावकीच्या तमाशात तेली, न्हावी, महार, कुंभार, मुलाणी, सुतार, गुरव, परीट हे सारे भाग घ्यायचे. गावचा ब्राह्मणही कवने करून द्यायचा आणि बारा बलुतेदारांच्या चावडीवर तमाशातून लोकरंजनाचे एक थिएटर उभे राहायचे. भक्तिरसात रमलेला गावगाड्यातला भोळा भाव तमाशाच्या शृंगारातही तितकाच रंगायचा. खेळ, सण, उत्सवांच्या माध्यमातून जीवनाच्या विविध रंगांची उधळण करणारी मुक्त समाजव्यवस्था इतरत्र कोठे आढळणार?डॉ. रामचंद्र देखणे