शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

खरेच माणूस पराधीन आहे?  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 1:23 PM

मिलिंद कुलकर्णी  पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा...गदिमांची ही नितांतसुंदर आणि अर्थगर्भ रचना आहे. अलिकडच्या काही घटना ...

मिलिंद कुलकर्णी 

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा...गदिमांची ही नितांतसुंदर आणि अर्थगर्भ रचना आहे. अलिकडच्या काही घटना बघीतल्या तर प्रश्न पडतो की, खरेच आपण पराधीन आहोत काय? कोल्हापूर, सांगलीतील महापुराने हा समृध्द परिसर होत्याचा नव्हता झाला, जायकवाडी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला, मात्र संपूर्ण मराठवाडा कोरडा आहे, गिरणा धरण निम्म्याहून अधिक भरले, पण पारोळा, भडगाव तालुक्यातील छोटे, मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. अगदी परवा धुळे जिल्ह्यात झालेल्या अपघातात १३ निष्पाप प्रवासी जीव गमावून बसले. हे सगळे पाहिल्यावर संवेदनशील माणसाचे मन प्रश्नांच्या भुंग्यांनी पोखरले जाते. माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे, आम्ही चंद्रावर यान पाठवतो, तरीही आम्हाला हवामानाचे, पर्जन्यमानाचे अचूक भाकीत वर्तवता येत नाही. पाश्चात्य देशात आठवडाभराचे भाकीत वर्तवले जाते तसेच अगदी पुढील चार तासांविषयी अंदाज सांगितला जातो. मग आमच्याकडे का होत नाही? पराधीन फक्त आम्हीच आहोत, पाश्चात्य मंडळी नाही? दोष कुणाचा आहे मग? भारतासारख्या विभिन्न हवामान, वातावरण असलेल्या देशात कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ अशी स्थिती आपण अनुभवत आहोत. पर्यावरण संतुलन, वृक्षारोपण,   नदी जोड हे विषय केवळ राष्टÑीय परिषदा, चर्चासत्र, संशोधन पत्रिका, वर्तमानपत्रांमधील लेख, दूरचित्रवाहिन्यांवरील चर्चा, शासकीय धोरण आणि परिपत्रकांपुरती मर्यादीत राहिलेले आहेत. मोजक्या पाच-दहा व्यक्ती, संस्था, गावे यांच्या ‘आदर्श’ कथा आम्ही वर्षानुवर्षे ऐकत, वाचत राहतो. पण ही जनचळवळ होत नाही. तरीही दोष ना कुणाचा?आपात्कालीन स्थिती हाताळणारी यंत्रणा हा खूप चिंताजनक विषय आहे. भूकंप, महापूर, वादळ या स्थितीत तातडीने मदत आणि बचाव कार्य आवश्यक असते. महसूल विभागातर्फे दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस दल, गृहरक्षक दल यांच्यासह संबंधित शासकीय कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन ‘आपात्कालीन नियोजन, आराखडा’ तयार केला जातो. पण ही बैठक आणि त्यातील उपाययोजना या केवळ कागदावर आणि शासकीय उपचार म्हणून केल्या जातात. महसूल मंडळाच्या पातळीवर पर्जन्यमापके, तापमापके बसविली जातात. मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक अशा गावपातळीवरील शासकीय यंत्रणेला या उपकरणांची माहिती आहे?  देखभाल, दुरुस्तीविषयी प्राथमिक कल्पना आहे? तहसील कार्यालयांमध्ये बोटी, जीवरक्षक प्रणाली असे साहित्य उपलब्ध आहे, त्यांची स्थिती कशी आहे, हे कधी जिल्हाधिकाºयांनी जाऊन पाहिले आहे? गावपातळीपासून तर राजधानीपर्यंत कागदे रंगविण्याचे काम अतीशय उत्तमपणे चालते. वास्तवापासून किती योजने दूर आहोत, हे माहित असूनही त्याकडे कानाडोळा केला जात असेल तरी आम्ही म्हणायचे दोष ना कुणाचा? महामार्गांच्या सभोवताली असलेल्या हॉटेलांमध्ये दारु सहज उपलब्ध होते. १०-१२ तास गाडी चालवून थकलेला, शिणलेला गाडी चालक नशेच्या आहारी जातो. विश्रांती न घेता त्याच अवस्थेत वाहन रस्त्यावर आणतो आणि निमगूळसारखे अपघात घडतात. निष्पाप जिवांचा हकनाक बळी जातो. दहा लाखांची मदत देऊन माणूस परत येणार आहे काय? महामार्गापासून २०० मीटर अंतरावर दारु दुकाने हलवावी, असा आदेश न्यायालयाने देताच शासकीय आणि राजकीय पातळीवरील उडालेली तारांबळ आपण गेल्यावर्षी पाहिली. महामार्गाचे राज्य मार्ग, राज्यमार्गाचे गाडरस्ते एका रात्रीतून झाले. ‘गतिमान प्रशासन’ पहिल्यांदा अनुभवाला मिळाले. मग हे प्रशासन मद्यपी चालकाला रस्त्यावर येण्यापासून का रोखत नाही? टोल घ्यायला, अवजड वाहनाकडून दंड वसूल करायला यंत्रणा व्यवस्थित काम करते, पण गैरप्रकार रोखायला, माणसाचे जीव वाचवायला आम्हाला का वेळ नाही. जळगावातील मेहरुण तलावात लागोपाठच्या दोन दिवसात तीन तरुण बुडाले. गेल्यावर्षी या तलावाचे सुशोभीकरण केल्याचे जाहीर झाले. निम्मी संरक्षक भिंत बांधली गेली. रस्ते डांबरी केले, पण उरलेली भिंत बांधली गेली नाही. सुरक्षारक्षक, जीवरक्षक तेथे तैनात नाही. मग अशावेळी माणूस पराधीन आहे असे कसे म्हणता येईल? 

टॅग्स :Jalgaonजळगाव