शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

मामा.. हात  धुऊन घ्या ! ‘इंदापुरी’ भांडण ‘सोलापुरी’ अंगणी..

By सचिन जवळकोटे | Updated: July 25, 2021 10:07 IST

लगाव बत्ती..

सचिन जवळकोटे

‘घड्याळ’वाल्यांच्या पार्टीला गटबाजी तशी पाचवीला पुजलेली. मात्र गेल्या निवडणुकीत ‘अकलूज’पासून ‘बार्शी’पर्यंत अनेक ‘गट’वाले आपापले ‘तट’ घेऊन बाहेर पडले. कार्यकर्त्यांना वाटलं, ‘हुश्शऽऽ आता राडेबाजी संपली !’...पण हाय, कुठलं काय. ‘इंदापूर’चे ‘पालकमामा’ इथं व्यवस्थित सेटल झाल्यानंतर पुन्हा एकदा गटबाजीचा भस्मासुर धुमाकूळ घालू लागलाय. पार्टीतल्या ‘विरोधकांचा व्हायरस’ खतम करण्यासाठी ‘अजितदादा-जयंतरावां’च्या सॅनिटायझरमधून ‘पालकमामा’ पुरतं ‘हात धुऊन घेऊ लागलेत.’ लगाव बत्ती..

‘काका’ नाही.. ‘दादा’ नाही.. आता ‘मामां’चा गट !मुळात ‘घड्याळा’ची निर्मितीच गटबाजीतून झालेली. बावीस वर्षांपूर्वी ‘हात’ पार्टीतला ‘बारामतीकर’ गट बाहेर पडून ‘घड्याळ’वाला बाबा बनला. त्यानंतर या नव्या पार्टीतही ‘अकलूजकरां’चा गट वेगळा तर ‘पंढरपूरकरां’चा वेगळा. मात्र ‘कमळ’ फुलल्यानंतर एकेक करत अनेक नेते बाहेर पडले. आमदारकीच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यात ‘घड्याळ’ फक्त ‘शिंदे-पाटील’ घराण्याचंच राहिलं. आता हे ‘शिंदे-पाटील’ कोण हे ‘माढा-अनगर’च्या लोकांना झटकन्‌ कळालं असणार. असो..

गेल्या दीड वर्षांत जिल्ह्यातली ‘घड्याळ’वाली मंडळी सत्तेचा फायदा करून घेण्यासाठी एक झालेली. मात्र गटबाजी नसानसात भिनलेली. काही दिवसांतच अनेकांची चुळबूळ सुरू झालेली. ‘उजनीचं पाणी’ पेटल्यानंतर तर उघड-उघड दोन गट दिसू लागले. ‘पालकमामां’च्या विरोधात ‘संजयमामा’ गेले. अशातच ठेक्यांचं वाटप विशिष्ट व्यक्तींनाच दिलं जात असल्याचं लक्षात येताच काही गबरगंड  ‘ठेकेदार नेते’ही डिस्टर्ब झाले. त्यांनी ‘पालकमामां’च्या विरोधात रान पेटवायला सुरूवात केली. 

मध्यंतरी ‘राजन अनगरकर, यशवंत मोहोळकर अन्‌ बळीराम वडाळाकर’ हे तिघे गुपचुप थेट ‘थोरल्या काका बारामतीकरां’ना भेटले. ‘पालकमामां’च्या विरोधात त्यांनी तक्रारींची लिस्टच सादर केली. ‘काकां’नी शांतपणे सारं ऐकून घेतलं; मात्र मोहोळमधल्याच दोन खोक्यांच्या कामाची एक फाइल त्यांनी ‘यशवंततात्यां’ना दाखवली, जी ‘पालकमामां’नीच पूर्वी मंजूर केलेली. इकडं ‘तात्या’ तोंडी तक्रारी करत होते. तिकडं  ‘मामा’ मात्र अगोदरच  ‘काकां’कडं लेखी पुरावे ठेवून आले होते. ‘मामा’ लय हुशारऽऽ. तिघांच्याही लक्षात आलं. गपगुमान ते मागे फिरले.मात्र ‘थोरले काका’ही गप्प बसले नाहीत. नंतर ‘मामां’चीही चौकशी केली. सोलापुरातल्या अनेक मंडळींकडून माहितीही जाणून घेतली. ‘उमेशदादा-संतोषभाऊ’ या ‘पाटील-पवार’ मंडळींनी मात्र ‘मामां’चं कौतुकच केलं. फुल सपोर्ट केला. मग काय.. ‘मामा’ वाचले. भलेही सोलापूरचं पाणी इंदापूरला गेलं नसेल, मात्र इंदापूरच्या मामांची गाडी पुन्हा एकदा सोलापुरात रुबाबात फिरू लागली. लगाव बत्ती..

यानंतर मात्र  ‘पालकमामा’ आक्रमक झाले. त्यांनी उघड-उघड आपला गट वाढवायला सुरुवात केली. ‘घड्याळ’वाल्यांचे मूळ दोन गट. ‘थोरले काका’ गट. ‘धाकटे दादा’ गट. ‘पालकमामा’ यातल्या ‘दादा’ गटाचे. त्यात पुन्हा सोलापुरात याच ‘मामां’चा स्वत:चा वेगळा गट. ‘संतोषभाऊ’ म्हणे या नव्या गटाचे म्होरके. नेहमी त्यांच्यासोबत असणाऱ्या ‘भारतभाऊं’नीही त्यातही पुन्हा वेगळा ‘संतोषभाऊ’ गट निर्माण केला. बापरेऽऽ पावात वडा. वड्यात बटाटा..

सध्या सोलापूर शहरातली तरुण फळी आपल्या नव्या गटासोबत बांधून घेण्याचा एककलमी कार्यक्रम ‘मामां’चा सुरू. या गदारोळात सर्वांत मोठी गोची मूळ ‘थोरले काका’ गटाची झालेली. यांचं कधीच नव्या नेत्यांसोबत न जमलेलं.. अन्‌ आता ‘मामां’च्या नव्या गटामुळं थेट यांच्या अस्तित्वालाच धक्का बसू लागलेला. यामुळं नवनवीन किस्सेही घडू लागलेले. याचं जिवंत उदाहरण म्हणजे ‘उमेशदादा नरखेडकर’. यांनी आजपावेतो उघड-उघडपणे ‘अनगरकरां’शी पंगा घेतलेला. आता याच ‘अनगरकरां’चं शीतयुद्ध ‘पालकमामां’सोबत भडकलेलं. विशेष म्हणजे ‘वडाळ्याचे काका’ या युद्धात ‘अनगरकरां’सोबत. त्यामुळं झेडपीतल्या ‘काकां’च्या केबिनमधलं ॲन्टी चेंबर सोडण्याची वेळ ‘उमेशदादां’वर आलेली. किती छान रंगवलं होतं हो ते चेंबर. अरेरेऽऽ. आता कुठल्यातरी अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये बसून फोनाफोनी करण्यात हे ‘पाटील’ व्यस्त. लवकरच स्वतंत्र केबिनसाठी त्यांचा प्रयत्न सुरू, हा भाग वेगळा.खरंतर, सत्ता आल्यानंतर ‘आपण सारे भाऊ भाऊऽऽ एकत्र मिळून मस्तपैकी खाऊऽऽ’ या मूडमध्ये स्थानिक मंडळी. मात्र दोन ‘इंदापूरकरां’चं तिथलं राजकारण इथं जिल्ह्यात रंगवलं गेलं.. अन्‌ कारण नसताना यात सारेच ओढले गेले. ‘पालकमामा’ इंदापूरचे. मोहोळचे ‘यशवंततात्या’ही इंदापूरचे. ‘तात्यां’ना आमदारकी मिळवून देण्यासाठी म्हणे याच ‘मामां’नी ‘अजितदादां’कडं शब्द टाकलेला. इंदापुरातल्या एका व्यासपीठावर ‘अजितदादां’नी या उपकाराची जाहीर वाच्यताही केलेली. आजपावेतो ‘तात्यां’ची ‘रेल्वे’ केवळ ‘बारामतीकरां’च्या डिझेलवरच पळालेली, तरीही ‘उजनी पाणी’ प्रकरणात या ‘तात्यां’नी ‘मामां’ची बाजू न घेतलेली. ‘जन्मभूमीपेक्षा कर्मभूमी महत्त्वाची,’ हा त्यांचा डाॅयलॉगही म्हणे इंदापुरातल्या कार्यकर्त्यांना खटकलेला. दोघांमध्ये गॅप वाढत चाललेला. हा विस्तव बरोबर हेरून ‘अनगरकरां’नीही हळूच फुंकर मारलेली. ‘बळीरामकाकां’नीही वरची राख झटकलेली. एक ‘भरणे’. दुसरे ‘माने’ .आता या दोघांच्या भांडणात सोलापूरकरांचं काय होणार कोण जाणे. लगाव बत्ती..‘संजयमामां’ची खुर्ची.. ‘उमेशदादां’ची पावती !‘पालकमामा’ अन्‌ ‘संजयमामा’ यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं जाणवलं ‘जयंतरावां’च्या दौऱ्यात. रेस्ट हाऊसमध्ये ‘संजयमामा’ आले, तेव्हा ‘पालकमामा’ हे ‘जयंतरावां’च्या डाव्या साइडला बसलेले. त्यांच्या शेजारची खुर्चीही रिकामी. मात्र त्याला वळसा घालून ‘संजयमामा’ जाऊन बसले ‘जयंतरावां’च्या उजव्या साइडला. विशेष म्हणजे बैठकीत एका अधिकाऱ्यानं उजनीच्या पाण्याचा विषय मांडताच झटकन्‌  ‘पालकमामा’ उठले. तेव्हा अनगरकरांनी त्यांना टोमणा हाणलाच, ‘थांबा की, तुमचाच विषय’.. मात्र दोन्ही हात जोडून ‘पालकमामा’ गेले निघून.  ‘उजनीचं पाणी’ या ‘मामां’ना शेवटपर्यंत छळणार, हे मात्र नक्की. लगाव बत्ती..

याच ‘जयंतरावां’च्या मेळाव्यातले रुसवे-फुगवे लहान लेकरांनाही लाजविणारे. मानाचं निमंत्रण नाही म्हणून खुद्द ‘जिल्हाध्यक्ष काका’च गायब. खरंतर ‘तौफिकभाई-महेशअण्णा’ यांना ‘अजितदादां’चा ट्रॅक सोडून डायरेक्ट ‘थोरले काकां’च्या भेटीला नेल्याचा राग म्हणे असा काढला गेलेला. तसंच फ्लेक्सवर फोटो नाही म्हणून ‘अनगरकरां’च्या ग्रुपनंही गावभर निषेधाचा मेसेज व्हायरल केलेला. काहीजणांना वाटलं ‘नॉन फोटो’ची ही करामत नक्कीच ‘नरखेडकरां’ची.. कारण यापूर्वीही त्यांनी एका कार्यक्रमात शिंदे पिता-पुत्रींचा फोटो गायब केलेला; मात्र यावेळच्या कटींग-पेस्टींगमध्ये त्यांचा बिलकूल हात नव्हता. तरीही पावती फाडली गेली त्यांच्याच नावावर.

लगाव बत्ती..

टॅग्स :SolapurसोलापूरJayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार